अल्लाहने आपणास आज्ञा दिली होती की तुमच्या वारसाहक्कात सर्व मुलगे व मुली सामील आहेत. आपण याचे उत्तर काय देता? असे की आमच्या वाड वडिलांच्या कायद्यात मुलगे व मुली सामील नाहीत. त्याशिवाय असे की आम्ही अल्लाहच्या कायद्याऐवजी वाड-वडिलांचा कायदा मानतो. कृपा करून मला सांगा की काय इस्लाम याचेच नाव आहे? आपणास सांगितले जाते की हा घराण्याचा कायदा मोडा. आपल्यापैकी प्रत्येकजण म्हणतो की जेव्हां सर्वजण मोडतील तेव्हा मी सुद्धा मोडीन. जर दुसऱ्यांनी मुलीला संपत्तीतील हिस्सा दिला नाही आणि मी दिला तर माझ्या घराची संपत्ती दुसऱ्याजवळ जाईल. परंतु दुसऱ्याच्या घराची माझ्या घरी येणार नाही. विचार करा की या उत्तराचा अर्थ काय आहे? काय अल्लाहच्या कायद्याची अंमलबजावणी या अटीवरच केली जाईल की दुसऱ्याने केली तर आपण सुद्धा कराल? उद्या आपण म्हणाल की दुसऱ्यांनी व्यभिचार केला तर मी सुद्धा करीन. दुसरे चोरी करतील तर मी सुद्धा करीन. म्हणजे दुसरे लोक जोपर्यंत सर्व अपराध सोडून देत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा सर्व अपराध करीत राहीन. गोष्ट अशी आहे की या बाबतीत तिन्ही मूर्त्यांचे पूजन होत आहे. मनाची, वाडवडिलांची व अनेकेश्वरवाद्यांची सुद्धा गुलामी केली जात आहे आणि या तिन्ही प्रकारच्या गुलामींबरोबरच इस्लामचा सुद्धा दावा करता.
ही केवळ दोन उदाहरणे आहेत, नाहीतर डोळे उघडून पाहिले तर अशा प्रकारचे अनेक रोग आपल्या लोकांत पसरलेले आढळतील. आणि या सर्वात आपण हेच पहाल की कुठे एका मूर्तीचे पूजन होत आहे, कुठे दोन मूर्त्यांचे तर कुठे तिन्ही मूर्त्यांचे. जर या मूर्त्यांचे पूजन होत असेल आणि त्यांच्याबरोबर इस्लामचा दावा सुद्धा आपण करीत असाल तर आपण कशी आशा बाळगू शकता की आपल्यावर अल्लाहकडून त्या कृपेचा वर्षाव होईल जिचा वायदा खऱ्या मुसलमानाबरोबर केला गेला आहे?

0 Comments