Home A hadees A जीवनधर्माच्या राजकीय व्यवस्थेतील बिघाड

जीवनधर्माच्या राजकीय व्यवस्थेतील बिघाड

‘‘माननीय मुआज बिन जबल (रजी.) कथन करतात की, जेव्हा जीवनधर्माच्या राजकीय व्यवस्थेत बिघाड होईल, तेव्हा मुस्लीमांवर असे  शासक येतील जे समाजाला चुकीच्या दिशेने नेतील. जर त्यांचे म्हणणे मान्य केले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे म्हणणे कोणी मान्य केले नाही तर ते त्याला ठार  मारतील. तेव्हा लोकांनी प्रेषितांना विचारले, ‘‘अशा परिस्थितीत आम्हाला आपण (स.) कोणते मार्गदर्शन करता? तेव्हा प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला तेच काही त्या  काळात करावे लागेल, जे मरियमपूत्र ईसा (अ.स.) यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यांना करवतीने चिरले गेले आणि सुळावर चढविले गेले. परंतु असत्यापुढे त्यांनी शरणागती पत्करली नाही.  अल्लाहच्या आज्ञा पालनात मरणे, त्या जीवनापेक्षा अधीक चांगले आहे, जे अल्लाहच्या अवज्ञेत व्यतीत व्हावे. (हदीस – तिबरानी)

भावार्थ
उपरोक्त हदीसमध्ये जीवनमार्गासंबंधी मौलीक मार्गदर्शन आहे. मुस्लीम समाजावर शासक म्हणून असे लोक येतील, जे समाजाला चुकीच्या दिशेने येतील. अल्लाहच्या आज्ञा, प्रेषितांचे  मार्गदर्शन यापासून भिन्न अशा पद्धतीने कारभार करणारे शासक, सत्तेवर येतील. त्यावेळी मुस्लीम समाजाची अवस्था अत्यंत बिकट होईल. कारण लोकांनी शासनाचे म्हणणे मान्य  केले तर लोक मार्गभ्रष्ट होतील. म्हणजे शासनाकडून लोकांवर अशाप्रकारचे कायदे लादण्यात येतील, की जर लोकांनी त्यांचे (शासकाचे) म्हणणे, कायदे मान्य केले तर त्यामुळे लोक  मार्गभ्रष्ट होतील आणि जर लोकांनी शासनाचे म्हणणे मान्य केले नाही तर शासन त्यांना ठार मारतील. अशा कठीण प्रसंगी श्रद्धावंतांनी कशाप्रकारे आचरण करावे, यासंबंधी मार्गदर्शन  करताना, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, अल्लाहच्या आज्ञा पालनात मरणे, त्या जीवापेक्षा अधीक उत्तम आहे, जे अल्लाहच्या अवज्ञेत व्यतीत व्हावे. अर्थात, काळ, प्रसंग  कितीही कठीण आला तरी माणसाने अल्लाहची आज्ञेविरूद्ध वागू नये. संयमाने, धैर्यशिलतेने, संकटाला सामोरे जावे. यातच त्याची भलाई आहे.

संयम व स्थैर्य
अबु सईद खुदरी (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘जो मनुष्य धीर संयम राखण्याचा प्रयत्न करेल, अल्लाह त्याल संयम प्रदान करील.  आणि संयमापेक्षा अधीक उत्तम आणि अनेक भलाईपूर्ण गोष्टींना गोळा करणारे बक्षीस दुसरे कोणतेही नाही. (हदीस – बुखारी)

भावार्थ
जो मनुष्य कसोटीत पडल्यावर धीर संयम राखतो तर त्यावेळ पावेतो संयम राखू शकत नाही, जोपर्यंत ईश्वरावर त्याला श्रद्धा आणि विश्वास नसावा. तो मनुष्य कदापी धीर संयम पाळू  शकत नाही, ज्याच्या अंगी कृतज्ञता आढळून येत नसेल. अशाचप्रकारे विचार केले तर आपणाला कळून येईल की धीर संयमाचा गुण आपल्या अंगी किती तरी वैशिष्ट्ये सामावून आहे.  यासंबंधी अनस (रजी.) सांगतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, कसोटी जेवढी सक्त असेल, तेवढेच मोठे बक्षीस मिळेल (अर्थात या अटीवर की माणसाने संकटाला  घाबरून सत्य मार्गास सोडून पळ काढू नये.) सर्वश्रेष्ठ अल्लाह जेव्हा एखाद्या समुहांशी प्रेम करतो तेंव्हा त्यांना (अधीक तेजस्वी करण्यासाठी, स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी) कसोटीत  टाकतो. जेव्हा ते लोक अल्लाहच्या निर्णयावर राजी राहिले आणि धीर संयम राखला तर अल्लाह अशा लोकांशी खुष होतो. जे लोक या कसोटीत अल्लाहशी नाराज होतील, तर  अल्लाहदेखील त्यांच्याशी नाराज होतो. (हदीस : तिर्मिजी)

संबंधित पोस्ट
Febuary 2025 Sha'ban 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4
3 5
4 6
5 7
6 8
7 9
8 10
9 11
10 12
11 13
12 14
13 15
14 16
15 17
16 18
17 19
18 20
19 21
20 22
21 23
22 24
23 25
24 26
25 27
26 28
27 29
28 Ramadhan 1
1 2
2 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *