माननीय जैद बिन अरकम (र.) कथन करतात की, अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘जो माणूस शुद्ध अंत:करणाने ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (ईश्वराशिवाय कोणीच पूज्य नाही) असे म्हणतो, तो स्वर्गात दाखील होईल. लोकांनी विचारले की, ‘‘शुद्ध अंत:करणाचा अर्थ काय? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘शुद्ध अंत:करण म्हणजे, ‘कलमा-ए-तौहीद’ (एकाच ईश्वरावर संपूर्ण विश्वास असल्याचे धर्मसूत्र) उच्चारल्यानंतर तो माणूस ईश्वराच्या संपूर्ण हराम (निषिद्ध) कर्मापासून दूर असला पाहीजे. ‘तिर्मिजी’ या हदीस ग्रंथात एक प्रेषित वचन आहे की, ‘‘जो बंदा (भक्त; ईश्वराचा दास) कलमा-ए-तौहीद उच्चारील आणि मोठ्या अपराधांपासून दूर राहील, तो जन्नतमध्ये दाखल होईल. उपरोक्त प्रेषित वचने खूप महत्वाची आहेत. केवळ ‘‘ला इलाहा इल्लल्लाह’’ मुखाने उच्चारणे म्हणजे स्वर्गात दाखल होण्याची हमी नाही तर याबरोबरच ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या सरळ मार्गावर चालणे आणि मोठ्या अपराधांपासून (पापापासून) कटाक्षाने अलिप्त राहणे, स्वर्गात दाखल होण्यासाठी आवश्यक आहे. अल्लाहचे गुणवैशिष्ट्येमाननीय
अबु हुरैरा (र.) द्वारे उल्लेखित आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘सर्वश्रेष्ठ अल्लाहची नव्यान्नव नावे आहेत. जो यांना स्मरणात राखील, जन्नतमध्ये दाखल होईल.’’ (हदीस – बुखारी)

भावार्थ
‘स्मरणात राखण्याचा’ अर्थ हा की, जो मनुष्य यांच्या अर्थ व आशयाला जाणेल आणि त्यांच्या निकडीला पूर्ण करील, अर्थात माणसाने या गुणविशेषांचा प्रभाव आपल्या अंगी आत्मसात करावा आणि जीवनभर याच्या निकडीनुसार आचरण करावे. अल्लाहच्या ९९ नावांचा, गुणवैशिष्ट्यांचा तपशील जाणून घेण्याचा व त्यांच्या निकडी माहीत करून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे माणसाने पवित्र कुरआनचे पठण करावे, ज्यात अल्लाहच्या समस्त गुणवैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण आहे. तसेच त्यांच्या कोणत्या निकडी (गरज) आहेत व माणसाने यापासून कशाप्रकारे लाभ घेतला पाहिजे, हे सर्व पवित्र कुरआनमध्ये सांगितले आहे. तोच मनुष्य याचा लाभ होऊ शकतो जो पवित्र कुरआनचे पठण करण्याची सवय लावून घेईल.
अल्लाहचे काही प्रमूख गुणवैशिष्ट्यपूर्ण नावे
रब्ब
याचा अर्थ पालन पोषण करणे, यथायोग्य अवस्थेत राखणे, सर्व प्रकारच्या धोक्यापासून वाचवित आणि विकासाची सर्व साधने उपलब्ध करीत कमालीच्या दर्जाप्रत पोहोचविणे. मातेच्या उदरातील अंध:कारामध्ये अन्न, हवा आणि पाणी कोण पोहोचवितो? असा तो कोण आहे, जो माता-पिता व इतरांच्या मनात प्रेम भावना निर्माण करतो? तारुण्य आणि स्वास्थ कोणी प्रदान केले आहे? आमच्या जीवनाला योग्य स्थितीत राखण्यासाठी आणि आत्म्याच्या संगोपनासाठी त्याने आपला ग्रंथ (पवित्र कुरआन) पाठविला. जो त्याच्या समस्त उपकारांमध्ये सर्वात मोठा उपकार आहे. या उपकाराची निकड अशी की आम्ही त्या ईशग्रंथांची कदर जाणावी, आपल्या जीवनात सामावून घ्यावे आणि जे लोक याच्या अवीट गोडीपासून अपरिचित असतील तर त्यांना परिचित करावे.

अर्रहमान् अर्रहीम
हे दोन्ही शब्द रहमत (दया) शब्दापासून बनले आहेत. पहिला शब्द उत्साह, आवेग आणि वैपुण्य या अर्थाचा आहे तर दुसरा नित्यता व सातत्याचा आशय बाळगतो. रहमान तो, ज्याची दया अतिशय उचंबळणारी आहे. हवा, पाणी, अन्न व इतर सर्व गरजांची उपलब्धता याच गुणविशेषात आहे. या रहमानची सर्वात मोठी रहमत (दया) म्हणजे कुरआनचे अवतरण, रहमानने कुरआनची शिकवण दिली, मानवाला अस्तित्व प्रदान केले, मानसाला बोलण्याचे सामर्थ्य दिले. आणि रहीम तो ज्याचा दयानुक्रम कधीही संपत नाही. रहीम ज्याची दया अनुग्रह कायमस्वरूपी आहे.

अल अ़जी़ज
अर्थात सर्व सत्ताधिकारी, ज्याचा सत्ताधिकार सर्वावर वर्चस्व राखून आहे. ज्याच्या सत्ताधिकारास कोणीही आव्हान करू शकत नाही. जर तो आपल्या दासावर अनुग्रह करू इच्छितो तर कोणतीही शक्ती त्यास रोखू शकणार नाही. जर तो शिक्षा, यातना, देऊ इच्छिल तर कुठलीही शक्ती त्याच्या निर्णयाला रद्दबदल करू शकत नाही.

0 Comments