जर तुम्हाला कुणी असे सांगितले की ही रेल्वे, जी हजारो प्रवाशांची ने-आण करते, आपोआपच तयार झाली आणि आपोआपच चालते, वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने थांबते आणि वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने पुढच्या स्थानकाकडे रवाना होते, तर तुम्हाला विश्वास तरी होईल काय? तुम्ही म्हणाल की…. मी रेल्वे तयार करणाऱ्यास पाहिले नसले तरी मी तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही की रेल्वे कुणीही न बनविता आपोआपच तयार झाली आणि कुणीही न चालविता आपोआपच चालते.
रेल्वे तर खूप मोठी बाब आहे. तुम्ही तर हेदेखील मान्य करणार नाही की एखादे घर, एखादी खुर्ची, एखादे पेन अगर अशीच एखादी वस्तू कुणीही तयार न करता आपोआपच तयार झाली असावी. आता याच अनुषंगाने या जगाकडे पाहावे. ही पृथ्वी जिच्यावर आपण वास्तव्य करतो, हा चंद्र आणि हा तळपणारा सूर्य, ज्यांमुळे आपल्याला प्रकाश मिळतो, हे कोट्यवधींच्या संख्येत जगमगणारे तारे, हा प्रचंड समुद्र, हा वारा, हे विविध तऱ्हेचे प्राणी, चिवचिवणाऱ्या चिमण्या आणि हे खळखळणारे झरे याबरोबरच आपण सर्व मानव…. हे सर्वकाही आपोआपच तयार झाले आहेत काय? आणि कुणी सांगितलेच की होय! हे सर्व आपोआपच तयार झाले, तर तुमचा विश्वास तरी बसेल काय?
सूर्य हा पृथ्वीपेक्षा लाखो पटीने मोठा असून त्या विश्वात आणखीनही बरेच सूर्य आहेत आणि ते आपल्या या सूर्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठे आहेत. शिवाय आकाशगंगेत असंख्य तारे आपापल्या भ्रमणकक्षेत व्यवस्थितरित्या फिरत आहेत. प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक तारा अगदी नियोजित कक्षेत आणि नियोजित गतीने नियोजित वेळेनुसार भ्रमण करीत असून त्यात तिळमात्र फरक पडत नाही. सूर्याच्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते, हे बाष्प वारा पुढे घेऊन जातो आणि मग परत नियोजित वेळेवरच हेच बाष्प पर्जन्याच्या स्वरूपात बरसते. जणू हे त्यांचे निश्चित ठरवून दिलेले कार्यच! जणू आपापल्या कर्तव्याशी कुणीही तिळमात्र कुचराई करीत नाही.
पाऊस आपल्या जीवनाचा मुख्य सहारा आहे. पाऊस पडतो आणि सर्वत्र वनराई हिरवी होते. तऱ्हे-तऱ्हेची पिके, फुले, फळे, आपल्याला आणि प्राण्यांना प्राप्त होतात. पाऊसच जर पडला नाही तर काय-काय घडू शकते, याची कल्पना न केलेलीच बरी. असे स्पष्टपणे दिसते की ही प्रचंड सृष्टी आणि यातील प्रत्येक घटना अगदी नियोजनबद्धरित्या घडते. जणू हे प्रचंड विश्व एक प्रचंड मोठा कारखानाच आहे.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की हे कारखानारूपी प्रचंड मोठे विश्व आणि यातील या नियोजनबद्ध घटना-कार्य आपोआपच सुरू आहे काय? हे सर्वकाही चालविणारा आणि सांभाळणारा वा निगराणी करणारा कोणी आहे की नाही? तर वस्तुस्थिती अशी आहे की या विश्वाची निर्मिती करणारा निर्माता असून त्याच्याच आदेशाने हे संपूर्ण विश्व कार्यरत आहे. येथे जे काही होत आहे, ते त्याच निर्मात्या आणि संचालकाच्या मर्जीने होत आहे. येथे एक कणसुद्धा स्वत:हून अस्तित्वात आलेला नसून कोणतीही घटना व कार्य आपोआप घडत नाही.
आता आपण स्वत:लाच पाहावे. आपल्याला किती सुंदर आणि सुरेख शरीर मिळालेले आहे. या शरीरात कशा विविध शक्ती व सामर्थ्य आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण केवळ आपली जीभ, कंठ आणि ओठांना कार्यरत करतो आणि मग वाटेल तसा आवाज शब्दाच्या स्वरूपात बाहेर पडतो. या शब्दांना काही अर्थ असतो. जी भावना अगर विचार आपल्या मनात असते, ती शब्दांच्या माध्यमाने इतरांपर्यंत पोचवितो. हे कार्य प्रत्येकजण करू शकतो आणि हे करण्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाही. म्हणूनच आपले याकडे कधी लक्षदेखील जात नाही की हे बोलणे किती मोठी बाब आहे. आपण असे लोकसुद्धा पाहिलेत, ज्यांना बोलता येत नाही. ते जन्मजात मुके असतात. आजपर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा शोध लागला नाही, ज्यामुळे जन्मजात मुक्या व्यक्तीस बोलता येणे शक्य व्हावे.
आपण आपल्या कर्णेंद्रियांनी ऐकतो, याचा अर्थ असा की इतरांच्या आवाजाचा ध्वनी कानांवर आदळतो आणि आपणास समजते की कोण काय बोलत आहे अथवा कोणते पशु-पक्षी कसला आवाज काढत आहेत, अथवा ढोल-ताशा कशा प्रकारे वाजत आहे. आपण हेसुद्धा जाणतो की जे लोक जन्मजात बहिरे असतात अथवा काहीजण नंतरच्या काळात बहिरे होतात, मात्र हरविलेली अथवा जन्मजात नसलेली दृकशक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रदान करू शकत नाही. याच प्रकारे इतर ज्ञानेंद्रियांची अवस्था आहे. अर्थात पाहणे, वास घेणे, विचार करणे, स्पर्श करणे वगैरे हे सर्वकाही अत्यंत आश्चर्यकारक कर्म आहेत की यासाठीची इंद्रियशक्ती एकदा हरविली की जगात कोणातही ही शक्ती देण्याचे सामर्थ्य नाही.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की असा हा बोलणारा, पाहणारा, ऐकणारा गंध घेणारा, विचार करणारा आणि अशा ना-ना प्रकारचे सामर्थ्य असणारा हा विलक्षण आणि विचित्र माणूस, जो असे कार्य करतो, असे प्रताप दाखवितो की माणसाची अक्कल दंग होते. अर्थातच माणसाच्या शरीराचा एकेक अवयव हेच स्पष्ट करतो की हे संपूर्ण मानवी शरीर, हे विलक्षण सामर्थ्यशाली शरीर आपोआपच तयार झालेले नसून ते अत्यंत कौशल्यवान आणि प्रचंड कला-सामर्थ्य असलेल्या, हाडाचा कारागीर असलेल्या अत्यंत बुद्धिमान निर्मात्याने निर्माण केलेले असून त्याच्यासम इतर कोणताही कारागीर असूच शकत नाही. आपल्याला हेदेखील चांगलेच माहीत आहे की माणूस मातेच्या पोटात अथवा गर्भाशयात तयार होतो. मात्र खरे सांगायचे झाले तर मातेच्या गर्भाशयाच्या अथवा माणूस तयार करणाऱ्या या कारखान्याच्या कार्यात मातेचा वाटा नसतो. अखत्यार नसतो. आपण असे म्हणू शकत नाही की आईच मुलाची निर्माती असते. याचप्रमाणे मुलाचा पितादेखील या निर्मितीकार्यात सहभागी नसतो. अर्थात मुलाचे निर्माते माता-पिता नसतातच मुळी. एका लहानशा गर्भाशयात प्रवेश करणारा अत्यंत सूक्ष्म जीव (Sperm) याला मातेच्या रक्तातून पोषक घटक प्राप्त होतात. मग खरे पाहता हे पोषक घटक पुरविणारे रक्त माता स्वत: तयार करते काय? तिला तर हेदेखील माहीत नसते की बाळाला किती प्रमाणात रक्त मिळत आहे आणि त्याची वाढ कशी होत आहे. स्त्री जे काही खाते-पिते, त्यातूनच निर्माण होणारे रक्त हळूहळू मानवी शरीराचे स्वरूप धारण करते. मग असे कोण आणि कशाच्या आधारावर म्हणू शकतो की स्वत: आई हे कार्य करीत आहे?
थोड्याशा काळात या रक्ताचा गोळा शरीराचे स्वरूप धारण करू लागतो. डोळ्यांच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान, हृदयाच्या ठिकाणी हृदय, मेंदूच्या ठिकाणी मेंदू, कानाच्या ठिकाणी कान, यकृताच्या ठिकाणी यकृत, जठराच्या ठिकाणी जठर, फुफुसाच्या ठिकाणी फुफुस, धमण्याच्या ठिकाणी धमण्या आणि मानवी शरीरास आवश्यक असणारे समस्त अवयव अगदी व्यवस्थित व नीटनेटके आपापल्या ठिकाणी तयार होतात. मग या परिपूर्ण शरीरात प्राण येतो आणि मानवात मानवी सामर्थ्य येते. मग मातेचे गर्भाशय अर्थात मानव तयार करणारा हा विलक्षण कारखाना नऊ महिन्यांनंतर बरोबर वेळेवर या अर्भकास बाहेर फेवूâन देतो. बाहेर येताच त्याचे सर्व अवयव कार्यरत होतात. पूर्वीच तयार झालेले आईच्या छातीतील दूध जे स्वत: आई तयार करीत नसते, बाळ गुटू-गुटू प्यायला लागते, श्वास घ्यायला लागते. अशाप्रकारे कोट्यवधी लोक या जगात तयार होत असतात आणि प्रत्येकाचा चेहरा-मोहरा व स्वरूप वेगळे व परस्पर भिन्न असते. प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न असते, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो, प्रत्येकाचा विचार, आवड-निवड, शक्ती, सामर्थ्य कौशल्य, पात्रता आणि भावना भिन्न असतात. या विषयावर जेवढा विचार करण्यात येईल, तेवढेच आश्चर्याचे डोंगर वाढत जाईल आणि आपल्या अंत:करणातून साद निघेल की अशा प्रकारचे विलक्षण कार्य एक प्रचंड कौशल्य-सामर्थ्य असणारा निर्माताच करू शकतो. हा निर्माता तोच अल्लाह ज्याने समस्त जगाची निर्मिती केली असून यात इतर कोणीही त्याचा भागीदार व वाटेकरू असू शकत नाही.
आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती अशी की या जगात लहान वा मोठे कोणतेही कार्य खऱ्या अर्थाने मार्गी लागत नाही. याच्या पूर्ततेकरिता एकावरच याची जबाबदारी असते. कोणत्याही राज्याला दोन राज्यपाल, दोन मुख्यमंत्री, कोणत्याही देशाचे दोन पंतप्रधान, दोन राष्ट्राध्यक्ष कधीच असू शकत नाहीत आणि अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. कारण असे असेल तर कोणतेही राज्य, कोणतेही राष्ट्र आणि कोणताही देश चालू शकत नाही. कारण कर्ताधर्ता आणि जबाबदार केवळ एकच असू शकतो. आता जर आपण आपल्या सभोवतालच्या या अतिविशाल आणि विलक्षण सृष्टीवर नजर टाकली आणि यावर जर विचार केला की ही सृष्टी कशी निर्माण झाली व कशी कार्यरत आहे, आकाशातून होणारी वर्षा, यामुळे फुलणारी, हिरवीगार होणारी वनराई, सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून पाण्याचे होणारे बाष्पीभवन, हे बाष्प वाहून नेणारे वारे, रात्रंदिवस उजाडणारी ही पृथ्वी आणि ग्रह-ताऱ्यांची भ्रमणावस्था, हे सर्वकाही घडत आहे. वैज्ञानिकांनी हेसुद्धा सांगितले आहे की वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असलेली पोषक माती तयार करण्यासाठी सूक्ष्म कृमी-कीटक कार्य करीत आहेत. ते हवेतून नायट्रोजन प्राप्त करून वनस्पतींना पुरवितात. अर्थातच जमिनीत पेरण्यात आलेले बी मोठे झुडुप आणि वृक्ष होण्यासाठी या विश्वातील समस्त ग्रह-तारे, सूर्य, चंद्र, समूह, पवन, कृमी-कीटक आणि अशा असंख्य वस्तूंना कार्य करावे लागते आणि तेदेखील अगदी वेळेवर, विनातक्रार, व्यवस्थित व नीटनेटके. जणू हे संपूर्ण कार्य एकाच शक्तिशाली सत्तेच्या इशाऱ्यावर चालू आहे.
जरा या विस्तीर्ण आकाशाकडे पाहा, निरखून पाहा. सूर्य हा अगदी निश्चित पद्धतीनुसार कार्य करीत आहे. दिवस आणि रात्र अगदी वेळेवर होत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा वेळेवर होत आहे. चंद्राचे कार्य नेमक्या पद्धतीनुसारच सुरू आहे. त्याच्या भ्रमण गतीमध्ये कसलाही फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर आकाशातील समस्त ग्रह आणि तारे जे कोट्यवधींच्या संख्येत आहेत, अगदी व्यवस्थितपणे आपापले कार्य करीत आहेत. आपापल्या भ्रमणकक्षा सोडून इतरांच्या भ्रमणकक्षेला किंचित स्पर्शसुद्धा करीत नाहीत. नसता एक-दुसऱ्यांची टक्कर होऊन छिन्नविछिन्न झाले असते. असे वाटते जणू हे सर्व ग्रह-तारे एखाद्या यंत्राच्या भागांप्रमाणे आपापले कार्य व्यवस्थितपणे करीत आहेत.
विचार करण्यासारखी बाब आहे की शेवटी हे काय प्रकरण आहे की जमिनीतून वनस्पती उगविण्यासाठी अथवा पिके उगविण्यासाठी व ती वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी व्यवस्थितरित्या घडत आहेत, समस्त वस्तू परस्पर सहकार्याने कार्य करीत आहेत. यापैकी एकही वस्तू आपले कार्य किंचितही सोडायला तयार नाही वा मुळीच हलगर्जी करीत नाही. शेवटी हे काय प्रकरण आणि कोणते गूढ आहे की या प्रचंड आणि विलक्षण विश्वरूपी कारखान्याचे समस्त कार्य वस्तूंच्या परस्पर सहकार्यातून सुरळीपतणे चालू आहे. या प्रश्नाचे केवळ एकच उत्तर असू शकते आणि ते असे की हे पूर्ण कार्य कोण्या एकाच सम्राट आणि प्रभुच्या इशाऱ्यावर होत आहे. केवळ एकाच व्यवस्थापक अर्थात अल्लाहच्या आदेशाने हे विश्व कार्यरत आहे. जर या विश्वाचे संचालक एकापेक्षा जास्त असते तर या कार्यात परस्पर सहयोग आणि सहकार्य शक्यच झाले नसते.

0 Comments