Home A quran A कुरआनात क्रमिक विज्ञानाचा अभाव आहे काय?

कुरआनात क्रमिक विज्ञानाचा अभाव आहे काय?

शंका : कुरआनच्या आयतीतील विषय क्रमवार नाहीत, पुनरावृत्ती जास्त आहे आणि लेखन कुशलतेचा अभाव आहे. असा ग्रंथ ईशग्रंथ कसा असू शकतो?

कोणताही सार्थक, सफल व उपयोगी ग्रंथ आपल्या उद्देश, हेतु आणि विषयाच्या केंद्रीकरणाला धरून चालते. आपल्या हेतुनुसार अनुवूâल भाषाशैली आणि विषयप्रवीणता अवलंबिली जाते. ती आपल्या ध्येय व अंतिम परिणामापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित मार्ग ठरवते. यात कोणत्याही बाबीची कमतरता त्या ग्रंथाच्या सफलतेत अडचण निर्माण करेल, या दृष्टिकोनातून कुरआनबाबत विचार केला तर त्याची साहित्यिक सुंदरता आणि लक्ष-सिद्धीची प्रवीणता आणि वाङ्मय कला-कौशल्ये स्पष्ट होतात.

एखाद्या ग्रंथाच्या वाचनासाठी त्याचा विषय आणि हेतू जाणून घेणे आणि कला-कौशल्याचे सूक्ष्म अवलोकन आवश्यक आहे. कुरआन काही साधारण ग्रंथ तर नाही. याची भाषाशैली मानव-रचित ग्रंथांपेक्षा भिन्न आहे. यास समजण्यासाठी थोडी मेहनत करावीच लागेल. एकाहून अधिक वेळा त्याचे योग्य रूप समजून घ्यावे लागेल.

जर साहित्याच्या विद्याथ्र्याला सांख्यिकी विषयाचे पुस्तक दिले अथवा इतिहासाच्या विद्याथ्र्याला अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय पुस्तक दिले तर त्याच्यासाठी विचित्र परिस्थिती निर्माण होईल, याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो. हे असे याकरिता होते की तो त्या विषयाच्या आधारभूत सिद्धान्त आणि विषयापासून अनभिज्ञ आणि अपरिचित आहे. कुरआन मात्र मानवी जीवनाविषयीच चर्चा करतो, त्यामुळे अपरिचित असल्याची भावना नसते. तरीपण धर्माबाबत संकुचित कल्पना माणसाच्या हृदयात घर करून राहत असल्याने सुरूवातीला स्वाभाविकपणे समस्या उत्पन्न होतात. अशा समस्या काही ठिकाणीच उत्पन्न होतात, ज्यांचे समाधान करणे सहज शक्य होते.

कुरआन लिखितरूपात अवतरित झाला नाही. तो लहान लहान भागांत भाषण व आवाहनाच्या रूपाने अवतरित झाला आहे. देवदूताचा आवाज पैगंबरांनी ऐवूâन ते लिहून घ्यायला लावले. अवतरित अंश त्या वेळच्या घटनेवर, परिस्थितीवर आधारित असे. वर्तमान परिस्थितीच्या बऱ्याच गोष्टी गौण समजून विषय पुढे सरकत गेला.

लोकांसमोर त्या वेळी परिस्थितीची जाण होती व त्यांच्यासमोर कुरआनचे आवाहन होते, त्यामुळे त्यांना समजायला कठीण गेले नाही. दुसरी गोष्ट अशी की कुरआन थोडक्यात सिद्धान्त मांडत असे. तसे जर केले नसते तर ग्रंथ अत्यंत मोठा झाला असता आणि सुरक्षा आणि पाठांतरासाठी मोठा अडसर ठरला असता. अशा प्रकारे संक्षिप्त रूपात व्यापक गोष्टी मांडणे ही विशिष्ट कला त्या वेळी अरबांत एक विशेषता मानली जात.

कुरआनचा प्रत्येक अध्याय (सूरह) एका केंद्रीय विषयावर आधारित आहे. काही गोष्टींच्या बाबतीत विस्तृत माहितीनंतर परत केंद्रीय विषयावर येत असे. यामुळे ाâमभंग झाल्याची जाणीव होते. याचप्रकारे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती ध्यान आकृष्टकरण्यासाठी केली आहे जे सिद्धान्ताचे अभिन्न अंग आहेत. या पुनरावृत्तींत शब्द आणि भाषाशैलीत परिवर्तन करून असे सौंदर्य उत्पन्न केले गेले आहे की ते दोष नसून गुणांचा अनुभव होतो. परंतु अनुवाद करताना ध्वनिसरलता व शब्दांची ठेवण पूर्णत: उतरवणे शक्य नाही. यामुळे अनुवादाच्या माध्यमातून कुरआनचे अध्ययन करणारे या पुनरावृत्तीच्या सौंदर्याचे दर्शन व लाभ घेऊ शकत नाहीत.

कुरआन या जगाला आणि परलोक जीवनाला परस्पर पूरक आणि आश्रित, पराधीन तथ्याच्या रूपात प्रस्तुत करतो. मानवाच्या डोक्यात उत्पन्न होणारी जिज्ञासा आणि भ्रमाच्या निवारणासाठी लहान लहान आयती अद्भुत चमत्कार दाखवितात. मनोविज्ञानाच्या गहन गोष्टीला न समजणारे वर वर उदासीन भावाने पुढे जातात. कुरआनचे एक एक वाक्य (आयत) चिंतन मनन करण्याचे आवाहन करते. सहज व सरासरी अध्ययन करण्यासाठी हा ग्रंथ नाही.

कुरआनची आपली स्वत:ची विशिष्ट लेखनकला आहे. त्यात क्षणाक्षणांत विषयात बदलाव येत असतो. कधी आकाशाबाबत गोष्ट होत असेल तर अकस्मात विषय न बदलता जमिनीबाबत गोष्ट सुरू होते. जगातील गोष्टींच्या दरम्यान अचानक पारलौकिक विषय सुरू होऊन जातो. याचप्रकारे संबोधनाचे पात्र अचानक बदलते. कधी अल्लाहचे संबोधन सुरू असतानाच मध्येच पैगंबर (स.) यांना संबोधित केले जाते. कधीकधी हे निश्चित करणे कठीण जाते की हे संबोधन कुणाकडून आणि कुणासाठी आहे. असे होणे ही एक प्रकारची विशिष्ट कला आणि प्रभावाचे प्रदर्शन होय.

त्याची ओळख पटल्यावर त्याच्या सौंदर्याचे अवलोकन होऊ शकते.

कुरआनची अशी एक विशिष्ट शैली आहे की एखाद्या घटनेच्या विवरणांत एक बाजू स्पष्ट होते आणि यावरून निश्चित होते की दुसरी बाजू काय असू शकते. परंतु कुरआन स्पष्ट शब्दांत ते उघड करीत नाही आणि ती गोष्ट वाचकांवर विश्वासाने सुपूर्द केली जाते की ते बुद्धीचा उपयोग करून समजून घेतील. त्या गुप्त अंशाचे विवरण न मिळाल्याने एका साधारण वाचकाला क्रमाची विकृती जाणवू लागते. म्हणून वाचकाने फक्त ग्रंथावर अवलंबून न राहता आपल्या बौद्धिक कौशल्याचा वापर करून अर्थ ग्रहण करणे, सतर्वâ राहणे आवश्यक आहे.

उदाहरणाकरिता विपरीत गुणाच्या पदार्थाचे विवरण याप्रकारे करणे की ज्या एकाच्या गुणाचे वर्णन केले जावे की त्या गुणाला दुसऱ्या पदार्थासाठी सोडून दिले जावे जेणेकरून वाचक त्या गुणाला स्वत: समजून घेईल, तसेच दुसऱ्या पदार्थाच्या त्या गुणाचे वर्णन केले जावे ज्याच्या विपरीत गुणाला पहिल्या पदार्थांत सोडून दिले जावे. याची बरीच उदाहरणे कुरआनात सापडतील. चांगले आणि वाईट गुणांचे लोक, स्वर्ग आणि नरक, दिवस आणि रात्र इत्यादींचे वर्णन… इ.

येथे आपण दिवस-रात्रचे एक वर्णन पाहू या –

“तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनविली की तिच्यांत संतोष प्राप्त करावा व दिवसाला प्रकाशमान बनविले.” (दिव्य कुरआन – १०:६७, २७:८६)

येथे रात्रीला आराम करण्यासाठी लाभदायक दाखवले गेले आहे आणि `अंधकारा’चे वर्णन केले नाही जो `रात्री’चा एक गुण आहे. याकरिता की त्याच्या विपरीत `दिवस’ प्रकाशमान असल्याचे वर्णन दिले आहे. प्रकाशमानच्या विरुद्ध गुण `अंधकारमय’ हा अर्थ वाचक आपल्या कल्पनेने बुद्धीने समजून घेईल. रात्री `आराम’ करण्याचे वर्णन आहे तर त्याच्याविरुद्ध दिवसा परिश्रम करणे व उपजीविकेसाठी प्रयत्न करण्याचे वर्णन लपवून ठेवले आहे, येथे पाठकाने स्वत:ची बुद्धी चालवून पूर्तता करावी. पूर्ण गोष्ट जर उघड केली तर ती या प्रकारे असेल.

“तोच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्रीला (अंधकारमय) बनविले, म्हणून तुम्ही त्यात आराम करावा, सुख उपभोगावे आणि दिवसाला प्रकाशमान बनविले (कारण प्रकाशात आपला काम-धंदा आणि परिश्रम करावे.)”

`आयती’मधील वर्णन पाठकाला विचित्र आणि अपूर्ण जाणवेल. परंतु काव्यगुणांनी परिचित माणूस त्यात जे कौतुक आहे, त्या सरळ सरळ व उघड वर्णनांत नाही हे सहज जाणून घेतो.

याचबरोबर या आयतीत एक चमत्कार लपलेला आहे जो अनुवादामुळे स्पष्ट होत नाही. ज्या शब्दाचा अनुवाद “प्रकाशमान” अथवा “रोशन’ केला गेला आहे, त्याचा मूळ शब्द अरबी भाषेत “मुबसिरा” आहे ज्याचा अर्थ असा “पाहताना” अथवा “डोळे उघडे ठेवत”. याचा विपरित अर्थ “अंधकार” नसून “डोळे मिटलेला” असा होईल. तात्पर्य असे की त्याच्यापासून अंधकार आणि प्रकाश आहे. परंतु पाहणे, डोळे उघडे ठेवणे अथवा डोळे मिटणे हे प्राण्यांची सवय आहे. निर्जीव वस्तुत या हालचालीला मानवीकरण (म्हणजे निर्जीव वस्तू व्यक्ती आहेत असे समजणे) केले गेले. याप्रकारे रात्र आणि दिवस आमचे सहचर बनले आहेत. अशा वर्णनाने प्रभावात वृद्धी होत जाते.

या प्रकारची उदाहरणे कुरआनात भरपूर आहेत. जेव्हा वाचक कुरआन पाठ (तिलावत) करतो, तेव्हा साऱ्या घटना चलचित्रपटासारख्या त्याच्या मेंदूत गतिशील आणि जीवित रूपात उपस्थित होतात. वाचक त्याच्यासोबत या सहयात्रेला जाऊ लागतो.

कुरआनची लहान लहान वाक्ये मानवाच्या हृदयाला प्रभावित करतात. त्याचे हृदय चैतन्यमय असेल तर ही वाक्ये बाणाप्रमाणे सरळ प्रवेश करून कायापालट करतात. काही नमुने येथे देण्यात येत आहेत.

“हे मानवा! कोणत्या गोष्टीने तुला आपल्या पालनकर्त्याच्या बाबतीत संभ्रमात टाकले, ज्याने तुला निर्माण केले, तुला नखशिखांत व्यवस्थित केले, तुला प्रमाणबद्ध बनविले आणि ज्या रूपात इच्छिले तुला जोडून तयार केले.”

(दिव्य कुरआन – ८२ : ६-८)

“हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहचे भय बाळगा आणि प्रत्येक इसमाने हे पहावे की त्याने उद्यासाठी काय संरजाम केला आहे. अल्लाहचे भय बाळगत रहा. अल्लाह खचितच त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी तुम्ही करता.”

(दिव्य कुरआन – ५९ : १८)

“काय श्रद्धावंतांसाठी अद्याप ती वेळ आली नाही की त्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने द्रवली जातील आणि त्याने अवतरलेल्या सत्यापुढे नमतील?”

(दिव्य कुरआन – ५७ : १६)

“काय या लोकांनी कुरआनवर विचार केला नाही अथवा हृदयांवर त्यांच्या कुलुपे लागलेली आहेत?” (दिव्य कुरआन – ४७ : २४)

सारांश, कुरआनच्या काव्यगुण आणि भाषा-शैलीबाबत अज्ञान असल्याकारणाने एक साधारण वाचकासमोर समस्या उभ्या राहतात. कुरआनात काव्यसौंदर्य आणि साहित्यिक सौंदर्य इतके अधिक आहेत की अरबचे साहित्यिक व कवी यांनी कुरआन अवतरणानंतर आपले कविता करणे सोडून दिले. विचारल्यावर त्यांनी सांगितले की आता कुरआननंतर यापुढे अशी चांगली रचना निर्माण करूच शकत नाही.

कुरआनच्या फार थोड्या `तफसीर’ (भाष्य व टीका) लिहिल्या गेल्या ज्यांत साहित्यिक मर्म ठळकपणे मांडले गेले. अधिकांश कुरआनचे नियम-विधान, शिक्षा आणि व्यावहारिक उपयोगाचे विवरण हेच तफसीरचे मुख्य विषय असत. हेच कारण आहे की अधिकांश वाचक या दृष्टिकोनातून अध्ययन करीत नाही आणि मुस्लिम तर श्रद्धेपायी आणि ईश-कोपाच्या भयाने समजून घेण्याच्या मार्गातील अडीअडचणीला खुल्या दिलाने सांगत पण नाही. त्यामुळे अधिकांश लोक या ज्ञानापासून वंचित राहिले आहेत. 

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *