प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘ला कतअअला खाइनिन’’ खयानत (धोकाधडी) करणाऱ्या माणसाचे हात कापले जाऊ नयेत.
स्पष्टीकरण- उपरोक्त हदीसवरून माहित होते की चोरीमध्ये धोकाधडी (खयानत) याचा समावेश नाही. चोरी म्हणजे एखाद्या मालाला (धनाला) एखाद्याच्या कब्जातून काढून आपल्या कब्जात घेणे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे की एका ढालीच्या किमतीपेक्षा कमी रकमेच्या चोरीसाठी हात कलम करू नये. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात अब्दुल्लाह बिन अब्बास यांच्या कथनानुसार एका ढालीची किंमत दहा दिरहम, इब्ने उमर (रजी.) यांच्यानुसार, तीन दिरमह, तर अनस बिन मालिक (रजी.) यांच्या मतानुसार पाच दिरहम तर माननीय आयशा (रजी.) यांच्या कथनानुसार एकचतुर्थांश दिनार होती. याच मतभेदाच्या आधारावर
धर्मशास्त्रींच्या मते चोरीची कमीतकमी मात्राबद्दलसुद्धा मतभेद आहेत. इमाम अबू हनिफा (रह.) यांच्या मते, चोरीची मात्रा दहा दिरहम आहे तर इमाम मालिक, शाफई आणि अहमद यांच्यानुसार एकचतुर्थांश दिनार आहे. अनेक अशा वस्तू आहेत ज्यांच्या चोरीबद्दल हात कापण्याची शिक्षा दिली जाऊ शकत नाही.प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे की, ‘‘फळे आणि भाज्यांच्या चोरीत हात कापला जाऊ शकत नाही.’’ खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. माननीय आएशा (रजी.) यांचे कथन आहे की, तुच्छ वस्तूंच्या चोरीत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात हात कापला जात नसे. माननीय हजरत अली व हजरत उस्मान (रजी.) यांचा निर्णय आहे आणि सहाबांचा याविषयी मतभेदसुद्धा नाही की पशूंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. या स्त्रोतांच्या आधारावर इस्लामी धर्मशास्त्रींनी अनेक वस्तूंना हात कापण्याच्या शिक्षेतून वगळले आहे.
इमाम अबू हनिफा (रह.) यांच्या मते, फळभाज्या, मटण, धान्य, जेवण, खेळ आदि वस्तूंच्या चोरीमध्ये हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच जंगलात चरणारी जनावरे आणि बैतुलमालची चोरी करण्यात हात कापण्याची शिक्षा नाही. परंतु याचा अर्थ असा होत नाही की या चोऱ्यांविषयी बिल्कुल काही शिक्षा दिली जाऊ शकत नाही. म्हणजेच अपराधामध्ये हात कापला जाणार नाही परंतु योग्य शिक्षा होईल. हात कापल्यानंतर जो मनुष्य क्षमायाचना करतो आणि आपल्या मनाला चोरीच्या अपराधाने पवित्र करतो तोच अल्लाहचा सदाचारी दास बनून राहतो. तो अल्लाहच्या कोपापासून वाचला जाईल आणि अल्लाह त्याच्या त्या अपराधाचा डाग धुवून टाकील. एखाद्याने हात कापल्यानंतरसुद्धा आपल्या स्वत:ला वाईट संकल्पापासून पवित्र केले नाही आणि त्याच दुष्ट भावनांना आपल्या मनात घर करून ठेवले ज्यांच्यामुळे त्याने चोरी केली व त्याचा हात कापला गेला होता तर याचा अर्थ असा होतो की हात तर त्याच्या देहापासून वेगळा झाला परंतु चोरी त्याच्या मनात पूर्वीसारखीच राहून गेली. म्हणून तो अल्लाहच्या कोपाला पात्र राहील जसा पूर्वी होता. म्हणून अपराध्याने अल्लाहची क्षमा मागावी आणि आपल्या मनाचा सुधार करावा कारण हात कापणे सामाजिक शिस्तपालन करण्यासाठी आवश्यक आहे. तथापि या शिक्षेपासून मन पवित्र होऊ शकत नाही. मनाचे पावित्र्य फक्त क्षमायाचनेने व अल्लाहकडे परत येण्यातच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हदीसमध्ये असा आदेश आहे की, एका चोराचा हात जेव्हा त्यांच्या आदेशाने कापला गेला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्याला आपल्या जवळ घेतले व सांगितले, ‘‘सांग! मी अल्लाहची माफी मागतो आणि क्षमायाचना करतो.’’ प्रेषितांच्या आदेशानुसार त्या व्यक्तीने क्षमायाचना केली. नंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्या माणसासाठी अल्लाहजवळ प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह! याला क्षमादान दे.’’

0 Comments