Home A इस्लामी व्यवस्था A इस्लामी न्याय व्यवस्था

इस्लामी न्याय व्यवस्था

Islamic Law
न्याय म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे. अन्यायग्रस्ताला वस्तुतः न्यायाची खरी व्याख्या ताबडतोब समजते. परिभाषा करायची असेल तर दोन वस्तु अगदी तंतोतंत समान प्रमाणात वाटणे म्हणजे न्याय, अर्थात अफरातफरीमध्ये समतोल कायम करणे म्हणजेच कायद्याच्या भाषेत न्याय होय. दुसर्या भाषेत असे की एखाद्या प्रकरणात सत्यानुसार निवाडा करण्यात यावा.
कोणत्याही समाजाची सामाजिक बंधने अबाधित ठेवायची असेल तर न्याय हाच मूळ आधार होय. या शिवाय समाजव्यवस्था टिकू शकत नाही. हेच कारण आहे की समाज आणि राज्य टिकविण्यासाठी इस्लामने न्यायव्यवस्थेला असे महत्त्व दिले, जे इतर कोणत्याच धर्मात देण्यात आले नाही. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘ईश्वर न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नहल – ९०)
न्यायपूर्ण वर्तन हेच ईशपरायणतेचा परमोच्च दर्जा असल्याचे कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ईश्वरासाठी सत्यावर अढळ राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा – ८)
न्याय स्थापन करण्याचे विविध प्रसंग असतात. पहिल्या प्रसंगी मानवाने स्वतः आपल्यावरच न्याय स्थापन करावा. याचा अर्थ असा आहे की त्याने इतरांसाठीही तेच पसंत करावे, जे स्वतःसाठी करतो. त्याच प्रमाणे स्वतःच्या अधिकारांइतकीच त्याला इतरांच्या अधिकारांचीही जाणीव असावी. म्हणून कुरआनात ही बाब सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे की, न्यायाची स्थापना करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःवर आणि आपल्या नातलग आणि सगेसोयर्यांवर स्थापन करा. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहणारे आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. यद्यपि तुमच्या न्यायाचा आणि तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो वा गरीब, ईश्वर तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली, तर समजून असा की जे काही तुम्ही करता, ईश्वराला त्याची पूर्ण माहिती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा – १३५)
हीच गोष्ट प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अशाप्रकारे वर्णन केली आहे,
‘‘शपथ आहे त्या ईश्वराची, ज्याच्या हाती माझे प्राण आहे, ती व्यक्ती श्रद्धावंत(मुस्लिम) असूच शकत नाही, जो आपल्या शेजार्यासाठी तीच बाब पसंत करीत नाही, जी स्वतःकरीता पसंत करते.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह – मुस्लिम)
नेमक्या याच विचारसरणीचा अभाव असल्याचे आज पूर्ण समाजात आणि जगामध्ये अरेरावी माजली आहे. इतरांची चिता जळू द्या, मात्र आपली पोळी तुपात भाजली पाहिजे, या आधुनिक काळातील विचारसरणीमुळे असंख्य जणांचे अधिकार पायदळी चिरडले जात आहेत. यातूनच गुन्हेगारीचे अक्राळविक्राळ राक्षस न्याय, मानवता आणि नैतिकताचा बळी घेत आहे. मात्र इस्लामच्या या मोजक्या विचारसरणीचा अवलंब केला तर निश्चितच गुन्हेगारीवर आळा बसेल आणि मानवतेला अन्यायास बळी पडून न्यायासाठी दारोदार ठेचाळत हिडण्याची दुर्दैवी पाळी येणार नाही.
न्याय स्थापन करण्याचा दुसरा प्रसंग हा राज्य अगर शासन होय. राज्यशासनानुसार न्याय स्थापन करता येते, मात्र हे लक्षात असावे की, याआधारावर शासन स्थापन जर करायचे असेल तर शासकाने स्वतः आपल्यावर न्यायाची स्थापना करावी. प्रेषित मुहम्मद(स.) आणि सुरुवातीच्या काळातील चारीही इस्लामी शासकांची न्यायव्यवस्था हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे स्वतः सक्तीने यावर कार्यरत होते.
संबंधित पोस्ट
November 2024 Rabi'al Thani 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *