इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले. तिला न्याय दिला. तिला सर्व मानवी अधिकार दिले, वागणूक, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले आणि समाजास तिचा सन्मान करण्यास शिकविले. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामीविरुध्द इस्लामने आवाज उठविला, ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. इस्लामच्याच प्रभावामुळे तिच्या पूर्वच्या दास्यत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे साहस आज कुणीही करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
“लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि त्या दोघांच्यापासून पुष्कळ पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा. ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की, अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.” (दिव्य कुरआन, 4 : 1)
ही या गोष्टीची घोषणा होती की एक मानव व दुसऱ्या मानवाच्या दरम्यान जे खोटे भेदभाव जगात निर्माण करण्यात आले आहेत, ते सत्याच्या प्रतिकूल, निराधार व निर्मूळ आहेत. संपूर्ण मानवजात एकाच जीवापासून निर्माण झाली आहे. सर्वांचा उद्गम एकच आहे. जन्मजात न कोणी श्रेष्ठ आहे न हीन, न कोणी उच्च जातीचा आहे आणि न कोणी नीच जातीचा सर्वांना सारखे व समान अधिकार आहेत.

0 Comments