भाषांतर – नौशाद उस्मान
हे पुस्तक दोन भागात संकलित आहे. पहिल्या भागात भारताशी संबंधित माहिती दिली गेली आहे आणि येथील मुस्लिम शासकांच्या इतर देशबांधवाप्रती व्यवहारासंबंधी वर्णन केलेले आहे. संपुर्ण माहिती अल्लामा (आचार्य) शिबली नोमानी (रह.) चा संग्रह “मकालाते शिबली” आणि “औरंगज़ेब आलमगीर पर एक नज़र”, अल्लामा (आचार्य) सैयद सुलैमान नदवी यांचा संग्रह “मकालाते सुलैमानी”, सैयद सबाहुद्दीन अब्दुर्रहमान यांचे पुस्तक ‘हिंदुस्तान के सलातीन उलमा और मशाएख पर एक नज़र’ आणि ‘बाबरी मस्जिद’, सैयद मुहम्मद मियाँ यांचे पुस्तक ‘उलमा-ए-हिंद का शानदार अतीत’ आणि उडीसाचे माजी राज्यपाल श्री. बी. एन. पांडे यांचे ‘खुदाबख्श ओरियंटल पब्लिक लाइब्रेरी’ चे प्रसिध्द वार्षिक अभिभाषण “इस्लाम और इंडियन कल्चर” या पुस्तकांतून घेतलेली आहे.
सदर पुस्तकाचा दुसरा भाग इस्लामी जगताचे प्रसिध्द लेखक अल्लामा युसूफ करज़ावी, यांचे अरबी भाषेतील पुस्तक ‘गौरूल मुस्लिमीन फ़िल मुज्नमईल-इस्लामी’ चे भाषांतर आहे. या पुस्तकात लेखकांनी कुरआन हदीस (पैगंबर साहेबांची वचने) व प्रामाणिकधर्मशास्त्रीय मीमांसा यांच्या दाखल्यांसहीत सिध्द करण्याचा प्रयत्न केलाआहे. इस्लामी समाजात देशबांधवांना (अन्य धर्मियांना) किती आणि कोण-कोणते हक्क प्राप्त आहेत, त्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी (हक्कांना प्राप्त करण्यासाठी) काय – काय कर्तव्ये आहेत, त्यांच्यावर कोण-कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. इस्लामने किती महान सहिष्णुतेची शिकवण दिली आहे, इतर धर्म-समुदायांसोबत इस्लामचा तुलनात्मक अभ्यास काय सिध्द करतो आणि इतिहासकाय साक्ष देतो?
या गैरसमजूतीच्या वातावरणात हे पुस्तक लोकांसमोर वास्तविकता प्रगट करण्यात यशस्वी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश्य आहे.
आयएमपीटी अ.क्र. 87 पृष्ठे – 145 मूल्य – 30 आवृत्ती – August 2004
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/8gyrqnz0z7286tkjgwrz5ij4joc9lnbx
0 Comments