माननीय अब्दुल्ला (र.) यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याजवळ आला आणि प्रेषित यांना म्हणाला, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषितांनी सांगितले, जे तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हटले की, ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्यांच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी पुरापेक्षा जास्त वेगाने सरसावून येतात. (हदीस – तिर्मिजी)
भावार्थ- एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्यांच्या पसंतीस आपली पसंत व त्यांच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. आपला ‘प्रिय’ ज्या मार्गावर चालतो. त्यास आपला जीवन मार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, सहवासासाठी आणि त्याच्या प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे आणि बलिदानासाठी सदैव तत्पर असावे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ, त्यांचे एक एक पाउलचिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार आचरण करावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन केले त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ हे प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे तसेच ‘बद्र व हुनेन’ देखील प्रेषितांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याचा परिणाम दारिद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टींचा मारा होईल. हे सर्वविदीत आहे की आर्थिक आघात सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी असलेल्या प्रेमानेच होऊ शकतो. ईमानधारक मनुष्य अशावेळी असा विचार करतो की, अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही. आणि शेवटी मी एक अल्लाहचा गुलाम आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे. मी ज्याच्या कामावर लागलो आहे तो अतिशय दयावान आणि न्यायी आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही, त्याचे (ईश्वराचे) अशा प्रकारे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करणे. शैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम करून टाकते. नबुवत/प्रेषितत्त्व, हे एक अधिकारपद आहे. सर्वोच्च अल्लाहकडून त्यासाठी विशिष्ठ व्यक्तीची निवड व नियुक्ती होत असते. अशा निवडलेल्या व नियुक्ती झालेल्या व्यक्तीच्या स्वत:च्या इच्छेलाही काही वाव नसतो. माणसाच्या स्वत:च्या निर्धार व इरादा, धडपड व प्रयत्नांनी, प्रेषितत्त्व प्राप्त होत नसते. आपला प्रेषित कुणास करावा याचा निर्णय घेणारा तो अल्लाहच आहे. ‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितत्त्वाचे कार्य कुणाकडून घ्यावे व कसे घ्यावे. (सूरह अनआम). जपजाप्य व ध्यानमग्न आणि तपश्चर्येमुळे मनुष्य अध्यात्मिक दृष्टीने उच्च होऊ शकतो. परंतु हे शक्य नाही की आपल्या या खडतर तपश्चर्येच्या बळावर तो प्रेषितत्त्वपदापर्यंत पोहोचावा व आपल्या तपांमुळे प्रेषितत्त्वाने उपकृत व्हावा. प्रेषितत्त्व हे एक अधिकारपद आणि ठराविक कामगिरी आहे. कोणतेही अधिकारपद स्वत: होऊन केवळ आपल्या प्रयत्नांनी मिळत नसते तर कुणा समर्थ अधिकारीच्या फर्मानाने व नियुक्तीनेच ते प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रेषितत्त्व, जे एक महान रब्बानी-दैवी पदाधिकार आहे, त्यालाच मिळू शकते ज्यासाठी सृष्टीच्या व मानवजातीच्या खऱ्या शासकाकडून नियुक्ती आदेश मिळाला असेल. प्रेषित जे काही आदेश देतात, आणि दीन, शरिअत (धर्म व शास्त्र) म्हणून ज्या ज्या गोष्टींची शिकवण देतात, ती त्यांच्या स्वत:कडून नसते तर सर्वोच्च अल्लाहकडून असते. सर्वच प्रेषित म्हणतात, ‘‘मी तुम्हाला आपल्या पालनकत्र्याच्या आज्ञा ऐकवित आहे व त्याचाच संदेश ऐकवित आहे पोहोचवित आहे.’’ (सूरह आअराफ) ‘‘ज्याने प्रेषिताचे आज्ञापालन केले त्याने अल्लाहचे आज्ञापालन केले.’’ (सूरह निसा).

0 Comments