इस्लाम आदर्श समाजाची निर्मिती करतो. तिथे शांति व स्वास्थ्य असते. तेथे उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता जात-पात किवा श्रीमंत-गरिबात कसलाही भेदभाव अगर पक्षपात केला जात नाही. तेथे माणूस दुसर्या माणसांचा दास नसतो. प्रत्येकाला खरेखुरे स्वातंत्र्य प्राप्त असते. प्रत्येक माणूस ताठ मानेने व अभिमानाने चालू शकतो. कोणीही भुकेलेला, उघडा-नागडा अथवा निराधार नसतो. लोक एकमेकांना आश्रय देणारे असावेत. प्रत्येकाला न्याय मिळावा. महिलांना आदर-प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना पुरुषांच्या कामवासनेला बळी पडावे लागू नये. अवैध कृत्ये करणार्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. तेथे नीतीमूल्यांचा आदर केला जातो. तेथे तरुणाचे चारित्र्य विश्वास ठेवण्यासारखे असते आणि ते विधायक कार्यात गढलेले असतात. तेथे भलेपणाच्या कामात चढाओढ केली जाते आणि माणसे स्वच्छतेच्या आणि परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असतात.
इस्लाम कसा माणूस घडवितो?
माणसाला सज्जन करण्यासाठी इस्लामपेक्षा अधिक चांगली कोणतीही जीवन व्यवस्था नाही. इस्लाम माणसाला त्याचे अचूक स्थान दाखवून देतो, त्याच्या महानतेचे रहस्य त्याला उलगडून दाखवितो, त्याच्या जबाबदारीची त्याला आठवण करून देतो आणि त्याच्यातील चेतना जागृत करतो. त्याला या गोष्टीची आठवण करून देतो की विशिष्ट उद्दिष्टासाठी त्याला जन्माला घातले गेले आहे. त्याला निरर्थक जन्माला घातले गेले नाही. या जगातील जीवन सुख-विलासासाठी नाही. आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशेब आपल्या स्वामीला द्यावा लागणार आहे. तेथे नीट विचार करून प्रत्येक कृती करायला हवी.
आमच्या येथील कृत्यामुळे समाजात सुगंधही पसरू शकतो आणि दुष्कृत्यांमुळे हे जीवन एक शापही ठरू शकते. इस्लाम जो माणूस घडवितो तो इतरांचा आदर करणारा, सत्यावर अढळपणे राहाणारा, आपल्या वचनांचे पालन करणारा, दुर्बलांचा त्राता व आश्रयदाता बनणारा आणि सत्कृत्यात नेहमी पुढाकार घेणारा असतो. तो स्वतःही दुष्कृत्यांपासून दूर राहातो आणि इतरांनाही तो दुष्कृत्यांपासून रोखत असतो. इस्लामी आदर्शाच्या मुशीतून बाहेर पडलेला माणूस सदाचाराचे प्रतीक व दुराचाराचा शत्रू असतो.
शेवटची गोष्ट
इस्लामच्या या संक्षिप्त परिचयाने, त्याचा अर्थ व जीवनाकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्या समोर येतो. धर्म पुरातन काळापासून आहे, हे तथ्यही स्पष्ट होते. ईश्वराने जेव्हा जेव्हा आपले प्रेषित धाडले, तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोचविला. सर्व ईश्वरी ग्रंथांपैकी फक्त कुरआनच आपल्यापाशी शाबूत व सुरक्षित आहे. तसेच सर्व धर्मगुरुंपैकी केवळ मुहम्मद(स.) चे जीवन चरित्र सविस्तरपणे आमच्यापाशी आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणाला अशी धाव घेतली पाहिजे, जशी एखाद्या हरवलेल्या व नंतर सापडलेल्या वस्तूकडे आपण आकर्षिले जातो. सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळू शकते, पण आपण परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे. शेवटी प्रेषित युसुफ(अ.) ची गोष्ट सांगून माझे मनोगत संपवू इच्छितो, ती गोष्ट त्यांनी बंदिवासात आपल्या साथीदारांना सांगितली होती. त्यांनी सांगितले होते.
ईश्वराशी कोणाला भागिदार ठरविणे, हे आपले काम नव्हे. खरे तर ईश्वराची आम्हांवर व सर्व लोकांवर मोठी कृपा आहे(की त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही दास आम्हाला केले नाही.) परंतु अधिकांश माणसे कृतज्ञता दर्शवीत नाहीत. हे तुरुंगातील सोबत्यांनो! तुम्ही स्वतःच विचार करा, भिन्न भिन्न अनेक स्वामी चांगले आहेत की एकच स्वामी, ज्याचे सर्वांवर प्रभुत्व आहे, तो अधिक चांगला आहे? त्याला सोडून तुम्ही ज्यांचे दास्यत्व करीत आहात, ज्यांना तुमच्या पूर्वजांनी नावे दिली आहेत; या शिवाय त्याचे महत्व दुसरे काहीच नाही. आणि अल्लाहने त्यासाठी कसलीही सनद पाठविलेली नाही. शासन करण्याची सत्ता अल्लाहखेरीज अन्य कोणाच्याही हाती नाही. खुद्द त्याचाच आदेश आहे की त्याच्याखेरीज तुम्ही अन्य कोणाचेही दास्यत्व करू नये. हीच थेट व सरळ जीवनप्रणाली आहे, परंतु अधिकांश हे तथ्य जाणत नाहीत.- सूरह : अल् युसुफ – ३८ ते ४०
इस्लाम कोणता समाज निर्माण करतो?
संबंधित पोस्ट
0 Comments