लोक समजतात अल्लाहव्यतिरिक्त इतरही शक्ती अन्नपुरवठा करतात, पालनपोषण करतात, आरोग्य व सुदृढ देहयष्टी देतात, म्हणून ते त्यांची उपासना करू लागलेत. मानवाने पालनकर्त्या अल्लाहचे पालनपोषणाचे श्रेय इतरांशी निगडीत केले, कारण ते त्यांना अनन्यसाधारण शक्ती व सामर्थ्यांचे धनी वाटतात. काही लोकांना देवदूत तर काहींना माणसे, काहींना ग्रह तर काहींना नक्षत्रे, जनावरे, वृक्ष मानवाचे हितकर्ते व मानवाच्या गरजा पुरविणारे वाटतात. काही तर माणसांनाच माणसाचे पालनकर्ते मानतात. सम्राट नमरुद इराकचा शासक होता, सर्व शक्ती त्याच्या हातात एकवटली होती. म्हणून तो स्वत:ला तेथील जनतेचा पालनकर्ता समजू लागला. म्हणून इब्राहीम (अ.) यांनी त्यास म्हटले की, माझा पालनकर्ता जीवनदाता आहे व जीवनाचा अंतही करणारा आहे. नमरुद उत्तरला, “मीही ज्याला हवे त्याला जीवित ठेवतो व नको असेल त्याला मारून टाकतो.” मग इब्राहीम (अ.) यांनी सांगितले, “माझा अल्लाह पूर्वेकडून सूर्याचा उदय करतो, तू असे कर की सूर्योदय पश्चिमेकडून करून दाखव.” नकारवादी नमरुद निरुत्तर झाला. त्याला ठाऊक होते की, तो स्वत: जगाचा पालनकर्ता नाही. तरीही त्याने लोकांचा पालनकर्ता असण्याचा हट्ट सोडला नाही.
याचप्रमाणे किंग फारोह (फिरऔन) ची कथा आहे. फारोहने जाहीर केले होते की, तो सर्वांत मोठा पालनकर्ता आहे. कारण त्याचे संपूर्ण इजिप्तवर वर्चस्व होते. मात्र एकेश्वरत्वात पालनकर्त्यांचा सहकारी किंवा भागीदार नसतो, म्हणून कुरआनात अल्लाहस बऱ्याच ठिकाणी ‘पालनकर्ता’ संबोधिले गेले आहे. उद्देश हाच की, मानवाच्या मनावर ही बाब खोलवर रुजविली जावी की, अल्लाहच सर्वांचा पालनकर्ता व आराध्य आहे व त्याच्याव्यतिरिक्त साऱ्या मानवजातीचा इतर कोणीही पालनकर्ता नाही व आराधनेस पात्रही नाही. निश्चितच याच दृढ श्रद्धाभावनेने संपूर्ण मानवजातीचे कल्याण व उत्कर्ष साधता येईल.

0 Comments