२. अल्बकरा
परिचय
शीर्षक :
या अध्यायाचे नाव “बकरा’ यासाठी आहे की यात एके ठिकाणी गाईचा (बकरा) उल्लेख आला आहे. “बकरा’चा अर्थ होतो गाय. दिव्य कुरआनच्या प्रत्येक अध्यायात (सूरह) अनेक विषय आल्यामुळे त्या प्रत्येकाचे विषयानुरूप नामकरण अशक्य आहे. यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनात कुरआनच्या बहुतेक अध्यायासाठी (सूरह) विषयानुसार शीर्षक देण्याऐवजी प्रतिकात्मक नावे निश्चित केली आहेत ज्यामुळे अध्याय ओळखले जाते. या अध्यायाला (सूरह) “बकरा’ हे नाव देण्याचा अर्थ हा मुळीच नाही की यात गाईविषयी तपशील आला आहे तर फक्त हाच अर्थ आहे की तो सूरह (अध्याय) ज्यात गाईचा उल्लेख आला आहे.
अवतरण काळ :
या अध्यायाचा (सूरह) बहुतांश भाग मदिनेला हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर “मदनीकाळा’च्या प्रारंभी अवतरित झाला आणि कमी भाग नंतर अवतरित झालेला आहे. परंतु विषयानुकूल यात समाविष्ट केला आहे.
पाश्र्वभूमी :
या अध्यायाला समजून घेण्यासाठी प्रथमत: याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
१) “हिजरत’पूर्व मक्का शहरात इस्लामचे आवाहन प्रामुख्याने अरब अनेकेश्वरवादी लोकांसाठी होते. हे आवाहन त्या लोकांसाठी नवीन व अनोळखी असे होते. हिजरतनंतर आता संबंध यहुदी लोकांशी आला. हे यहुदी लोक एकेश्वरत्व, प्रेषित्व, परलोकत्व, दिव्यप्रकटन, फरिश्ते आणि ईशग्रंथाशी परिचित होते. तत्वत: त्यांचा दीन (धर्म) इस्लामच होता ज्याची शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत होते. परंतु शतकानुशतकात झालेल्या फेरबदलाने व विकृतीने त्या लोकांना खऱ्या धर्मापासून फार दूर हाकलून दिले होते. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे आल्यानंतर अल्लाहने आदेश दिला की त्यांना (यहुद्यांना) सत्यधर्माचे (इस्लामचे) आवाहन द्या. म्हणून या अध्यायातील प्रारंभीच्या एकशे एक्केचाळीस (१४१) आयती या विषयाशी निगडीत आहेत.
२) मदीना येथे पोहचल्यानंतर “इस्लामी आंदोलन’ एका नव्या स्थितीला सामोरे जात होते. मक्केतील कार्य फक्त इस्लामी मूलतÎवांचा प्रचार आणि नवमुस्लिमांचे नैतिक प्रशिक्षणापुरतेच
0 Comments