व्याज खाणाऱ्याची निर्भत्सना
माननिय अब्दुल्ला बिन मसअुद (रजी.) द्वारे उल्लेखित आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली व्याज खाणाऱ्याची, व्याज खाऊ घालणाऱ्याची, त्याच्या दोन्ही साथीदारांची आणि व्याज लिहिणाऱ्याची. (बुखारी, मुस्लीम) भावार्थ- प्रेषित ह. मुहम्मद (स.) ज्या गोष्टीमुळे धिक्कार करतात, तो अपराध किती मोठा अपराध असेल, याचा अर्थ असा होतो की, कयामतच्या (प्रलय काळी) प्रेषित (स.) अशा लोकांकरीता (जर ते तौबा, क्षमा-याचना) न करता मरतील, अल्लाहजवळ शिफारस नव्हे तर त्यांचा धि:कार करतील.(निसई)
कर्जदारांस संधी द्या
व्याजाची निषिद्धता व त्याबद्दलची कायदेशीर मनाई
ह. मुहम्मद (स.) यांनी आपल्या शेवटच्या हजप्रसंगी अत्यंत कडक शब्दात स्पष्ट केली आहे. ‘‘अज्ञान काळातील व्याज रद्द केले गेले आहे. सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबियातील अब्बास इब्ने अब्दुल मुत्तलिब यांचे व्याज पूर्णपणे रद्द करीत आहे. (मुस्लिम : किताबुल हज)
कर्जदारांशी नरमीचा व्यवहार
प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे, नंतर आपल्या कारकुनास कर्जवसूली करण्यास पाठवित असे. आणि त्याला ताकीद देत असे की, जर तू एखाद्या तंगीत असलेल्या कर्जदाराजवळ पोहोचशील तर त्याला माफ कर. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘हा मनुष्य जेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहशी भेटला, तेव्हा अल्लाहने त्याच्याशी माफीचा व्यवहार केला. माननीय अबु. कतादा (रजी.) कथन करतात की, ‘‘मी आदरणीय प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की, ‘‘ज्या माणसाला वाटत असेल की, कयामतच्या (प्रलय काळाच्या) दिवशी, शोक, दु:ख आणि पश्चात्तापापासून त्यास मुक्ती मिळावी, तर त्याने गरीब कर्जदारास सवलत द्यावी किंवा माफ करावे.’’ (मुस्लिम)
सात ‘महापाप’
मा. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, सात महापापापासून स्वत:ला वाचवा. ही सात महापाप –
१) कोणालाही ईश्वराचा भागीदार ठरविणे,
२) जादू करणे,
३) कोणाला हकनाक ठार मारणे.
४) व्याज खाणे,
५) अनाथांची संपत्ती हडपणे
६) जिहादच्या वेळी पळ काढणे आणि
७) शीलवंत स्त्रियांवर व्यभिचाराचे आळ घेणे.
(बुखारी, मुस्लिम)
0 Comments