Home A इस्लामी व्यवस्था A इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा

इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा

एखाद्या माणसाला जीवे मारणे हे किती मोठे पाप आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. एका माणसाची हत्या करणे म्हणजे समस्त मानवजातीची हत्या करण्यासम असल्याचे कुरआनात म्हटले आहे.(संदर्भ : सूरह-ए-माइदा : ३२) म्हणूनच इस्लामने मानवहत्या करण्याची शिक्षासुद्धा कठोर स्वरुपाची दिली आहे. शिवाय ही शिक्षा ईह आणि पारलौकिक या दोन्ही जीवनात तजवीज करण्यात आली आहे. मानवहत्या करणारी व्यक्ती नेहमीसाठी नरकाग्नीत राहणार. कुरआनात म्हटले आहे,
‘‘जो माणूस एखाद्या श्रद्धावंतांची हत्या करील, त्याची शिक्षा नरकाग्नी आहे, ज्यात तो नेहमीकरिता राहणार. त्याच्यावर ईश्वराचा क्षोभ आणि धिक्कार आहे आणि ईश्वराने त्याच्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा ठेवली आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा – ९३)

इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा विविध पैलूंनी लागू करण्यात आली आहे.
  1. किसास – अर्थात प्राणाच्या बदल्यात प्राण घेणे, म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा देणे.
  2. दैयत – अर्थात खून झालेल्या व्यक्तीच्या वारसांना योग्य खूनभरपाई देणे.
  3. प्रायश्चित्त – यांत गुलाम स्वतंत्र करणे अगर दोन महिने सतत रोजे(इस्लामी उपवास) ठेवणे होय.
  4. वारसासंपत्ती हक्कापासून वंचित ठेवणे-जर खुनी हा खून झालेल्या व्यक्तीचा वारसदार असेल तर ही शिक्षा देण्यात येईल.
  5. वारसापत्राच्या हक्कापासून वंचित ठेवणे-जर मयताने आपल्या संपत्तीमधून काही प्रदान करण्याची सूचना केली असेल तर ते विश्वसनीय नसेल.
कुरआनात म्हटले आहे,
‘‘तौरातमध्ये आम्ही यहूदींवर हा आदेश लिहिला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्व जखमांसाठी बरोबरीचा बदला, मग जो किसासचा सदका करेल, त्याच्यासाठी प्रायश्चित आहे, आणि जे लोक ईश्वराने अवतरित केलेल्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा – ४५)
तसेच,
‘‘कोणत्याही श्रद्धावंताचे हे काम नाही की त्याने इतर श्रद्धावंताची हत्या करावी. केवळ याऐवजी की त्याकडून चूक घडावी आणि जी व्यक्ती एखाद्या श्रद्धावंताची चुकून हत्या करते, त्याचे प्रायश्चित्त हे आहे की, एका श्रद्धावंत गुलामास मुक्त करावे आणि जर मयत व्यक्ती तुमच्या शत्रुपक्षाची असेल तर याचे प्रायश्चित्त हेच आहे की एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करावा आणि ती मयत व्यक्ती जर मुस्लिमेतर समूहाची सदस्य असेल, ज्याच्याशी तुमचा शांतीकरार असेल तर त्या मयताच्या वारसांना खूनभरपाई देण्यात यावी आणि एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करावा. मग ज्याला गुलाम मुक्त करण्यासाठी मिळाला नाही, त्याने सतत दोन महिने उपवास ठेवावेत. हे या अपराधाचे प्रायश्चित्त करण्याची पद्धत आहे आणि ईश्वर खूप दयाळू वतत्वज्ञानी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा – ९२)
हत्येचे प्रकार
शरीअतमध्ये हत्येचे विविध प्रकार वर्णन करण्यात आले असून त्याच प्रकारांनुसार शिक्षा लागू करण्यात आली आहे.
  1. जाणूनबुजून हत्या करणे
    या प्रकारामध्ये खून करणारी व्यक्ती पूर्ण तयारीनिशी आणि जाणूनबुजून माणसाचा प्राण जाईपर्यंत मारते आणि प्राण गेल्यावरच त्याला सोडते. याच्या दोन अटी आहेत. पहिली अशी की मयत जीवंत आणि मानव असावा, अर्थात मृतास ठार करण्यामुळे आणि मयत हा मानव नसेल तर शिक्षा लागू होणार नाही. दुसरी अट अशी की मयत व्यक्तीचे प्राण हल्लेखोराच्या प्रयत्नांमुळे गेलेले असावे. नसता हल्लेखोराच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण न जाता इतर कोणत्याही कारणास्तव गेले असेल तर शिक्षा लागू होणार नाही.
  2. विनाहेतु हत्या होणे
  3. खुन्याने हत्या करण्याच्या उद्देशाने मारले नसेल मात्र खून झाला तर यासाठी गुन्हा सिद्ध होण्याच्या तीन अटी आहेत. पहिली अशी की मयत हा खुन्याच्या प्रयत्नातून मेला असावा, दुसरी अट अशी की खुन्याने मयतावर अतिरेक केला असावा आणि तिसरी अट अशी की मृत्यू आणि मृत्यूच्या सबबीमध्ये संबंध असावा. या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्या तरच खुन्यास शिक्षा देण्यात येईल.
  4. चुकून झालेली हत्या
  5. उदाहरणार्थ, एखादा माणूस सिंहाची शिकार करीत होता आणि बंदुकीची गोळी चुकून एखाद्या माणसाला लागली, तर याला चुकून झालेली हत्या म्हणता येईल.
यामध्ये पहिल्या प्रकारची हत्या केल्यास खुन्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. अथवा दैयत(खून भरपाई), वारसासंपत्तीचा अधिकार न देणे वगैरेची शिक्षा देण्यात येईल. दुसर्या प्रकारची शिक्षा झाल्यास दैयत(खूनभरपाई) प्रायश्चित्त अथवा दंडविधान अथवा दोन महिन्यांचे रोजे(इस्लामी उपवास) ठेवणे, ही शिक्षा लागू होईल. शिवाय अतिरिक्त शिक्षा म्हणून वारसाहक्कापासून वंचित ठेवण्यात येईल. तिसर्या प्रकारची मानवहत्या झाल्यास याची मूळ शिक्षा ही दैयत(खूनभरपाई) आणि प्रायश्चित्त होय. यात अतिरिक्त शिक्षा म्हणून दंड आणि रोजे, तसेच वारसासंपत्तीचा हक्क हिसकावणे होय.
गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी व शर्तीहत्येचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी निम्नलिखित अटी व शर्ती आवश्यक आहेत.
  1. खुनी हा वयात आलेला, मानसिक स्थिती सुदृढ असलेला आणि स्वतंत्र असावा.
  2. मृत व्यक्तीने कोणाचीही हत्या केलेली नसावी अथवा ती सामरिक द्रोही नसावी अर्थात धर्मयुद्धातील शत्रुपक्षाची नसावी, इस्लाम त्यागलेली विवाहित आणि व्यभिचारी नसावी.
  3. मयत व्यक्तीने खुन्यावर हल्ला केलेला नसावा, म्हणजेच खुन्याने आत्मरक्षण करण्यासाठी मयताचा खून केलेला नसावा.
  4. मयत व्यक्ती ही मुस्लिम असो वा मुस्लिमेतर खुन्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.
  5. खुनी आणि मयत व्यक्ती समलिंगी असावी.
या अटी व शर्ती पूर्ण झाल्यावरच खुन्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.
संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *