माननीय मुतरीफ बिन अब्दुल्लाह बिन शिख्खीर त्यांच्या पित्याच्या माध्यमातून निवेदन करतात.
त्यांनी सांगितले, ‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झालो त्या वेळी ते नमाज अदा करीत होते आणि पैगंबरांच्या हृदयातून अशा प्रकारे आवाज येत होता ज्याप्रमाणे उकळत्या भांड्यातून आवाज निघतो. अर्थात, पैगंबर रडत होते.’’(हदीस : मुसनद अहमद, नसई)
स्पष्टीकरण
अबू दाऊदचे हदीसकथन आहे,
‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अदा करताना पाहिले. त्या वेळी रडताना त्यांच्या छातीतून पिठाच्या गिरणीसारखा आवाज येत होता.’’
नमाजमध्ये ईशभयामुळे रडण्याने तसेच हुंकार भरण्याने नमाज व्यर्थ जात नाही. परंतु एखादा मनुष्य शारीरिक पीडा व कष्टामुळे मोठ्या आवाजात रडत असेल किंवा हुंदका देत असेल तर नमाज तुटेल. (हिदाया)
0 Comments