Home A प्रवचने A आम्ही अल्लाहसमोर मदतीची याचना करतो

आम्ही अल्लाहसमोर मदतीची याचना करतो

अल्लाह आपला निर्माणकर्ता, स्वामी, प्रभू, पालनकर्ता, आम्हावर उपकार करणारा आणि पूज्य आहे. या सर्व संबंधाची निकड हीच आहे की, आम्ही नखशिखांत कृतज्ञ बनून आंतरबाह्य त्याचे दास बनून राहावे. त्याच्याप्रति आपले काही कर्तव्य असते. मात्र ज्यावेळी आपण अल्लाहस शरण जाण्याचा निश्चय करतो, तेव्हा आपला अहंकार व मन यामध्ये सर्वांत मोठी अडचण ठरतो. आपल्या स्वैर इच्छा, अभिलाषा आणि अत्यंत आकर्षक व विलोभणीय आणि स्वप्नरंजित वासनांचे एक जबरदस्त लष्कर सैतानाच्या प्रेरणेने आपल्या मार्गात अडसर बनते आणि सत्यमार्गात जीवनाची वाटचाल करणाऱ्यावर जबरदस्त हल्ले चढविते.

अर्थातच विवाहासारख्या अत्यंत आनंददायक प्रसंगी इच्छा-अभिलाषांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या असतात आणि अशा प्रसंगी प्रत्येकास असे वाटते की याप्रसंगी आपण जिवांचे सर्व लाड पुरवावे, सर्व इच्छा व आकाक्षांची बिनधास्तपणे पूर्तता करावी. मग अल्लाह व पैगंबरांशी आदेशांची अशावेळी तो पायमल्ली करतो. भावना, इच्छा आणि स्वैर अभिलाषांचे सैतान मानगुटीवर बसलेले असते आणि माणूस इच्छा व स्वैर अभिलाषांच्या सुंदर, आकर्षक आणि विलोभणीय मोहपाशात अडकून अल्लाहशी असलेले निसर्गदत्त नाते तोडून टाकतो आणि मग हळू-हळू त्यास हा अतिसुंदर मोहपाश अल्लाहच्या आज्ञांना पायदळी तुडवित नरकाग्नीकडे घेऊन जात असतो. यदाकदाचित या सुंदर मोहपाशात अडकलेल्या व्यक्तीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतलीच आणि परत सत्यमार्गाकडे वाटचाल केली तर आणखीन एक संकट त्याची वाटच पाहत असते आणि ते म्हणजे घर-परिवार, नातलग आणि मित्रमंडळी होय. स्वत:ची कशीबशी सुटका केली असली तरी यांच्या जिवाचे चोचले पुरविण्याच्या अगदी स्नेहपूर्ण मागण्या समोर आलेल्या असतात आणि याचे आव्हानसुद्धा स्वीकारून सतत लढा द्यावा लागत असतो. मग अशा दोन-दोन संकटांच्या कचाट्यात सापडणाऱ्याकडे अल्लाहसमोर रक्षण आणि अभयदानाच्या मदतीची याचना केल्याशिवाय इतर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. म्हणूनच प्रत्येक नमाजच्या प्रत्येक रकअतीमध्ये अल्लाहस शरण आलेला हा दास अल्लाहची मदत मागतो आणि त्याचा धावा करतो ते अशा शब्दांत, 

“आम्ही तुझीच बंदगी (भक्ती) करतो आणि तुजपाशीच मदतीची याचना करतो.”   (दिव्य कुरआन ,१ : ४)

कारण याचकास हे चांगलेच ठाऊक असते की या समस्त विश्वावर केवळ अल्लाहचाच आदेश चालतो, प्रत्येक बाब त्याच्याच अखत्यारीत असून त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणातही सामर्थ्य नाही. जीवन, मृत्यू, नफा, तोटा, मान-प्रतिष्ठा, अपमान, अप्रतिष्ठा, शासन, संपत्ती, उपजीविका, संतती, भाग्य, यश, अपयश, इहलोक, परलोक वगैरे सर्वकाही अल्लाहच्या हाती आहे. त्याच्याशिवाय इतराजवळ काहीच नाही. म्हणून त्याचा सच्चा भक्त केवळ त्याला प्रभू आणि स्वामी मानतो आणि त्याच्या कोपाची भीती बाळगतो व त्यावर पूर्ण भरवसा ठेवतो.

“ज्यांना लोकांनी सांगितले की, `तुमच्याविरुद्ध मोठ्या फौजा गोळा झाल्या आहेत, त्यांची भीती बाळगा’ तर हे ऐकून त्यांची श्रद्धा अधिक वृद्धिंगत झाली आणि ते उत्तरले की, “अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तोच सवोत्कृष्ट कार्य सिद्धीस नेणारा आहे.” (दिव्य कुरआन ,३:१७३) 

अल्लाहचे हे गौरोवोद्गार त्याच्या कानात गुणगुणत राहतात, “जो अल्लाहवर भिस्त ठेवील त्याच्यासाठी तो पुरेसा आहे.” (दिव्य कुरआन , ६५:३)

त्यास चांगलेच ठाऊक आहे की, तो अतिशय दुर्बल आणि सामर्थ्यहीन आहे. इच्छा-आकांक्षा आणि स्वैर अभिलाषांच्या मायाजालात अडकविण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत ईशमार्गाकडे येण्यासाठी त्यास प्रचंड मोठ्या मदतीची गरज असते आणि संकटमय परिस्थितीत केवळ अल्लाहच त्याची मदत करू शकतो. त्याच्या मदतीशिवाय तो एक पाऊलसुद्धा उचलू शकत नाही. चोहोबाजुंनी घेरलेल्या संकटापासून आपला बचाव करण्यासाठी तो महान अल्लाहचा धावा करतो आणि अल्लाह त्याला आपल्या मदतीच्या छायेत अभय देतो. अशा स्थितीत तो निश्चिंत होतो की त्याला एकाच महान अस्तित्वाची (अल्लाह) मदत प्राप्त आहे आणि भक्ताच्या अंत:करणातून अल्लाहचे स्तवन करणारे शब्द नकळत बाहेर पडतात, 

“अल्लाहु अकबर!!!” अर्थात “अल्लाह महान आहे.”

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *