माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मीसुद्धा एक मनुष्य आहे. मलासुद्धा विसर पडतो ज्याप्रमाणे तुम्ही विसरता. म्हणून जेव्हा मी विसरलो तर मला स्मरण करून देत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जुहरच्या नमाजप्रसंगी चार रकअतऐवजी पाच रकअत नमाज अदा केली. तेव्हा साथीदारांनी (सहाबा) विचारले, ‘‘काय नमाजमध्ये वृद्धी झाली आहे?’’ (कारण नमाजमध्ये चार रकअत फक्त अनिवार्य आहे)
पैगंबरांनी विसरल्याबद्दल (भूल) दोन सजदे केले. (दोनदा नतमस्तक झाले) आणि वरील उद्गार काढले होते जे हदीसमध्ये सुरक्षित करण्यात आले आहे, ‘‘मीसुद्धा एक मनुष्य आहे. मीसुद्धा विसरतो. विसरणे तर मनुष्यस्वभाव आहे. जर मी विसरलो तर तुम्ही मला स्मरण करून द्यावे.’’
0 Comments