सर्वप्रथम अल्लाहचे आभार ज्याने रमजान सारखा पवित्रोत्तम महिना दिला. अन्य सर्व महिन्यांपेक्षा या महिन्याचे विशेष हे की याचे आगमन व गमन दोहोंसाठी मुसलमान उत्कंठेने वाट पहात असतात आणि उत्कंठाही लाभाशिवाय थोडीच असते. तेव्हा हे असे लाभ तरी कोणते हे पाहणे उद्बोधक ठरते. या महिन्यातील लक्षवेधी बाबी – १) कुरआनचे नाजिल होणे, २) रोजे, ३) शबे कद्र, ४) तरावीह आणि ५) जकात. या पाचमधील जकातचे महत्त्व ‘सलातुज्जकात’ या शब्दातूनच स्पष्ट होते. म्हणजेच नमाजबरोबरच जकातचे महत्त्व अल्लाहनेच स्पष्ट केले आहे. तर रोजास मी जबाबदार आहे असे स्पष्ट करून कोणासही या बीबत कसलाही फरक करण्यास वाव नाही, भले हज जीवनात शक्य होवो न होवो हजचे महत्त्वही सारखेच.
येथे विचार प्रस्तुत आहे तो रमजानचे रोजे, जकात यांचा आइ म्हणून रमजानचे विशेषत्व वर स्पष्ट केले. नंतर काहीसे रोजाकडे वळावेरोजापासून आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते हे
सर्वश्रुत आहे, सर्वमान्यही आहे. आरोग्य ही बाब केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून त्याला सामाजिक महत्त्व आहे आणि ते म्हणजे चारित्र्य. मुसलमान चारित्र्यवान असतील आणि म्हणूनच त्यास अल्लाहने बरगुजीदा कौम म्हणून घोषित करतानाच अशा चारित्र्यासाठी त्याने एक मंत्रही दिला तो तत्तकुन म्हणून अर्थात तकवा. एकदा का हा तकवा आत्मसात केला की जीवन मग ते या भूतलावरील असो की मरणोत्तर ते यशस्वी असाच खुलासा कुरआनात आढळतो आणि तो मान्य असण्यास कोणतीही अडचण असू नये असे वाटते. कारण तकवा म्हणजे अल्लाहप्रती प्रेम व भीती. म्हणजेच जे मी करत आहे, बोलत आहे, जो विचार माझ्या मनात चालला आहे, या सर्वांना अल्लाह जाणत असतो. सृष्टीतील प्रत्येक चीजवस्तूचा तो मालक आहे. यात मानवही आलाच.
मानवाचा मालक अल्लाह व मानव हा त्याचा बंदा. आपण कोठेही नोकरी करत असलो किंवा इतर कोणताही धंदा-उद्योग, अल्लाहचे भय असेल तर भ्रष्टाचार होणे नाही. भ्रष्टाचार म्हणजे तरी काय जो आचार भ्रष्ट तो भ्रष्टाचार! तो या तकवामुळे टळत असतो. असा हा तकवा उपलब्ध होण्यासाठीच हे रोजे. मी चुकून खायचे प्यायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. अल्लाह हे जाणतो व आपला बंदा आपल्या कसोटीला उतरला याची नोंद बंद्याचे आमालनाम्यात एकदा का झाली की माझ्या कौमचा हा विश्वासू आपला अनुयायी खास जाणून शिफारसयोग्य ठरतो. कारण त्याने चारित्र्य जपबले आहे. चारित्र्याचे सर्टिफिकेट जसे या भूतलावर लागते तसे ते दुसऱ्या जगतात म्हणजे मरणोत्तर ठिकाणी पाहिजे असते आणि ते सर्वांनी येथूनच प्राप्त करून घ्यायचे असते. असे हे प्रमाणपत्र साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोजा होय. ज्यातून तकवाही लाभतो व चारित्र्याचे प्रमाणपत्रही लाभते. यापेक्षा कोणास अधिक ते काय हवे.
सर्टिफिकेट कोणतेही असो ते प्राप्त करण्यापोटी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात आणि आपण अशा प्रमाणपत्रासाठी पात्र असल्याचे सिद्धही करावे लागते. अशी सिद्धता आपण तकवा धारण केल्यास आपले काम सोपे होते. जसे रोजामुळे खोटे बोलणे विसरून जातो, कुविचारांना, कुकर्मांना थारा देत नसतो. साहजिक आपले मनावर हळूहळू का होईना ताबा मिळविणे शक्य होते.सतत महिनाभर रोजाचे हेच कारण आहे. मात्र केवळ रोजे ठेवायचे म्हणून ठेवले तर अल्लाह यश न देता आपण उपाशी राहण्याचे, तहान सोसण्याचेच काम केले, जे निरर्थक ठरते. आपला तकवा तसे करू देत नाही. अल्लाहच्या बंद्याचे भल्यासाठीच हे रोजे आहेत हे यावरून स्पष्ट व्हावे. याच महान मानवाने आपले बजेट सुनिश्चित करावे व त्यानुसार अल्लाहला अपेक्षित असलेला त्याग मग तो पैशांच्या रूपात असो की धान्य-कपड्यांच्या, गरजूंना अशा त्यागातून मुक्त करण्याची संधी साधतानाच आपले चारित्र्याचे प्रमाणपत्र साध्य करण्यासही भरीव मदत मिळते. हे कार्य करताना तसेच रोजे करताना आपण आपले नातलग याचे रोजे व्हावेत त्याचे जीवन उंचावे याचाही विचार मनी असतो. जो इस्लामचा एक अविभाज्य घटक आहे. अर्थात सामान्यत: आपण रोजासाठी उठलो, शेजारी काय स्थिती आहे हे पाहतोच ना! सहरी-इफ्तारसाठी जी देवाणघेवाण होते ती प्रेम व ऋणानुबंधाचे वाढीसाठीच असते. आणि हेच ऋणानुबंध सामाजिक बंधुता, एकोपा यासही दृढ करते. शबे कद्रचे महत्त्व तर न्यारेच. कारण या एका रात्रीचे इबादतीस एकहजार रात्रींच्या इबादतीचे इनाम यांतून ते स्पष्ट होते. वर नमूद केलेल्या बाबींबरोबरच आम्हाला हे ज्याद्वारे प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो तो कुरआन आणि कुरआन नाजिल झाले तो महिना रमजान आणि म्हणून रमजान व त्यातील रोजे हे अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच जकातही. आपण हे ज्या महिन्यात मिळते तो महिना रमजान. म्हणून त्याचे आगमनासाठीही उत्कंठा आणि हे जे प्राप्त झाले त्याचे आभार मानण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी लगतच ईदच्या चंद्रदर्शनाची तेवढीच उत्कंठा. याच उत्कंठेतून समस्त बांधवांस रमजान मुबारकबरोबरच ईद मुबारक!

-बशीर मोडक, रत्नागिरी
0 Comments