माननीय अब्दुल्लाह बिन औफ (रजि.) यांचे कथन आहे, ‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) ईशस्मरणात अधिक मग्न होत असत. ते व्यर्थ व अनावश्यक गोष्टी बोलत नसत. नमाज अदा करताना अधिक वेळ आणि अभिभाषणासाठी कमी वेळ खर्च करीत असत. विधवा व गरिबांसोबत चालण्यात त्यांना लाज वाटत नसे आणि त्यांच्या गरजा ते पूर्ण करत असत.’’ (हदीस : नसई, दारमी)
स्पष्टीकरण
‘व्यर्थ व अनावश्यक गोष्टी बोलत नसत’ अरबीत ‘कलील’ हा शब्द ‘अगदी स्पष्ट निषेध’च्या अर्थात वापरला जातो. उदा. कुरआनमध्ये आले आहे, ‘‘ते बिल्कुल ईमानधारक नव्हते.’’ काही टीकाकारांनी अनुवाद केला, ‘‘ते व्यर्थ गोष्टी कमी प्रमाणात बोलत.’’ येथे व्यर्थ गोष्टींशी त्यांना तात्पर्य भौतिक गोष्टी आहेत. परंतु भौतिकतेशी संबंध ठेवणाऱ्या आवश्यक गोष्टींना व्यर्थ म्हटले जाऊ शकत नाही. परंतु ईशस्मरणाच्या तुलनेत उपलक्षत: त्यांना व्यर्थ म्हटले जाते. अन्यथा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून व्यर्थ गोष्टी कधीच निघत नसत. पैगंबरसोबती (साथीदार) विषय कुरआनोक्ती आहे, ‘‘जे व्यर्थ गोष्टींपासून अलिप्त राहतात.’’ अशा स्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी कोणी व्यर्थ गोष्टीची कल्पनासुद्धा करू शकत नाही.
0 Comments