उपरोक्त दुसऱ्या आयतीमधील पहिल्या भागात धर्मपरायणता व ईशभयाची विशेष शिकवण देण्यात आली. धर्मपरायणतेचा हक्क असा की, अल्लाहचे आज्ञापालन करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि अगदी अंतिम श्वासापर्यंत याच पद्धतीने जीवन व्यतीत करावे.
अर्थात आपण इस्लामकरिता जीवन समर्पित करावे. व्यक्तिगत व सामूहिक जीवनात, घरात किंवा घराबाहेर, हवेतील किंवा पाण्यावरील प्रवासात प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळेस आम्ही अल्लाहचे सच्चे दास व पैगंबर मुहम्मद (स.) याचे अनुयायी आहोत. जोवर शक्य आहे आपल्या सर्व पात्रता अल्लाहच्या दासत्वासाठी समर्पित कराव्यात आयतच्या दुसऱ्या भागात ईशआज्ञाधारकतेची नीती जीवनाच्या शेवटापर्यंत कायम राहावी. मृत्यूदूत जेव्हा कधी येईल तेव्हा आम्हाला त्याने धर्मपरायण व ईशपरायणशील पाहावे आणि आम्ही आपल्या पालनकर्त्याचे दासत्व करत करत त्याच्यासमोर हजर व्हावे. याचा अर्थ हासुद्धा आहे की जेव्हा इस्लाम आणि प्राण यापैकी एक निवडण्याचा प्रसंग आल्यास डोळे झाकून इस्लामची निवड करावी. शाश्वत प्रकोप व शिक्षेला कारणीभूत कुफ्र (द्रोह) व विरोधकाच्या स्थितीत मरण आहे आणि त्या मरणापेक्षा श्रेष्ठ मरण दुसरे नाही जे अल्लाहसाठी आणि अल्लाहच्या मार्गात येते. शहीद मरताक्षणी जन्नत प्राप्त करतो. शहादत श्रद्धावंतांचे जीवन ध्येय आहे. शहादाची (वीरमरणाची) तर अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांची सुद्धा कामना होती.
0 Comments