प्राचीन काळापासून स्त्री व पुरुषादरम्यान जो भेदभाव होता हे त्याचेसुद्धा खंडन आहे. त्यात हे सत्य स्पष्ट केले गेले आहे की, प्रथम मानवाची जोडीदारीण कोणत्या अन्य जातीची नव्हती, तर त्याच्याच जातीची होती. कोणी अन्य जीव त्याच्या साहचर्यासाठी जोडून दिले गेले नव्हते, तर ती त्याच्यातूनच निर्माण केली गेली होती. या प्रथम जोडप्यापासून असंख्य पुरुष आणि स्त्रिया उत्पन्न झाल्या. त्यांच्या दरम्यान नातेगोते व संबंध प्रस्थापित झाले आणि संपूर्ण मानवजात निर्माण झाली. म्हणून दोहोंदरम्यान भेदभाव व फरक करणे म्हणजे मानवजातीची एक बाजू व दुसऱ्या बाजूदरम्यान भेदभाव व फरक करणे होय. (एका पूर्णत्वाच्या दोन विभागा दरम्यान अंतर करणे होय.) स्त्री-पुरुषातील समानता व दोहोंमधील एकसमान योग्यता व्यक्त करण्यासाठी यापेक्षा उत्तम स्पष्टीकरणाची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही.
त्याचबरोबर सांगितले गेले की, संपूर्ण मानवजात एकाच ईश्वराचे सेवक व एकाच माता-पित्याची संतती होय, म्हणून त्यांनी एकीकडे तर ईश्वराची भक्ती व भय बाळगले पाहिजे आणि त्याचे भय बाळगून जीवन व्यतीत केले पाहिजे आणि दुसरीकडे जे नातेगोते व संबंध त्यांच्या दरम्यान आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. यात पुरुषाच्या आदराबरोबरच स्त्रीचा आदर करण्याचीसुद्धा ताकीद केली गेली होती.
स्त्री व पुरुषाचे यश धर्मावरील श्रद्धा व कृतीशी निगडित आहे
इस्लामने तर या कल्पनेचे मूळ कापून टाकले आहे की, पुरुष अशासाठी सन्माननीय व प्रतिष्ठित आहे की, तो पुरुष आहे आणि स्त्री केवळ स्त्री असल्यामुळे दर्जाने हलकी व अपमानित आहे. इस्लाममध्ये पुरुष व स्त्री मानाने समान आहेत. अतीत अथवा भविष्यासाठी कोणाचे श्रेष्ठत्व लिहून दिले गेले नाही आणि कोणाचे कनिष्ठत्वही नाही. यांच्यापैकी जो कोणी धर्मावरील श्रद्धा आणि सत्कृत्याने अलंकृत असेल तो इहलोक व परलोकात यशस्वी होईल आणि ज्याची ओटी या गुणांनी रिक्त असेल तो दोन्ही ठिकाणी अपयशी व निराश ठरेल.
‘‘जो कोणी सत्कृत्ये करील मग तो पुरुष असो की स्त्री जर तो श्रद्धावंत आहे तर आम्ही (या जगात) त्याला चांगले जीवन जगवू आणि (परलोकात) अशा लोकांना त्यांच्या सत्कृत्याबद्दल अवश्य चांगला मोबदला देऊ.’’ (सूरतुन्नहल – ९७)
इस्लाम – स्त्री-पुरुष समानतेचा पहिला ध्वजवाहक
संबंधित पोस्ट
0 Comments