भावार्थ-
उपरोक्त दोन्ही हदीसमध्ये व्याजासंबंधी इतकी कठोर तंबी देण्यात आली आहे. मानवी समाज हा इतर प्राणी, पक्ष्यापेक्षा जास्त सभ्य समाज म्हणून ओळखला जातो. स्त्री आणि पुरुष यांचे नाते परस्परपूरक म्हंटले जाते. ईश्वर, त्याचे प्रेषित यानंतर जगात सर्वात जास्त आदरणिय अशी कोणी व्यक्ती असेल तर ती आई. प्रेषितांनी आईच्या तळव्याखाली जन्नत (स्वर्ग) आहे असे म्हंटले. पण वरील हदीसमध्ये व्याज खाण्यासंबंधी कठोरतम निर्भत्सना केली आहे. स्वत:च्या सख्या आईशी शरीरसंबंध ठेवणे? केवळ विचारानेच माणसाच्या काळजाचे पाणी होते. जगातील सर्वात आदरणीय, आईशी शरीरसंबंध? शक्य नाही. पण प्रेषितांनी फर्माविले, व्याज खाणे म्हणजे आईशी शरीरसंबंध ठेवणे, इतके महापाप आहे. दुसऱ्या हदीसमध्ये व्याज खाणे म्हणजे ३६ वेळा व्यभिचार करण्यापेक्षाही जास्त गंभीर आहे. इस्लामने व्यभिचाराला हराम ठरविले आहे.
पवित्र कुरआनने म्हंटले आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका. ही उघड अशी निर्लज्जता आहे व अतिशय वाईट मार्ग.’’ (१७:३२)
ही आयत चारित्र्यसंपन्नतेचे महत्व विषद करते. निर्लज्जतेच्या गोष्टीमध्ये व्यभिचार, कुकर्म, नग्न आणि अश्लील चित्रे (पोरनोग्राफी), प्रेमाचे चाळे करणे, शारिरीक आकर्षण निर्माण करणारी गाणी गाणे अथवा पाहणे, चित्रपट पाहणे, स्त्रियांचे बिभत्स चाळे, नृत्ये, हावभाव या सर्व गोष्टी निलज्जतेत प्रथम क्रमांकांच्या मानल्या जातात. व्याज खाणे हे व्यभिचाराहून जास्त गंभीर पाप आहे. सुसंस्कृत व सत्शील जीवन हे समजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कुरआन आणि हदीसमध्ये दर्शविलेल्या नितीनियमांचे पालन जो समाज करेल, स्विकारेल व अंगीकारेल, तो समाज निश्चितच स्वकल्याण साधू शकेल यात संशय नाही.
व्याजाची परिणिती आर्थिक तंगीतच होते– माननिय अब्दुल्ला बिन मसऊद (र.) कथन करतात की प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘जो मनुष्य व्याजाच्या माध्यमाने संपत्ती गोळा करतो, त्याची परिणिती आर्थिक तंगीमध्ये होते.’’ दुसऱ्या एका हदीसमध्ये असे शब्द आहेत, ‘‘व्याजाने गोळा केलेली संपत्ती कितीही जास्त असली तरी, त्याची परिणिती आर्थिक तंगीमध्येच होते. (हदीस : तरगीब व तरहीब)
व्याज खाणे हे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आहे
हजरत अबु हुरैराह (र.) कथन करतात की, इस्लामचे अंतीम प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘व्याजखोरीच्या (व्याज घेणे-देणे) व्यवहाराचे ७० भाग आहेत. शेवटचा महत्वपूर्ण भाग असा की, माणसाने तिच्या सख्या आईशी लग्न करावे (म्हणजे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आहे.) (इब्ने माजा, हदीस क्रमांक २८२६) ह. अब्दुल्ला इब्ने हंजला कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘व्याज म्हणून कोणी व्यक्ती मुद्दामहून एक दिरहम (एक अरब नाणं) देखील घेत असेल तर हे छत्तीस वेळा व्यभिचार करण्यापेक्षाही जास्त गंभीर (पाप) आहे. (तिरमिजी शरीफ, हदीस क्रमांक – २८२५)
संबंधित पोस्ट
0 Comments