खंदक’ (खाई) च्या युद्धप्रसंगीच ‘ज्यू’ समाजाच्या ‘कुरैज’ कबिल्याने ‘मदीना समझोता’चा करार मोडून ज्याप्रमाणे इस्लामद्रोही ‘कुरैश’जणांसह केलेला साटेलोटे जर अमलात आला असता तर आदरणीय प्रेषितांचा इस्लामी समूह, कृपा आणि न्यायाचे आंदोलन आणि ‘मदीना’ येथील एकेश्वरवादी व्यवस्था नष्ट झाली असती. अर्थातच ‘ज्यू’ समाजाने ‘मदीना समझोता’ करार मोडून शत्रूची साथ देणे ही मोठीच गद्दारी होय आणि ही गद्दारी खपवून घेण्यासारखी मुळीच नव्हती.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या इशार्यावर प्राण पणाला लावणारे त्यांचे सैनिक अत्यंत थकलेल्या अवस्थेत घरी परतले. आपले हत्यार टांगले आणि स्नान केले. एवढ्यात प्रेषितांना दैवी आदेश झाला आणि त्यांनी आपले लष्कर परत जमा केले. बर्याच सैनिकांनी आपले हत्यार आणि सामरिक पोषाख अंगावरून काढून ठेवला ही नव्हता की, प्रेषितांचा आदेश मिळताच प्रेषितांच्या नेतृत्वाखाली ‘कुरैजा’ कबिल्याकडे कूच केले. ‘कुरैजा’ कबिल्याचे लोक तत्काळ किल्यात शिरले व किल्याचे सर्व दरवाजे त्यांनी आतून बंद करून घेतले. मुस्लिम सैन्याने या किल्ल्यास वेढा दिला. २५ दिवस लोटल्यावर ‘कुरैज’ कबिल्याच्या लोकांनी आत्मसमर्पण केले. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्याशी बोलणी केल्यावर त्यांच्या आवडीनुसार ‘माननीय साद बिन मुआज(र)’ यांना मध्यस्थ बनविले आणि दोन्हीं पक्षांकडून त्यांच्यावर निर्णय सोपविला. ‘माननीय साद(र)’ यांनी ‘ज्यू’ च्या ‘तौरात’ या धर्मग्रंथानुसार निर्णय दिला. या निर्णयात एक धारा अशीदेखील होती की, लढण्यायोग्य असलेल्या सर्व तरूणांना मृत्युदंड देण्यात यावा आणि अशा प्रकारे या द्वेषभावाचा नायनाट झाला.
आता आपण विभिन्न लष्करी कारवायांचा उल्लेख करु या.
‘माननीय मस्लिमा अनसारी(र)’ हे तीस स्वारसह गस्त घालीत असताना त्यांची ‘नज्द’ येथील सरदार ‘सुमामा’ शी चकमक झाली आणि त्यांनी या प्रभावी विरोधकास अटक करून प्रेषितांसमोर हजर केले. ‘सुमामा’ने प्रेषितांना स्पष्ट शब्दांत सांगितले,
‘‘हे मुहम्मद(स)! तुम्ही जर माझी हत्या केली तर निश्चितच ती एका योग्य माणसाची हत्या होईल. जर जीवदान दिले तर निश्चितच एका उपकाराची जाण ठेवणार्या माणसास जीवदान मिळेल आणि जर माझ्या बदल्यात संपत्ती पाहिजे असेल तर तुम्ही सांगाल तेवढी संपत्ती देऊन टाकीन!’’
आदरणीय प्रेषितांनी त्याची स्पष्टोक्ती पाहून त्यास आदरासहित सोडून दिले. ‘सुमामा’ प्रेषितांच्या या उदार आणि निःस्वार्थी स्वभावाने खूप प्रभावित झाला आणि प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेऊन म्हटले,
‘‘आजघडीच्या पूर्वी प्रेषित मुहम्मद(स) पेक्षा जास्त कुणाशीच वैर बाळगत नव्हतो. परंतु आज प्रेषितांवरील प्रेमापेक्षा जास्त प्रेम कुणावरच नाही.’’ इस्लाम स्वीकारताच ‘सुमामा(र)’ यांनी थेट मक्का जाऊन घोषणा केली की, ‘‘आजपासून तुम्हाला ‘नज्द’कडून अन्नाचा एक दाणाची मिळणार नाही.’’ (‘नज्द’ च्या भागातून मक्का शासनास खंडणी मिळत असे)
‘इजीअ’ येथील ज्या लोकांनी शिक्षकवृदांची धोक्याने हत्या केली होती, त्यांना धडा शिकविण्यासाठी प्रेषितांनी दोनशे सैनिकांसह ‘रजीअ’कडे कूच केले. परंतु त्यांनी तेथून आधीच पळ काढल्यामुळे ते प्रेषितांच्या हाती लागले नाहीत.
मदीना शहरापासून एक मैल अंतरावर एक पाण्याचा झरा होता. (आजही आहे) त्याच्या आसपास गुरे चरण्याचे सरकारी गायरान होते. ‘उसफान’चा एक माणूस गुरांची देखभाल करण्यासाठी नियुक्त करण्यात आला होता. ‘रबाह’ नावाच्या एका नोकरास त्याची खबर आणण्यासाठी पाठविण्यात आले. ‘सलमा बिन अकवा’ हे सैनिकसंरक्षक होते. ते कामावर जात असताना सकाळी सकाळी ‘उयेना बिन फजारी’ याने उंटावर दरोडा घातला. गुरांची देखभाल करणार्याची हत्या केली आणि त्याच्या पत्नीसही बळजबरी उचलून नेले. ‘सलमा’ यांनी जेव्हा या लूटमारीचे दृष्य पाहिले, तेव्हा ते तत्काळ मदीनाकडे धावले आणि मदीनावासीयांना हाक देऊन ‘रबाहा’ या नोकरास कुमक घेऊन येण्याचे आदेश दिले आणि एकटेच त्या डकाइताचा पाठलाग करण्यासाठी धावले. त्यांनी बाणांचा निशाना साधत दरोडेखोरांच्या टोळीच्या एकेकास टिपून ठार केले. रस्ता पर्वतमय होता. डकाइतांची नजर चुकविताना ते बाण सोडून टेकड्यांच्या मागे लपत होते. हे गोरिला युद्धाचे एक उत्तम उदाहरण होते. दरोडेखोरांना वाटले की, कदाचित सैन्य आपल्यामागे लागले आहे. त्यांनी घाबरून जाऊन सर्व उंट सोडून पळ काढला. एवढ्यात प्रेषित मुहम्मद(स) हेदेखील कुमक घेऊन पोहोचले. ‘माननीय सलमा(र)’ म्हणाले,
‘‘माझ्याबरोबर शंभर सैनिक दयावेत. मी या सर्व दरोडेखोरांचा खात्माच करून येतो.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘ईश्वराने तुम्हाला विजय प्रदान केलाच आहे, तेव्हा थोड्या नरमाईचा व्यवहार करा!’’
अर्थातच इस्लामी आंदोलनकर्त्यांच्या नसनसात प्रेरणा भरलेली होती. अशा प्रकारे प्रेषितांनी काही छोट्याछोट्या तुकड्या सभोवतालच्या भागातही रवाना केल्या. उदाहरणार्थ, ‘असद’ कबिला, ‘सालबा’ कबिला आणि ‘साद बिन बक्र’ कबिल्यावर विजय मिळविला.
इस्लाम द्रोहयांशी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काही लष्करी कारवाया
संबंधित पोस्ट
0 Comments