स्पष्टीकरण
या हदीसद्वारे माहीत होते की मुखाने अल्लाहचे नामस्मरण करणे आणि नामस्मरण म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेसह केले जाणारे ईशनामस्मरण आणि हेदेखील माहीत झाले की आपल्या धर्मश्रद्धाळू (दीनदार) पतीच्या संकटे व अडचणींमध्ये संयमाने राहणारी पत्नी धर्माच्या मार्गात आधार बनते. मार्गातील अडथळा बनत नाही, म्हणून खरोखरच अशी पत्नी अल्लाहची फार मोठी कृपा आहे.
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण निरीक्षक व संरक्षक आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारले जाईल त्या लोकांच्या बाबतीत जे तुमच्या देखरेखीखाली असतील. शासकदेखील संरक्षक आहे आणि त्यालाही त्याच्या प्रजेलाविषयी विचारणा होईल आणि पती आपल्या कुटुंबियांचा संरक्षक आहे आणि पत्नी आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे आणि सेवक आपल्या मालकाच्या संपत्तीचा संरक्षक आहे, तर मग तुमच्यापैकी प्रत्येकजण संरक्षक आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या लोकांच्या बाबतीत विचारले जाईल जे त्याच्या संरक्षणात होते.’’ (मुत्तफक अलैहि)
स्पष्टीकरण
या हदीसचा हा भाग विशेष लक्ष देण्यायोग्य आहे कारण स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे. या हदीसवरून स्पष्ट होते की पती आपल्या पत्नीला फक्त खाऊपिऊ घालण्यापुरताच जबाबदार नाही तर तिचा धर्म व नैतिकतेचे रक्षण व संरक्षण करणे त्याचीच जबाबदारी आहे. पत्नीची जबाबदारी दुप्पट आहे. ती पतीचे घर व संपत्तीची संरक्षक असण्याबरोबरच त्याच्या मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची विशिष्ट जबाबदारीदेखील तिच्यावर आहे, कारण पती उपजीविका प्राप्त करण्यासाठी अधिकांश घराबाहेर राहतो आणि घरात मुले आपल्या मातांकडेच असतात, म्हणून मुलांचे संरक्षण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची आणखी एक जबाबदारी त्यांच्या आईवर पडते.
मुलाबाळांचे अधिकार
सईद बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पिता आपल्या मुलाबाळांना जे काही देतो त्यापैकी सर्वोत्तम भेट म्हणजे त्याचे चांगले शिक्षण व प्रशिक्षण होय.’’ (हदीस : जामिउल उसूल, मिश्कात) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपली मुलेबाळे सात वर्षांची झाल्यास त्यांना नमाज अदा करण्याचा आदेश द्या आणि जेव्हा ते दहा वर्षांचे होतील तेव्हा त्यांना नमाजकरिता मार द्या आणि या वयाचे झाल्यानंतर त्यांचे अंथरुण वेगळे करा.’’ (हदीस)
स्पष्टीकरण
या हदीसवरून स्पष्ट होते की मुले जेव्हा सात वर्षांची होतात तेव्हा त्यांना नमाजची पद्धत शिकविले आणि नमाज अदा करण्यास सांगितले पाहिजे आणि जेव्हा ते दहा वर्षांची होतील आणि नमाज अदा करीत नसतील तर त्यांना मारदेखील दिला जाऊ शकतो. त्यांना हे समजाविले पाहिजे की तुमचे नमाज अदा न करणे आमच्या नाराजीचे कारण बनेल. या वयाला पोहोचल्यानंतर मुलांचे अंथरुण वेगळे केले पाहिजे, अनेक मुलांनी एकाच बेडवर झोपू नये.
0 Comments