1. अल्फातिहा
परिचय
शीर्षक :
या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव “अल्फातिहा’ त्यातील तपशीलाच्या अनुषंगाने आलेले आहे. “फातिहा’ एखाद्या कार्याच्या शुभारंभाला अथवा ग्रंथाच्या प्रारंभाला म्हटले जाते. दुसऱ्या शब्दांत यास ग्रंथाचा प्रारंभ (प्रस्तावना) म्हटले जाते.
अवतरण काळ :
कुरआनचा हा सूरह (अध्याय) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाच्या प्रारंभकाळात अवतरित झालेला आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे स्पष्ट होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर सर्वप्रथम पूर्णरुपेण अवतरित अध्याय हाच आहे. या अगोदर फक्त वेगवेगळी वचने (आयत) अवतरित झाली होती जे अध्याय “अलक’, “मुजम्मिल’ आणि “मुदस्सिर’ यात समाविष्ट आहेत.
विषय :
खरे तर हा अध्याय एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना अल्लाहने त्या प्रत्येक मनुष्याला शिकविली आहे जो दिव्य कुरआन अध्ययन प्रारंभ करतो आहे. दिव्य कुरआनच्या प्रारंभी या सूरहला (अध्यायाला) निश्चित करण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही या ग्रंथापासून लाभ घेऊ इच्िछता तर सर्वप्रथम अल्लाहशी ही प्रार्थना करा. स्वभावत: मनुष्य प्रार्थना त्या गोष्टीसाठी करतो जिला प्राप्त करण्याची त्याची मनोमन इच्छा असते आणि त्याच विभूतिकडे करतो जिच्याकडून आपल्या अपेक्षेची परिपूर्त होण्याची त्याला खात्री असते. कुरआनने प्रारंभी या प्रार्थनेची शिकवण देऊन मनुष्याला जणूकाही सावध केले आहे की सत्य जाणून घेण्यासाठीच सत्यशोधक वृत्तीने या ग्रंथाचे पठण करावे. प्रथमत: मनुष्याने याची खूणगाठ मनात बांधून घेतली पाहिजे की ज्ञानाचा मूळ स्त्रोत एकमेव अल्लाह आहे. म्हणून मार्गदर्शनासाठी अल्लाहजवळ प्रार्थना करूनच दिव्य कुरआन अध्ययन करावे.
या विषयावरून हेच सिद्ध होते की दिव्य कुरआन आणि सूरह अल्फातिहा या दोहोतील वास्तविक संबंध ग्रंथ आणि त्याच्या प्रस्तावनेचा प्रथम सूरह (अध्याय) नसून एक प्रार्थना आणि प्रार्थनेला दिलेल्या उत्तरासमान आहे. “सूरह अल्फातिहा’ ईशदासाने केलेली एक प्रार्थना आहे आणि प्रार्थनेचे अल्लाहाने दिलेले उत्तर म्हणजेच दिव्य कुरआन आहे. दास प्रार्थना करतो, “हे अल्लाह, तू माझे मार्गदर्शन कर.’ उत्तरादाखल अल्लाह पूर्ण कुरआन दासापुढे ठेवतो आणि सचेत करतो, “”हाच तो सरळ मार्ग आणि मार्गदर्शन आहे ज्यासाठी तू माझ्यायाजवळ प्रार्थना केली आहेस.”
[next]
१. अलफातिहा
(१) स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे२ जो सर्व सृष्टीचा रब (पालनकर्ता)३ आहे. (२) एकमात्र असीम करुणामय आणि परम दयावंत,४ (३) निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.५
१) इस्लाम मनुष्याला ज्या संस्कृतीचे धडे देतो त्यापैकी एक नियम हासुद्धा आहे की, मनुष्याने आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात अल्लाहच्या नावाने करावी.
२) हा अध्याय एक प्रार्थना आहे. मात्र ही प्रार्थना त्या अस्तित्वाचे स्तुतीगान करून होत आहे ज्याच्याकडे मनुष्य याचना करीत आहे. प्रार्थना करण्याच्या योग्य पद्धतीचीच ही शिकवण आहे. म्हणजे ज्याच्याशी प्रार्थना केली जात आहे त्याची सर्वप्रथम स्तुती आणि प्रशंसा केली जावी. त्याचे गुण, कृपा आणि श्रेष्ठत्व स्वीकार करावे. “”स्तुती तर फक्त अल्लाहसाठीच आहे” असे सांगून एक मोठे वास्तव स्पष्टि करण्यात आले आहे. जगात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात सौंदर्य दिसते व श्रेष्ठत्व व प्रभुत्वाची प्रचिती होते; त्या सर्वांचा मूळ स्त्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रशंसा आणि स्तुतीला पात्र तोच निर्माता आहे, निर्मिती मुळीच पात्र नव्हे. सामर्थ्य व श्रेष्ठत्व प्रदान करणारा अल्लाह स्तुतीला पात्र आहे.
३) “रब’ हा शब्द प्रयोग अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयुक्त आहे. 1) मालक व स्वामी 2) पालनपोषण, खबरगिरी व देखभाल करणारा, 3) शासक, प्रशासक, स्वामी, व्यवस्थापक. अल्लाह या सर्व अर्थाने सृष्टिचा “रब’ आहे.
४) अल्लाहचे स्तुतीगान करताना “रहमान’ (परम कृपाळू) यानंतर पुन: रहीम (परम दयाळू) या शब्दाचा प्रयोग यासाठी केला आहे की, अल्लाहची कृपा अनंत आहे. दया असीम आहे.
५) अल्लाहचे स्तुतीगान असीम दयाळु व कृपाळु असे केल्यानंतर अल्लाह न्याय-निवाड्याच्या (अंतिम) दिवसाचा स्वामी आहे, असे म्हटले गेले आहे. यावरून हेच स्पष्टि होते की अल्लाह फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो न्यायीसुद्धा आहे. न्याय देणारासुद्धा असा की अंतिमदिनी न्याय-निवाडा करण्याचा पूर्ण अधिकार त्याच्याच हातात असेल. म्हणून आम्ही अल्लाहशी फक्त प्रेमच करीत नाही तर त्याच्या न्यायी गुणवैशिष्ट्यांमुळे त्याचे भय बाळगून आहोत.
[next]
(४) आम्ही तुझीच इबादत (उपासना)६ करतो आणि तुजपाशीच मदत मागतो.७
(५) आम्हाला सरळ मार्ग दाखव.८ (६) त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस.९ (७) जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.१०
६) “इबादत’ (उपासना, भक्ती) हा शब्दसुद्धा अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयोग केला जातो. १) उपासना, पुजाअर्चा, २) आज्ञापालन, ३) दास्यत्व व गुलामी. येथे हे तिन्ही अर्थ अपेक्षित आहेत. म्हणजे आम्ही तुझे उपासक, आज्ञाधारक आणि गुलामसुद्धा आहोत.
७) म्हणजे आम्ही आमच्या गरजपूर्तसाठी तुझ्याकडेच रुजू होतो. केवळ तुझ्याच मदतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. याच कारणास्तव आम्ही विनंतीसह तुझया सेवेत हजर होत आहोत.
८) म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचार, विचार व वागणुकीचा असा मार्ग आम्हाला दाखव जो निव्वळ सत्य असावा. ज्यावर चालून आम्ही आमच्या जीवनात वास्तविक सफलता आणि सौभाग्य प्राप्त करू शकावे.
९) हा तो सरळ मार्ग आहे ज्याचे ज्ञान आम्ही अल्लाहजवळ मागत आहोत. तो सरळ मार्ग जो तुझया प्रियजनांनी अंगीकारला आहे.
१०) “अनुग्रह’ म्हणजे खरी आणि शाश्वत कृपा आहे जी सरळ मार्गावर चालून आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करूनच मनुष्याला मिळते. तो क्षणिक आणि दिखाव्याचा अनुग्रह नव्हे जो मार्गभ्रष्ट लोकांना जगात मिळतो आणि पूर्व फिरऔन, नमरूद आणि कारूनसारख्या अनेक अत्याचारींना मिळाले आहेत आणि आजही आमच्या डोùयांदेखत मोठमोठया अत्याचारींना, दुष्टांना आणि मार्गभ्रष्ट लोकांना मिळत आहेत.
[next]
२. अल्बकरा
परिचय
शीर्षक :
या अध्यायाचे नाव “बकरा’ यासाठी आहे की यात एके ठिकाणी गाईचा (बकरा) उल्लेख आला आहे. “बकरा’चा अर्थ होतो गाय. दिव्य कुरआनच्या प्रत्येक अध्यायात (सूरह) अनेक विषय आल्यामुळे त्या प्रत्येकाचे विषयानुरूप नामकरण अशक्य आहे. यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनात कुरआनच्या बहुतेक अध्यायासाठी (सूरह) विषयानुसार शीर्षक देण्याऐवजी प्रतिकात्मक नावे निश्चित केली आहेत ज्यामुळे अध्याय ओळखले जाते. या अध्यायाला (सूरह) “बकरा’ हे नाव देण्याचा अर्थ हा मुळीच नाही की यात गाईविषयी तपशील आला आहे तर फक्त हाच अर्थ आहे की तो सूरह (अध्याय) ज्यात गाईचा उल्लेख आला आहे.
अवतरण काळ :
या अध्यायाचा (सूरह) बहुतांश भाग मदिनेला हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर “मदनीकाळा’च्या प्रारंभी अवतरित झाला आणि कमी भाग नंतर अवतरित झालेला आहे. परंतु विषयानुकूल यात समाविष्ट केला आहे.
पाश्र्वभूमी :
या अध्यायाला समजून घेण्यासाठी प्रथमत: याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
१) “हिजरत’पूर्व मक्का शहरात इस्लामचे आवाहन प्रामुख्याने अरब अनेकेश्वरवादी लोकांसाठी होते. हे आवाहन त्या लोकांसाठी नवीन व अनोळखी असे होते. हिजरतनंतर आता संबंध यहुदी लोकांशी आला. हे यहुदी लोक एकेश्वरत्व, प्रेषित्व, परलोकत्व, दिव्यप्रकटन, फरिश्ते आणि ईशग्रंथाशी परिचित होते. तत्वत: त्यांचा दीन (धर्म) इस्लामच होता ज्याची शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत होते. परंतु शतकानुशतकात झालेल्या फेरबदलाने व विकृतीने त्या लोकांना खऱ्या धर्मापासून फार दूर हाकलून दिले होते. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे आल्यानंतर अल्लाहने आदेश दिला की त्यांना (यहुद्यांना) सत्यधर्माचे (इस्लामचे) आवाहन द्या. म्हणून या अध्यायातील प्रारंभीच्या एकशे एक्केचाळीस (१४१) आयती या विषयाशी निगडीत आहेत.
२) मदीना येथे पोहचल्यानंतर “इस्लामी आंदोलन’ एका नव्या स्थितीला सामोरे जात होते. मक्केतील कार्य फक्त इस्लामी मूलतÎवांचा प्रचार आणि नवमुस्लिमांचे नैतिक प्रशिक्षणापुरतेच
0 Comments