भावार्थ- मृत्यूचे स्मरण करण्याचा अर्थ असा की माणसाने हा विचार करावा की जीवनाची ही संधी फक्त एकदाच लाभलेली संधी आहे. पुन्हा दुसऱ्यांदा कर्म करण्याची संधी लाभणार नाही. कुरआन पठनाचा अर्थ, कुरआनातील शब्दांना योग्य ुच्चारांसह वाचणे, त्यात जे काही सांगितले गेले आहे, ते समजून घेणे व त्यास आचरणात आणणे. किंबहूना आणखी एका अर्थाने येतो, म्हणजे हे की कुरआनचा प्रचार व प्रसार करावा. त्याला इतरांपर्यंत पोहोचवावे.
सदाचारपूर्ण वर्तन
मा. अबु ज़र ग़फ्फारी (र.) कथन करतात की, प्रेषित यांच्या सेवेत हजर होऊन मार्गदर्शनाची विनंती केली. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे भय बाळगून सदाचारपूर्ण वर्तन अंगिकारा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण धर्मास आणि समस्त व्यवहारांना योग्य स्थितीत राखणारी आहे.’’ मी म्हणालो, आणखी काही सांगा. प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘स्वत:ला कुरआन पठण आणि प्रभावशाली अल्लाहच्या नाम:स्मरणाची सवय लावून घ्या. तेव्हा अल्लाह तुमचे आकाशात स्मरण करील आणि जीवनाच्या अंध:कारात तुमच्यासाठी उजेडाचे काम देईल. (हदीस – मिश्कात)
भावार्थ- ‘‘अल्लाह स्मरण करील’’ याचा अर्थ अल्लाहला तुमचा विसर पडणार नाही. अल्लाह तुम्हाला आपल्या संरक्षणात राखील. अल्लाहचे स्मरण आणि कुरआन पठणाने ईमानधारकाला प्रकाश प्राप्त होतो. जीवनाच्या अंध:कारात तो उचीत मार्ग प्राप्त करतो.
सर्वोत्तम सदका (दान)
मा. सराका बिन मालिक (र.) कथन करतात की, प्रषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘मी तुम्हाला सर्वोत्तम सदका (दान) कोणते ते सांगू? ती तुझी मुलगी होय. जी तुझ्या जवळ फाठविली गेली आहे आणि तिला तुझ्याखेरीज दुसरा कोणी कमाविणारा, खाऊ घालणारा नाही.’’ (हदीस – इब्ने माजा) अर्थात अशी मुलगी जिच्या कुरुपतेमुळे किंवा एखाद्या शारिरिक व्यंगदोषामुळे विवाह होत नाही किंवा विवाहानंतर तलाक (घटस्फोट) मिळाला. आणि तुमच्याखेरीज अन्य कोणी तिचे पोषण करणार नाही. तर अशा असहाय मुलीवर तुम्ही जे काही खर्च कराल, तो अल्लाहच्या दृष्टीने सर्वोत्त सदका (दान) ठरेल.
विधवांना प्रेषितांचे सामीप्य
मा. औफ बिन मालिक (र.) कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘मी (प्रेषितास) आणि करपलेल्या चेहऱ्याची (वैधव्याच्या संकटामुळे) स्त्री कयामतीच्या दिवशी या दोन बोटाप्रमाणे असतील. (हे हदीस वचन कथन करताना, आपले मधले बोट आणि तर्जनीचे बोटाकेड इशारा केला). अर्थात ती स्त्री जिचा पती मृत्यू पावला आणि ती वांशिक प्रतिष्ठा राखते ती स्वत: सौंदर्यवान ही आहे परंतु तिने आपल्या मृत पतीचा आपल्याखातीर स्वत:ला दुसरा निकाह करण्यापासून रोखून ठेवले.
भावार्थ- एखादी स्त्री विधवा झाली, पण त्याला लहान मुले असतील, लोक तिच्याशी विाह करण्यासही उत्सुक ही असतील परंतु ती आपल्या अनाथ मुलांच्या संगोपनाकरीता पुनर्विवाह न करता, प्रतिष्ठा व सत्शीलतापूर्वक जीवन व्यतीत करते तर अशा स्त्रीला कयामतच्या दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे सामीप्य प्राप्त होईल.
0 Comments