‘मुस्तलक’ कबिल्याविरुद्ध कारवाई म्हणजे हिजरी सन पाचमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना होय. हा कबिला खूप उपद्रवी आणि भांडखोर होता. प्रेषितांना सूचना मिळाली की, हा कबिला बंड करण्याच्या तयारीत आहे. प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय बुरैदा(र)’ यांना पाठवून मिळालेली सूचना खरी असल्याचे समाधान करून घेतले. ‘शाबान’ महिन्याच्या तीन तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) लष्करासह जलद गतीने ‘मुरैसीअ’ या ठिकाणी पोहोचले. शत्रूपक्ष लढण्यासाठी येणारच होता, परंतु प्रेषितांना अचानक आलेले पाहताच त्याचे आवसान गळाले. शत्रूचे संपूर्ण सैन्य घाबरले आणि अभय देण्याची मागणी केली. शत्रूच्या या लष्करात ‘माननीय जुवैरिया’सुद्धा होत्या. त्यांनी मोठ्या आवाजात इस्लाम स्वीकारण्याची घोषणा केली आणि प्रेषितांनी त्यांना त्यांच्या स्वइच्छेने आपल्या विवाहबंधनात घेऊन सन्मान दिला. या ठिकाणी शत्रूपक्षास युद्ध न करताच पराभवाचे तोंड पाहावे लागले. ‘माननीय जुवैरिया(र)’ या कबिल्याच्या सरदाराची कन्या होती.
मुस्लिम समुदायाच्या या विजयामुळे इस्लामद्रोही असलेल्या दांभिकजणांचा जळफळाट झाला. सूड आणि द्वेषापोटी दांभिकांनी मदीना शहरातील मुस्लिम समुदायात कलह निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु आदरणीय प्रेषितांनी जातीने लक्ष घालून दांभिकांची कूटनीती उद्ध्दस्त केली.
‘मुस्तलक’ कबिल्याविरुद्ध कारवाई
संबंधित पोस्ट
0 Comments