माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या जनसमुदायाच्या बाबतीत ज्या गोष्टीपासून सर्वाधिक मला भय आहे ती म्हणजे माझा जनसमुदाय आपल्या इच्छांचे म्हणणे ऐकू लागेल आणि भौतिक जग प्राप्त करण्यासाठी लांबलचक दिवास्वप्ने पाहू लागेल तेव्हा त्याच्या स्वअभिलाषेचे म्हणणे ऐकण्याच्या परिणामस्वरूप तो सत्यापासून दूर होईल आणि भौतिक जग प्राप्त करण्याच्या आकांक्षा परलोकापासून गाफील करतील. (लोकहो! या जगाने कूच केले आहे, ते जाऊ लागले आहे आणि परलोकाने कूच केले आहे, ते येऊ लागले आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे मानणारे आहेत जे त्याच्यावर प्रेम करतात. तुमच्यासाठी उत्तम आहे की तुम्ही जगाचे लोभी बनू नका, तुम्ही या वेळी अनुसरणाच्या घरात आहात आणि हिशोबाची वेळ अजून आलेली नाही आणि उद्या तुम्ही हिशोबाच्या घरात (परलोकात) असाल, तेथे अनुसरणाची कसलीही संधी मिळणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
पैगंबर मुहम्मद (स.) एका मनुष्याला उपदेश करताना म्हणाले, ‘‘तुम्ही पाच गोष्टींची पाच गोष्टींपूर्वी कदर करा- आपल्या तारुण्याला वृद्धत्व येण्यापूर्वी, आपल्या आरोग्याला आजारापूर्वी, आपल्या खुशालीला आपल्या दारिद्र्यापूर्वी, आपल्या फुरसतीला व्यस्ततेपूर्वी आणि आपल्या जीवनाला मृत्यूपूर्वी.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तारुण्यात खूप अनुसरण करा, कारण जख्ख वृद्धत्वाच्या स्थितीत इच्छा असूनदेखील काहीही करू शकणार नाही. आपल्या निरोगीपणाचा परलोकाच्या तयारीत वापर करा, कदाचित आजारी पडाल आणि काहीही करू शकणार नाही. जेव्हा अल्लाह खुशाली देईल तेव्हा त्यापासून आखिरतचे कार्य करा, कदाचित तुम्ही गरीब व्हाल. मग अल्लाहच्या मार्गात संपत्ती खर्च करण्याची संधी मिळणार नाही. या संपूर्ण जीवनाची कदर करा आणि ते अल्लाहच्या कार्यात व्यतीत करा अन्यथा मृत्यू येऊन अनुसरणाच्या सर्व संधी संपुष्टात येतील. माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) नमाजसाठी मस्जिदमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिले की काही लोक मोठमोठ्याने हसत होते. पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही सुख नष्ट करणाऱ्या मृत्यूला अधिक आठवले असते तर त्याने तुम्हाला हसण्यापासून रोखले असते. मृत्यूची मोठ्या प्रमाणात आठवण करा, तो सुख नष्ट करणरा आहे आणि कबर दरदिवशी म्हणते की मी वाटसरूंचे घर आहे, मी एकांताची कोठडी आहे, मातीचे घर आहे आणि जेव्हा एखादा मोमिन भक्त कबरीत दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करते. म्हणते की तू माझ्या पाठीवर चालणाऱ्यांपैकी मला सर्वाधिक प्रिय होतास. आज तुला माझ्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहा मी तुझ्याशी किती चांगला व्यवहार करते ते.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘त्या मोमिन भक्तासाठी ती कबर त्याची दृष्टी जेथवर पोहोचेल इतकी ती विशाल बनते. त्याच्यासाठी स्वर्गाच्या दिशेने एक दरवाजा उघडला जातो. जेव्हा एखादा दुराचारी अथावा एकेश्वरत्व नाकारणारा दास दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करीत नाही. ती म्हणते की तू माझ्याकरिता माझ्या पाठीवर चालणारांपैकी सर्वाधिक अप्रिय मनुष्य होतास. आता तुला माझ्या हवाली करण्यात आले आहे आणि तू माझ्याजवळ आला आहेस. पाहा, मी तुझ्याशी किती वाईट व्यवहार करते ते.’’ पैगंबर म्हणतात, ‘‘मग कबर त्याच्यासाठी आकुंचित पावते आणि इतकी अरुंद होईल की त्याच्या फासळ्या एकमेकांत अडकतील.’’ असे म्हणत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका हाताची बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये अडकविली. त्यानंतर म्हणाले, ‘‘त्याच्यावर ७० अजदा साप सोडण्यात येतील. त्यांच्यापैकी प्रत्येक साप इतका विषारी असेल की जमिनीवर त्याने फुंकर मारली तर त्याच्या विषाच्या परिणामामुळे त्या जमिनीवर कधीही काहीही उगवू शकणार नाही. मग हे सर्व अजदा साप त्याच्या दंश करतील आणि चावा घेतील. असेच अंतिम निवाड्याचा दिवस येईपर्यंत त्याच्याशी होत राहील. तो अल्लाहच्या दरबारात हिशोब देण्यासाठी उभा केला जाईल.’’ मग पैगंबर म्हणाले, ‘‘कबर मनुष्याकरिता स्वर्गाच्या बागांपैकी एक बाग बनते अथवा नरकाच्या खड्ड्यांपैकी एक खड्डा.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : जेव्हा एखादा मनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगातील दुष्टव्यांचा सामना करीत पारलौकीक जीवनाची तयारी करता करता मरण पावतो. दरम्यानच्या जीवनात ज्याला कबर म्हटले जाते, त्याच्याशी अल्लाह कृपा करतो आणि तो आनंदित होतो. जो मनुष्य जीवनभर वाईट कर्म करीत राहतो आणि पश्चात्ताप व्यक्त न करता मरण पावतो तेव्हा त्याच्याशी काहीसा तसाच व्यवहार केला जाईल जसा न्यायालयात हजर होण्यापूर्वी कारावासात होत असतो. हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मनुष्याने हवे तर आपल्या वर्तणुकीद्वारे कबरीतील जीवनाला आरामदायक व सुखमय जीवन बनवावे अथवा मग दुराचाराच्या स्थितीत हे जीवन व्यतीत करावे आणि मग कबरीतील शिक्षेला सामोरे जावे.

0 Comments