तथाकथित मुस्लिम। महॉमिडन पर्सनल लॉ मधील कायदे वास्तविक इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे ही हकीकत सिद्ध झाल्यामुळे इतर दूसर्या जमातीच्या व्यक्तिगत कायद्याहून त्याची हकीकत पूर्णपणे भिन्न आहे. इतर जमातीचे व्यक्तिगत कायदे त्यानी स्वतःहून तयार केलेले आहेत. मुस्लिम कायद्याचा उगम मुस्लिमांची बुद्धी, समज, आवडनिवड किवा त्यांचे विचार यातून झालेला नसून त्याचे उगमस्थान पवित्र कुरआन आणि सुन्नत आहे. म्हणून त्याना मुस्लिम किवा महॉमिडन पर्सनल लॉ(मुस्लिम । महॉडिन व्यक्तिगत कायदा) म्हणणे त्या कायद्याच्या मूळ दर्जावर पडदा पाडणे आहे.
वास्तविक या कायद्याला हे नाव ब्रिटिश राजकर्त्याची कुत्सित आणि अशुभ देणगी आहे. ते नेहमी मुस्लिमांची संस्कृती, सभ्यता आणि धर्म याना क्षति पोहोचवून त्यांच्या धारणाना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असत. इस्लाम धर्माशी शत्रुत्व आणि इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेच्या विचारांच्या परिणतीमुळे या कायद्याला ‘‘कुरानिक लॉ’’ किवा ‘‘इस्लामिक लॉ’’ म्हणण्या ऐवजी ‘महॉमिडन लॉ’ असे नामकरण करण्यात आले. कायद्याच्या पुस्तकातुन आणि न्यायसंस्थेत हेच नांव प्रचल्लित केल्यामुळे खर्या वस्तुस्थितीची शंका सुद्धा येऊ नये अशी मखलाशी करून ठेवली आहे. मुस्लिमांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असणार्या शरीअतच्या कायद्याला ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ नांव दिले गेले. तथापि ते मुस्लिम कायदे नसून इस्लामिक कायदे होते आणि आजही आहेत.
म्हणून या कायद्याना ‘इस्लामी व्यक्तिगत कायदा । इस्लामिक पर्सनल लॉ’ हे नाव देणे सत्य, वास्तवाला आणि प्रामाणिकपणाला धरून होईल. इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेची आज ही परिस्थिती आहे की सुशिक्षित लोकांना सुद्धा ‘इस्लामी’ आणि ‘मुस्लिम’ यातील फरक समजत नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू राहिल्यास त्याचा स्वाभाविक परिणाम असा होईल की, शरीयतच्या आदेशांचे मूळ चित्र सर्वसामान्य लोकांना दिसू शकणार नाहीत. हा तर मुस्लिम पर्सनल लॉ आहे, त्याच्याशी इस्लामचा काही संबंध नाही. असाच लोक विचार करतील. सर्व संबंध केवळ मुस्लिमांशी असून मुस्लिम नावांच्या समाजाचे तसेच सांस्कृतिक कायदे आहेत, जसे जगामध्ये बर्याच अन्य समाजाचे व्यक्तिगत कायदे असून त्यांच्या धर्माशी फारकत घेतलेले आणि केवळ सांस्कृतिक कायदे आहेत. इतका मोठा पायाभूत गैरसमज चालू ठेवणे आणि त्याचीच वृध्दी करत राहणे. प्रामाणिक आणि न्यायसंगत आहे काय?
0 Comments