Home A प्रवचने A वैमनस्याची चिन्हे

वैमनस्याची चिन्हे

१) मनाची गुलामी
 जर एखाद्या माणसाने असे म्हटले की अल्लाह व पैगंबर (स.) यांचा आदेश असा आहे, तर असू द्या. माझे मन ते मान्य करीत नाही. मला तर यात नुकसान दिसते. म्हणून मी  अल्लाह व पैगंबर (स.) यांचे म्हणणे न ऐकता मी माझ्या मते चालीन, तर अशा माणसाचे मन ईमान (विश्वास) पासून रिक्त असेल. तो मुसलमान नव्हे तर तो ढोंगी आहे जो तोंडाने  तर सांगतो की मी अल्लाहचा दास व पैगंबरांचा अनुयायी आहे. परंतु वास्तविकतः तो आपल्या मनाचा गुलाम व आपल्या मनाचा अनुयायी आहे.

२) रीति रिवाजांचे बंधन

. अशाचप्रकारे जर एखादा मनुष्य असे सांगतो की अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा काहीही असो, परंतु अमुक गोष्ट तर वाड-वडिलांपासून चालत आली आहे. ती कशी सोडता येईल?  अथवा अमुक कायदा तर माझ्या घराण्यात अथवा भाऊकीत ठरविला आहे तो कसा मोडता येईल? तर अशा माणसाची सुद्धा ढोंगी लोकांत गणना होईल, मग नमाज पढून पळून त्याच्या  कपाळावर कितीही मोठा घट्टा पडलेला का असेना आणि दर्शनी त्याने कितीही धर्मानुकूल चेहरा बनविला का असेना, त्याला कारण असे की धर्माच्या मूळ तथ्यांनी त्याच्या हृदयाचा ठाव  घेतला नाही. रुकूअ (वाकलेल्या स्थितीत गुडध्यावर हात ठेऊन थांबणे), सिजदे (जमिनीवर मस्तक टेकणे) आणि उपवास व हजचे नाव धर्म नव्हे. त्याशिवाय माणसाचा चेहरा व त्याच्या  पोषाखात सुद्धा धर्म असत नाही तर मुळात अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आज्ञापालन करण्याचे नाव धर्म (दीन) आहे. जो मनुष्य आपल्या बाबतीत अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या  आदेशांचे पालन करण्यास नकार देतो, खरे पाहता त्याचे हृदय धर्मापासून रिक्त आहे. त्याची नमाज, त्याचा उपवास व त्याचा धर्मानुकूल चेहरा एक फसवणुकीशिवाय अन्य काही नाही.

३) दुसऱ्या जातींचे अनुकरण
अशाचप्रकारे जर एखादा मनुष्य अल्लाहचा ग्रंथ व त्याच्या पैगंबराच्या आदेशांची पर्वा न करता म्हणत असेल की मी अमुक गोष्टीचा अशासाठी अवलंब केला की ती इंग्रज लोकांत रूढ  आहे आणि अमुक गोष्ट अशासाठी मान्य करावी की तमुक जातीची प्रगती त्यामुळे होत आहे. तसेच अमुक गोष्ट अशासाठी मान्य करावी की अमुक मोठा माणूस तसे म्हणत आहे. तर  अशा माणसाने सुद्धा आपल्या ईमानची चिंता बाळगणे आवश्यक आहे. या गोष्टी ईमानशी जुळणे शक्य नाही. जर आपण मुसलमान आहात व मुसलमान राहू इच्छिता तर त्या प्रत्येक  गोष्टीला फेकून द्या जी अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आदेशाविरूद्ध आहे. जर तुम्ही असे करू शकत नाही तर इस्लामचा दावा तुम्हाला शोभा देत नाही. तोंडाने तर सांगावयाचे की  आम्ही अल्लाह व पैगंबरांना मानतो, परंतु आपल्या जीवनाच्या बाबतीत प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या बोलण्यापुढे अल्लाह व पैगंबर (स.) यांचे म्हणणे रद्द करीत राहणे हे इमानही नाही व इस्लामही नाही. तर याचे नाव ढोंगीपणा आहे.

पवित्र कुरआनच्या अठराव्या पाऱ्यात (भागात) महान अल्लाहने स्पष्ट शब्दात फर्माविले आहे-
आम्ही उघड करून करून सत्य व असत्यामधील फरक विशद करणाऱ्या आयती उतरविल्या आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो या आयतींच्याद्वारे सरळ मार्ग दाखवितो. लोक म्हणतात की आम्ही अल्लाह आणि  त्याच्या पैगंबरावर ईमान आणले आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली. मग त्यानंतर त्यांच्यापैकी काही लोक आज्ञाधारकतेपासून तोंड फिरवितात. असले लोक ईमानदार नाहीत. आणि जेव्हां त्यांना अल्लाह व  पैगंबराकडे बोलविले जाते जेणेकरून पैगंबर (स.) यांनी त्यांच्या बाबतीत निर्णय द्यावा तेव्हां त्यांच्यापैकी काही लोक तोंड फिरवितात. तथापि जेव्हां गोष्ट त्यांच्या फायद्याची असेल तेव्हां ती मान्य करतात. काय त्या  लोकांच्या हृदयात रोग आहे अथवा ते शंकेत पडले आहेत किंवा त्यांना अशी भीती आहे की अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) त्यांचा हक्क मारतील कोणत्याही परिस्थितीत, कारण कांहीही असले तरी, हे लोक स्वतःच  आपल्यावर जुलुम करणारे आहेत. वास्तविकतः जे ईमानदार आहेत त्यांची पद्धत तर अशी आहे की जेव्हां त्यांना अल्लाह व त्याच्या पैगंबराकडे बोलाविले जाईल जेणेकरून पैगंबर (स.) यांनी त्यांच्या बाबतीत निर्णय  द्यावा तेव्हां त्यांनी म्हणावे की आम्ही ऐकले आणि आज्ञेचे पालन केले. असलेच लोक मोक्ष प्राप्त करणारे आहेत आणि जो कोणी अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आज्ञेचे पालन करील आणि अल्लाहला भीत राहील व  त्याच्या अवज्ञेपासून दूर राहील बस्स तोच सफल होईल.
– सूरतुन्नूर – ४६-५२
ह्या आयतीत ईमानची जी व्याख्या सांगितली आहे त्यावर विचार करा. मुळात ईमान असा आहे की स्वतःला अल्लाहचा ग्रंथ व त्याच्या पैगंबरांच्या आदेशाच्या स्वाधीन करावे. जी आज्ञा तेथून मिळेल तिच्या समोर  नतमस्तक आणि तिच्यापुढे कुणाचेही ऐकू नका, स्वतच्या मनाचेही नको, घराण्यातील लोकांचेही नको आणि जगातील लोकांचेही नको. अशी स्थिती ज्या माणसाची होईल तोच मोमिन व मुसलमान आहे – आणि ज्याची अशी स्थिती नसेल त्याची दशा ढोंगीपेक्षा अधिक नाही.

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *