जैनब (रजि.) या अत्यंत उदार व दानशूर होत्या. फकीर व गरीबांना मदतीचा हात त्या देत व भुकेलेल्यांना पोटभर अन्न देत असत. यामुळे `उम्मुल मसाकीन’ (गरीबांची आई) या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्यांचे पहिले लग्न पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आतेभाऊ माननीय अब्दुल्ला बिन जहश (रजि.) यांच्याशी झाले होते. ते फार महान सहाबी (रजि.) होते. ई.स. ३ मध्ये उहुदच्या युद्धाआधी त्यांनी अल्लाहजवळ प्रार्थना केली की, “हे अल्लाह मला युद्धात असा बरोबरीचा योद्धा दे जो अत्यंत रागीट व पराक्रमी असेल. तुझ्या मार्गात लढताना त्याच्या हातून मला मरण येऊ दे. तो माझे नाक, कान, ओठ कापून टाको. मी तुझ्याकडे येईन तेव्हा तू विचारावेस की हे अब्दुल्लाह (रजि.) तुझे नाक, कान, ओठ कापलेले का आहेत ? तेव्हा मी म्हणावे, ही हे अल्लाह तुझ्या पैगंबरासाठी व तुझ्यासाठी कापलेले आहेत.” त्यांची ही प्रार्थना मान्य झाल्याची आकाशवाणी झाली. ती ऐवूâन ते म्हणाले, “माझ्या प्रेताचे तुकडे तुकडे होईपर्यंत मी लढेल. उहुदच्या युद्धात ते जोशात लढले त्यांच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. पैगंबर (स.) यांनी तेव्हा त्यांना खजुरीच्या झाडाची एक काठी त्यांना दिली ती घेऊन तलवारीसारखा तिचा वापर त्यांनी केला. ते या युद्धात शहीद झाले. मूर्तिपूजकांनी त्यांचे नाक, कान, ओठ कापले व ते दोऱ्यात ओवले.
माननीय अब्दुल्लाह (रजि.)च्या निधनानंतर त्या वर्षीच पैगंबरांनी माननीय जैनब (रजि.) यांच्याशी विवाह केला. बारा ओकया महर दिला. त्या वेळी जैनब (रजि.) या जवळपास ३० वर्षाच्या होत्या. त्यानंतर दोन-तीन महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. खुद्द पैगंबरांनी जनाजाच्या नमाजचे नेतृत्व केले. `जन्नतुल बकी’ येथे त्यांचे दफन केले. माननीय खदीजा (रजि.) नंतर जैनब (रजि.) यांचेच भाग्य होते की पैगंबर (स.) यांच्या हातून त्यांचे अत्यसंस्कार झाले. पैगंबर (स.) यांच्या इतर पत्नींचा मृत्यू पैगंबर (स.) यांचा मृत्यूनंतर झाला.
0 Comments