पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे,
“तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वत:ला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

0 Comments