Home A quran A कुरआन शिकवणीत असहिष्णुता आणि क्रूरता आहे काय?

कुरआन शिकवणीत असहिष्णुता आणि क्रूरता आहे काय?

शंका : पवित्र कुरआनमध्ये कठोरता आणि क्रूरतेची शिकवण मिळते. विरोधकांसाठी कसलीही सहानुभूति आणि सहनशीलता अथवा उदारतेची शिकवण नाही.

जगातील कोणताही ग्रंथ अथवा कोणत्याही व्यक्तीचे व्याख्यान त्यातील संदर्भाला व प्रसंगाला वगळून नवीन संदर्भ व प्रसंग आपल्याकडून टाकून अध्ययन केले तर कधीही त्याचा योग्य अर्थ समजणार नाही. प्रत्येक गोष्टीबाबत मनाप्रमाणे आक्षेप व आरोप ठेवले जाऊ शकतात. कुरआनचा विरोध करणारे लोक आरंभिक काळापासून दुव्र्यवहार करीत व विक्षिप्त प्रदर्शन करीत होते. हे कार्य आजही सुरु आहे व भविष्यातही असे होत राहील, याची खात्री वाटते. याचे निराकरण करण्याकरिता सर्वोत्तम उपाय हा आहे, की एकदा संपूर्ण कुरआनचे अध्ययन केले जावे. म्हणजे आरोपाची वास्तविकता कळेल. कुरआनमधील उदारता आणि कठोरता याचे सर्व संदर्भांचे निरीक्षण केले जावे. वास्तविकता स्पष्टपणे कळेल.

कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे. त्याचा हेतू संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शक व कल्याणकारी आहे. पूर्ण मानवजात अल्लाहच्या परिवारासारखी आहे. त्याने निर्माण केल्याकारणाने त्याला मानवाप्रति प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याने निर्मित केलेल्या सर्व निर्मिती न्यायावर आधारित आहेत. मग तो स्वत: अन्यायचा वाहक कसा होऊ शकतो?

तुम्ही स्वत: या बाबीवर विचार करावा की न्याय व अन्यायाच्या कल्पनेला काय प्रमाण आहे? मानवाला विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून चांगल्या आणि वाईट मार्गापैकी कोणा एकाचा स्वीकार करावा लागेल. या प्रकारे प्रत्येक काळात आपल्या वागण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक चांगले असतात, तर काही वाईट. काय समाजाने या दोन्ही प्रकारच्या माणसांना समान दर्जा दिला आहे? दोघांना समान लेखणे म्हणजेच अन्याय होय. वाईट माणसांना त्यांच्या वाईटपणापासून दूर करणे व त्यांना चांगला व हिताचा मार्ग दाखविणे हे माणसाचे कर्तव्य आहे. वाईट माणसे आपल्या आचरणात सुधारणा करीत नसतील तर समाजाला वाचविण्यासाठी त्यांना शिक्षेची, दंडाची तरतूद आहे. न्यायालय व तुरूंगाचे अस्तित्त्व याचकरिता आहे की समाजात न्याय व शांती प्रस्थपित व्हावी.

कुरआनने वाईट लोकांना त्यांची दुष्टता सोडण्यासाठी आणि माणुसकी साधण्यासाठी शिक्षा-दीक्षा, विचार-विनिमय, सुधारासाठी दीर्घकाळ मुदत, क्षमायाचना इत्यादी व्यवस्था केलेल्या आहेत. तरीपण वैयक्तिक व वैचारिक क्षेत्रांत जर ते ऐकत नसतील तर “तुमचा मार्ग मोकळा” म्हणून समाजापासून अलिप्त होण्याची तरतूद आहे, त्यांच्या दुष्टपणाची फळे त्यांना दाखवून दिली की काय लाभदायक आहे व काय हानीहारक. या जगातच निवाडा होण्यापूर्वी त्यांना संधी दिली गेली आहे की त्यांनी त्यांचा कार्यकाळ पुरा करावा. न्यायाचा एक दिवस निश्चित आहे. तेथे त्यांच्या कर्माची फळे व भरपूर बदला मिळेल. याप्रकारे प्रत्येक बाबतीत निपटारा करण्यासाठी कुरआन शिकवण देत आहे. ही सगळी शिकवण सहानशीलतेच्या परिसीमेचे द्योतक आहे.

दुसरा दृष्टिकोन असा की कुरआन या गोष्टीची शिकवण देत आहे की एखादी व्यक्ती अथवा समूह पूर्णपणे वाईट आचरणापासून दूर जात नाही आणि थोडा भलेपणा त्याच्याजवळ आहे तर तेवढ्यापुरताच त्याला सहयोग करावा. त्याला उदारता आणि सहानुभूती नाही तर काय म्हणणार?

कुरआनच्या नजरेत सर्व माणसे समान आहेत. वर्ण, वंश, भाषा, प्रदेश यासारख्या विविध बाबींमुळे मानवाच्या दरम्यान एकता व सहिष्णुतेसाठी बाधक मानीत नाही. परिस्थितीनुसार स्वभाविक गुण दाखवून एका आई-बापाची संतानच्या रूपात परिचय देत परस्पर भाऊ-भाऊ म्हणून जोडले. कोणत्याही व्यक्तीबाबत घृणा, भेदभाव वर्णभेद करणे म्हणजे अपराध होय, असे कुरआन सांगतो. अल्लाहजवळ सर्वश्रेष्ठ तो आहे जो निष्ठावान, प्रार्थना करणारा व अल्लाहचे भय बाळगणारा आहे. जो सदाचारी आहे, दुष्कर्मापासून दूर आहे, दुसऱ्यांच्या हितासाठी आपले सर्वकाही त्याग करतो, चांगल्या कामात सहकार्य करतो आणि लोकांना अडचणींतून काढतो तो अल्लाहला आवडतो. कुरआनचे आदेश सर्वांसाठी व्यापक आहेत. त्यात पक्षपात व संकीर्णता नाही. काही उदाहरणे येथे देण्यात येत आहेत.

“जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका.”

“हे पैगंबर (स.)! सांगा हे ग्रंथधारकांनो, ऐका अशा बाबीकडे जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान समान आहे, हे की आपण अल्लाहशिवाय कोणाचीही भक्ती करू नये, त्याच्याबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये.” (दिव्य कुरआन – ३ : ६४)

“धर्माच्या बाबतीत कोणतीही जोर जबरदस्ती नाही सत्य, असत्यापासून वेगळे

केले गेले आहे.” (दिव्य कुरआन – २ : २५६)

“आम्ही त्याला मार्ग दाखविला, मग त्याने कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा.” (दिव्य कुरआन ७६ : ३)

“हा तर एक उपदेश आहे. आता ज्याची इच्छा असेल त्याने यापासून धडा घ्यावा.” (दिव्य कुरआन – ७४ : ५४-५५)

“स्पष्ट सांगून टाका, हे सत्य आहे तुमच्या पालनकर्त्याकडून, आता ज्याची इच्छा असेल मान्य करावे आणि ज्याची इच्छा असेल त्याने नाकारावे.”

(दिव्य कुरआन – १८ : २९)

“जो कोणी सत्कृत्ये करील, स्वत:साठीच करील आणि जो वाईट करील तो स्वत: त्याचे दुष्परिणाम भोगेल. नंतर जायचे तर सर्वांना आपल्या पालनकर्त्याकडेच आहे.” (दिव्य कुरआन – ४५ : १५)

“जर तुझ्या पालनकर्त्याची इच्छा अशी नसती (की पृथ्वी तलावर सर्व ईमानधारक  व आज्ञाधारक असावेत.) तर सर्व भूतलवासियांनी श्रद्धा ठेवली असती. मग तू लोकांना भाग पाडशील का की ते ईमानधारक  बनतील?”

(दिव्य कुरआन १० : ९९)

टीप : जेव्हा अल्लाहने लोकांना विवश केले नाही तुम्ही कोण विवश करणारे?स्वत:च्या इच्छेने स्वीकारलेली श्रद्धाच (ईमान) लाभदायी आहे. वैचारिक स्वातंत्र्य हीच तर परीक्षा आहे. विवशतेत परीक्षा समाप्त होईल. तेव्हा पुरस्कार अथवा दंड निरर्थक होईल.

कुरआनात अल्लाहने जे युद्धाचे आदेश दिलेले आहेत ते काही वैचारिक मतभेदांसाठी अथवा सांप्रादायिक द्वेषापोटी नाही. धरतीवर पसरलेल्या अत्याचाराविरुद्ध, अशांती व उपद्रवाला समाप्त करण्यासाठी, पीडितांना स्वतंत्र करण्यासाठी, आतताई दुष्ट लोकांपासून सुटका करण्यासाठी कुरआन मध्ये आले आहे.

“मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष स्त्रीया आणि मुलांकरिता लढू नये ज्यांचे दुर्बल असल्यामुळे दमन केले गेले आणि धावा करीत आहेत की हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहाय्यक निर्माण कर.”

(दिव्य कुरआन – ४ : ७५)

“आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाही.”

(दिव्य कुरआन – २ : १९०)

“काय तुम्ही लढणार नाहीत अशा लोकांशी जे आपल्या प्रतिज्ञा भंग करीत राहिले

व ज्यांनी पैगंबराला देशातून काढून टाकण्याचा निश्चय केला होता व अतिरेकास प्रारंभ करणारे तेच होते. तुम्ही त्यांना भिता काय? जर तुम्ही ईमानधारक असाल तर अल्लाह या गोष्टीला जास्त पात्र आहे की तुम्ही त्याची भिती बाळगावी.”

(दिव्य कुरआन – ९ : १३)

कुरआनद्वारा प्रस्तावित ही युद्धे ज्या कारणाकरिता लढली गेलीत ती कारणे व सबब महत्त्वपूर्ण होते. मानवाच्या हितासाठी व धरतीवरील बिघाड दूर करण्यासाठी ती युद्धे लढली गेली, ती अभिशाप नव्हती परंतु मानवकल्याणासाठी ती वरदान होती. यामुळेच अल्लाहने जगातील मानवासाठी ती त्याची कृपा व दान ठरविले.

“जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवीत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती. परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की, (अशा तऱ्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)” (दिव्य कुरआन – २ : २५१)

कुरआनचे असेही आदेश आहेत की, विरोधी मत असणारे शांती भंग करणार नाहीत व अत्याचार करणार नाहीत व मानवी सीमेचे उल्लंघन करणार नाहीत तर अशा लोकांबरोबर मनापासून व मोकळेपणाने कल्याणकारी व्यवहार करावा. निरपराधी लोकांवर अन्याय केला जाऊ नये. आणि मानवाच्या गौरवाचे रक्षण केले जावे.

संबंधित पोस्ट
Febuary 2025 Sha'ban 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4
3 5
4 6
5 7
6 8
7 9
8 10
9 11
10 12
11 13
12 14
13 15
14 16
15 17
16 18
17 19
18 20
19 21
20 22
21 23
22 24
23 25
24 26
25 27
26 28
27 29
28 Ramadhan 1
1 2
2 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *