आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
इस्लाममध्ये दहशतवादाला कसलाही वादच नाही. इस्लाम शांततेचा धर्म आहे आणि शांतिच त्याला पसंत आहे. तो माणसाच्या प्राणांचा व त्याच्या मालमत्तेचा आदर करण्यास शिकवितो. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी उचित साधनांचा वापर करण्यास पाठिबा देतो.
धरणीवर बिघाड निर्माण करू नका.- सूरह : बकरा – १९ आणि जमिनीवर सुधारणा घडून आल्यानंतर तेथे बिघाड निर्माण होईल असा प्रसार करू नका, तसेच भयाने किवा लालसेने त्याला(बिघाडाला) बोलावू नका.- सूरह : आराप-५६
धरणीवर ज्या कोणी एखाद्याच्या खुनाचा बदला घेण्याखेरीज अथवा दंगल पसरविणार्याची हत्या करण्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या माणसाची हत्या केली, तर त्याने अखिल मानवजातीची हत्या करून टाकली आणि जर एखाद्या माणसाचा प्राण कोणी वाचविला तर त्याने सर्व माणसांना जिवदान दिले.’’- सूरह : माइदा – ३२
इस्लाम व दहशतवाद
संबंधित पोस्ट
0 Comments