Home A प्रवचने A इस्लामचा मौलिक आदर्श

इस्लामचा मौलिक आदर्श

Quran
अल्लाह आपल्या पवित्र ग्रंथात आदेश देतो,
“सांगा, माझी नमाज, माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती, माझे जीवन व मरण, सर्वकाही समस्त विश्वांचा स्वामी अल्लाहसाठीच आहे. ज्याचा कोणीही भागीदार नाही. अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकविणारा मीच आहे.”
(कुरआन-६:१६२-१६३) या आयतीचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या कथनाने होते,
“ज्याने एखाद्याशी मैत्री व प्रेम केले तर ते अल्लाहसाठी आणि वैर केले तर अल्लाहसाठी आणि कुणाला दिले तर ते अल्लाहसाठी व एखाद्याला नकार दिला तर ते अल्लाहसाठी. अशा प्रकारे त्याने आपला ईमान पक्का केला म्हणजे तो पूर्णपणे मुस्लिम झाला.”
जी आयत मी आपल्यासमोर प्रस्तुत केली त्यावरून असे कळते की इस्लामची अशी अपेक्षा आहे की माणसाने आपली उपासना आणि आपल्या जीवन व मृत्यूला केवळ अल्लाहसाठी विशिष्ट करावे आणि अल्लाहशिवाय कोणासही त्यात सहभागी करू नये, म्हणजे उपासना व त्याचे जीवन व त्याचे मरणे अल्लाहशिवाय अन्य कोणासाठी असू नये.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वाणीचे जे स्पष्टीकरण मी आपणास ऐकविले त्यावरून असे समजते की माणसाचे प्रेम व शत्रुत्व आणि आपल्या ऐहिक जीवनातील व्यवहारात त्याची देवाण-घेवाण केवळ अल्लाहसाठीच असणे ही ईमानची निकड आहे. त्याशिवाय ईमानला पूर्णत्व प्राप्त होत नाही, मग उच्च दर्जा प्राप्त होण्याची कवाडे खुली होण्याची गोष्टच कशाला? जितकी कमतरता यात या बाबतीत होईल तितकीच उणीव माणसाच्या ईमानमध्ये असेल. आणि जेव्हा अशा प्रकारे मनुष्य पूर्णपणे अल्लाहचा होईल तेव्हा कुठे जाऊन त्याचा ईमान पूर्ण होईल.
काही लोकांचा असा समज आहे की अशा प्रकारच्या गोष्टी केवळ श्रेष्ठ दर्जाचे द्वार उघडे करतात, नाहीतर ईमान व इस्लामसाठी माणसात ही स्थिती उत्पन्न होण्याची अट नाही. अन्य शब्दांत याचा अर्थ असा की या स्थितीशिवायदेखील मनुष्य मुस्लिम असू शकतो. परंतु हा चुकीचा समज आहे व हा चुकीचा समज उत्पन्न होण्याचे कारण असे आहे की सामान्यत: लोक (इस्लामी) धर्म शास्त्रीय व कायदेशीर इस्लाम आणि त्या वास्तविक इस्लाममध्ये जो अल्लाहच्या दृष्टीने विश्वसनीय आहे, फरक करीत नाहीत.
संबंधित पोस्ट
November 2025 Jamadi'al Ula 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 6
28 7
29 8
30 9
31 10
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 30
21 Jamadi'al Thani 1
22 2
23 3
24 4
25 5
26 6
27 7
28 8
29 9
30 10

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *