माननीय अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वर्ग (जन्नत) आणि याचप्रमाणे नरक (जहन्नम) सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या चपलांच्या तळव्यापेक्षासुद्धा त्याच्या अधिक जवळ आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
म्हणजे स्वर्ग व नरक यांना लांब समजून बसू नका. ते तर तुमच्या अतिनिकट आहेत. जन्नत (स्वर्ग) मधील देणग्या आणि त्यातील सुख-समाधान तसेच नरकातील आपत्ती, कष्ट इ. सर्वांचा आमच्या आचार-विचारांशी घनिष्ट संबंध आहे. आमचे कर्म व विचारांमुळेच आमचे जीवन स्वर्ग बनेल अथवा नरक बनेल. आमचे कर्म हे आमच्यापासून दूर व विलग असत नाही. कर्मानुसार आमचे अस्तित्व व व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते. कर्म जर सदाचारी व ईशपरायणशील असतील तर आमची जन्नत (स्वर्ग) आमच्यापासून काहीच दूर नाही. अथवा याच्या विपरित आमचे चारित्र्य व कर्म असतील आणि त्यामुळे प्रभु-स्वामीला आम्ही इतर काहीr समजू लागतो आणि तो जीवनमार्ग स्वीकारून बसतो जो मार्ग प्रभुला अप्रिय आहे. अशा स्थितीत आम्ही जन्नतऐवजी नरकाशी (जहन्नम) दृढ संबंध स्थापित करून बसलेलो असतो.
माननीय हुजैफा (रजि.) यांचे कथन आहे.
‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखादे वेळी काही संकटांना सामोरे जावे लागले तर नमाज अदा करू लागतात.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
हे यासाठी की दासासाठी सर्वांत मोठा आधार त्याचा प्रभु-स्वामी आहे. ईशसान्निध्याव्यतिरिक्त अन्य कोणते दुसरे शरणस्थळ असूच शकत नाही.
0 Comments