माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे,
तुफैल बिन अम्र (रजि.) अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाले आणि सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दौस कबिल्याच्या लोकांनी अवज्ञा केली आणि नाकारले म्हणून तुम्ही त्या लोकांना शापित करावे, असा लोकांचा विचार आहे.’’ यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! दौसच्या लोकांना मार्गदर्शन प्रदान कर आणि त्यांना माझ्याजवळ पाठव.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
म्हणजे हे अल्लाह, मी प्रार्थना करतो की दौस कबिल्याच्या लोकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे आणि ते सर्व तुझे आज्ञाधारक मुस्लिम बनून जावेत आणि त्या लोकांनी माझी अवज्ञा करू नये.
पैगंबरांची सर्वश्रेष्ठ अभिलाषा हीच असते की मार्गभ्रष्ट लोकांनी सन्मार्गावर मार्गस्थ व्हावे आणि मार्गदर्शनरुपी संपत्ती त्यांच्या नशिबी यावी जी मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ईशदासांचा कल्याणभाव पैगंबर व नबींच्या हृदयात सामावलेला असतो. खरे तर हे ईशप्रेमाचे प्रतीक तसेच ईशप्रेमाची अपेक्षा असते की ईशदासांशी घनिष्ट संबंध तुमचा असावा. त्यांच्याशी प्रेम करावे आणि त्यांच्या भल्यासाठी व कल्याण करण्यासाठी सतत कार्यरत राहावे.
0 Comments