इस्लामच्या सामाजिक व्यवस्थेची आधारशीला “जगाचे सर्व लोक हे एका मातापित्याची संतान आहेत’ हे तत्व आहे. अल्लाहने सर्वप्रथम एक मानवी जोडपे जन्मास घातले, या जोडप्यापासून ते सर्व लोक जन्मास आले जे जगामध्ये वसलेले आहेत. सुरवातीस काही काळापर्यंत या जोडप्याच्या संततीचा एकच समाज होता, त्यांचा धर्म एक होता, त्यांची भाषा एक होती, त्यांच्यामध्ये कसलाही मतभेद नव्हता, परंतु जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, ते जमिनीवर पसरत गेले आणि या फैलावामुळे स्वाभाविकरीत्या निरनिराळे वंश, राष्ट्रे व जातीजमातीमध्ये त्यांची विभागणी झाली. त्यांच्या भाषा वेगळ्या झाल्या, त्यांचे पोशाख वेगळे झाले, त्यांची राहणी – सरणी वेगळी झाली आणि ठिकठिकाणच्या हवामानामुळे त्यांचे रंगरूप व आकार बदलले गेले. ही सर्व विविधता स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि म्हणून इस्लाम तिचा एक सत्य म्हणून स्वीकार करतो. तो तिला मिटवू इच्छित नाही याउलट तो तिची उपयुक्तता मान्य करतो. एक दुसऱ्याशी परिचय व सहकार्य यामुळेच शक्य आहे. परंतु या विविधतेच्या आधारावर रंग, भाषा, राष्ट्रीयत्व व नागरिकत्व वगैरे जे पूर्वग्रह निर्माण झाले आहेत त्या सर्वांना इस्लाम चुकीचे ठरवितो. माणसामाणसामध्ये उच्चनीचता, पुनीत व पतीत, स्वकीय व परकीय वगैरे जे भेदभाव जन्माच्या आधारावर केले गेले आहेत ते सर्व इस्लामच्या दृष्टीने अज्ञानमूलक आहेत. इस्लाम जगातील साऱ्या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात, एक दुसऱ्याचे भाऊभाऊ आहात आणि माणसाच्या नात्याने समान आहात.
मानवतेबद्दलच्या या एकत्व विचाराचा स्वीकार केल्यानंतर इस्लाम सांगतो की माणसामाणसामध्ये खरा फरक जर कोणता होऊ शकतो तर तो वर्ण, वंश, राष्ट, भाषेचा नव्हे तर विचार, आचार व तत्वांचा होऊ शकतो. एका आईची दोन मुले घराण्याच्या दृष्टीने एकच असली तरी त्यांचे आचार व विचार एकदुसऱ्याहून भिन्न असतील तर त्यांचे जीवनाचे मार्गही वेगवेगळे होतील. याउलट एक पूर्वेला व एक पश्चिमेला अशा दूरच्या अंतरावर राहणारी दोन माणसे जाहिरपणे एक दुसऱ्यापासून कितीही दूर असली तरी त्यांचे विचार एक व आचार मिळतेजुळते असतील तर त्यांच्या जीवनाचा मार्ग एक असेल. या दृष्टिकोनाच्या आधारावर इस्लाम जगातील सर्व वंश, जन्मभूमी आणि राष्ट्राच्या आधारावरील समाजाच्या ऐवजी एक वैचारिक, कृतीशील, तात्विक समाजाची उभारणी करतो, ज्यामध्ये माणूस माणसाला आपल्या जन्माच्या आधारावर भेटत नाही तर तो एक लक्ष्य व एक वैचारिक पद्धतीमुळे एक दुसऱ्यात मिसळतो. ती प्रत्येक व्यक्ती जी अल्लाहला आपला स्वामी व उपास्य मानते आणि पैगंबरांनी आणलेल्या शिकवणीला आपल्या जीवनाची नियमावली म्हणून मान्य करते ती या समाजामध्ये सामील होऊ शकते मग ती आफ्रिकेची राहणारी असो वा अमेरिकेची, सामी वंशाची असो वा आर्य वंशाची, मग ती काळी असो वा गोरी, मग ती हिंदी बोलणारी असो वा अरबी. जे लोक या समाजामध्ये सामील होतील त्या सर्वांचे हक्क व सामाजिक दर्जा समान असेल त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वांशिक, राष्ट्रीय वा वर्गय भेदभाव असणार नाहीत, कोणी उच्च-नीच असणार नाही, कसलीही अस्पृश्यता त्यांच्यामध्ये नसेल, एखाद्याचा हात लागला की कोणी अशुद्ध होणार नाही.
रोटीबेटी व्यवहार व परस्पर भेटीगाठीमध्ये त्यांच्या दरम्यान कसलीही अडचण राहणार नाही. व्यवसाय व जन्माच्या आधारावर कोणाला शूद्र व नीच समजले जाणार नाही. जातपात, कुलीनता व घराण्याच्या आधारावर कोणास खास हक्क प्राप्त होणार नाहीत. माणसाची श्रेष्ठता ही त्याच्या घराण्यावर वा त्याच्या संपत्तीवर अवलंबून असणार नाही तर ती फक्त त्याचे आचरण किती चांगले आहे व तो ईशभीरूतेत इतराहून किती पुढे आहे यावर अवलंबून राहील.
हा असा समाज आहे जो वंश, वर्ण आणि भाषा यांच्या तटबंदीला व भौगोलिक मर्यादांना तोडून पृथ्वीच्या पाठीवरील सर्व विभागांमध्ये अस्तित्वात येऊ शकतो आणि याच्या आधारावर लोकांमध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित होऊ शकते. वांशिक आणि राष्ट्रीय समाजामध्ये तर निव्वळ ते लोक सामील होऊ शकतात जे त्या वंशात अगर राष्ट्रात जन्मलेले आहेत. त्या बाहेरील लोकांना या समाजाची दारे बंद असतात. परंतु इस्लामच्या या वैचारिक व सैद्धान्तिक समाजामध्ये ती प्रत्येक व्यक्ती समान हक्कासह सामील होऊ शकते, जी एका निष्ठेचा व नैतिक व्यवस्थेचा स्वीकार करते. राहिले ते लोक जे या निष्ठेला आणि व्यवस्थेला मानत नाहीत, अशा लोकांना हा समाज आपल्यामध्ये सामील करून घेत नाही. परंतु मानवी बंधुभावाचा संबंध त्यांच्याबरोबर प्रस्थापित करण्यास आणि त्यांना मानवतेचे हक्क देण्यास तयार असतो. स्पष्ट आहे की, एका मातेच्या दोन मुलांचे विचार जर वेगवेगळे असतील तर साहजिकच त्यांचे जीवनमार्ग वेगवेगळे होतील. परंतु याचा हा अर्थ नव्हे की ते एक दुसऱ्याचे भाऊ राहिले नाहीत. अगदी याचप्रमाणे मानवी वंशाचे दोन गट निष्ठा व विचारामध्ये विरोध बाळगत असतील तर त्यांचे समाज खात्रीने वेगवेगळे असतील. परंतु मानवतेच्या नात्याने ते समानच असतील. या समान मानवतेच्या आधारावर अधिकाधिक हक्काची जी कल्पना केली जाऊ शकते ते सर्व हक्क इस्लामी समाजाने गैर इस्लामी समाजासाठी मान्य केलेले आहेत.
इस्लामी सामाजिक व्यवस्थेच्या आधारमूल्यांना समजावून घेतल्यानंतर आता आपण हे पाहू की ती कोणती तत्वे व त्या कोणत्या पद्धती आहेत ज्या इस्लामने माणसाच्या परस्पर संबंधाच्या निरनिराळ्या पद्धतीसाठी निश्चित केल्या आहेत.
कुटुंब ही मानवी समाजाची सर्वप्रथम पायाभूत संस्था आहे. एक पुरुष व एक स्त्री यांच्या संयोगाने कुटुंब अस्तित्वात येते या संयोगामुळे एक नवा वंश अस्तित्वात येतो. त्याच्यापासून आप्त संबंध, घराणी, बंधुभाव वगैरे दुसरे संबंध प्रस्थापित होतात आणि सरतेशेवटी ही गोष्ट पसरत पसरत एका समाजापर्यंत पोहोचते. कुटुंब हीच ती संस्था आहे ज्यामध्ये एक पिढी आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला मानवी संस्कृतीची व्यापक जबाबदारी सांभाळण्यासाठी अत्यंत प्रेमाने, त्यागाने, कळकळीने व सद्भावनेने तयार करीत असते. ही संस्था मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निव्वळ बाजारबुणग्यांचीच भरती करत नाही तर तिचे कार्यकर्ते मनापासून या गोष्टीची इच्छा बाळगून असतात की त्यांची जागा घेणारे लोक त्यांच्यापेक्षा अधिक चांगले असावेत. या आधारावर ही एक वस्तुस्थिती आहे की कुटुंबच मानवी संस्कृतीचे मूळ आहे. या मूळाच्या स्वास्थ्य व शक्तीवरच संस्कृतीचे स्वास्थ्य व शक्ती अवलंबून आहे. इस्लाम सामाजिक प्रश्नात सर्वप्रथम या प्रश्नाकडे लक्ष देतो की कुटुंबसंस्थेला अत्यंत योग्य व अत्यंत दृढ अशा पायावर प्रस्थापित केले जावे.
इस्लामजवळ स्त्री-पुरुषांच्या संबंधाचे स्वरूप फक्त हे आहे की या संबंधाबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्यांचासुद्धा स्वीकार केला जावा आणि ज्याच्या परिणामस्वरूप एका कुटुंबाची स्थापना व्हावी. स्वैर आणि बेजबाबदारीच्या संबंधांना तो निव्वळ एक निरागस मौज किंवा एक साधारणशी गैतवर्तणुक समजून त्याची उपेक्षा करीत नाही तर त्याच्या दृष्टीने ही गोष्ट मानवी संस्कृतीचे मूळ कापणारी आहे आणि म्हणून अशा संबंधाला तो हराम व कायदेशीर गुन्हा ठरवितो, त्याला कठोर शिक्षेची तरतूद करतो. हेतू हा की समाजामध्ये असे बेजबाबदारीच्या संबंधाना प्रवृत्त करणाऱ्या अथवा त्यासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या कारणांचे उच्चाटन करून समाजजीवन शुद्ध करावे. पडद्याचे आदेश, स्त्री-पुरुषांच्या मुक्त संबंधांना मनाई आणि संगीत व बीभस्त चित्रावर प्रतिबंध, अश्लीलतेच्या प्रसाराला बंदी हे सर्व उपाय ती गोष्ट थांबविण्यासाठीच आहे आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट कुटुंब संस्थेला सुरक्षित व मजबूत करणे हे आहे. दुसरीकडे जबाबदारीचा संबंध म्हणजे विवाहाला इस्लाम केवळ एक उचितच नव्हे तर त्याला एक सदाचार, एक सत्कृत्य व एक इबादत (उपासना) ठरवितो. वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांनी अविवाहित राहणे ही गोष्ट त्याला अप्रिय आहे. तो प्रत्येक तरुणाला प्रोत्साहन देतो की संस्कृतीच्या ज्या जबाबदारीचा भाग त्याच्या मातापित्यांनी वाहिला होता तो भाग त्यानेही आपला क्रम येताच वाहावा. इस्लाम वैराग्याला सदाचार समजत नाही. याउलट तो त्याला ईशप्रवृत्तीविरुद्ध एक अनिष्ट रूढी ठरवितो. तो त्या सर्व रीतीरिवाजांनासुद्धा नापसंत करतो ज्यामुळे विवाह ही एक मोठी व कठीण समस्या बनते. समाजामध्ये विवाह ही एक अत्यंत सोपी गोष्ट व्हावी हा त्याचा हेतू आहे. विवाह करणे अवघड व्हावे व व्यभिचार सोपा असावा हा त्याचा हेतू नाही आणि यासाठी त्याने काही आप्तसंबंधांना हराम ठरविल्यानंतर सर्व दूरच्या व जवळच्या नातलगांमध्ये विवाह संबंधांना उचित ठरविले आहे. जातपाताच्या भेदभावांना मिटवून सर्व मुस्लिमांमध्ये आपसात विवाहाला मुक्त परवानगी दिली आहे. “मेहर’ व “जहेज’ इतका थोडा असण्याबद्दल आदेश आहेत की संबंधित व्यक्तीना ते देणे सोपे जावे आणि विवाहसंपन्न करण्यासाठी एखाद्या काजी, पंडित व पुरोहित किंवा नोंदवहीची काही आवश्यकता नाही. पण प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने विवाहसंबंधांची नोंद ठेवणे उचित आहे. इस्लामी समाजातील विवाह ही एक अशी साधी प्रथा आहे जी दोन साक्षीदारांसमोर वयात आलेल्या वधुवरांच्या “संमती व स्वीकृती’ ने अंमलात येते पण हे मात्र आवश्यक आहे की ही “संमती स्वीकृती’ गुप्त नसावी तर मोहल्ल्यामध्ये, वस्तीमध्ये व समाजामध्ये त्या बद्दल घोषणा व्हावी.
कुटुंबामध्ये इस्लामने पुरुषाला त्याने आपल्या घरात शिस्त राखावी म्हणून व्यवस्थापकाचे स्थान दिले आहे. पत्नीला पतीचे आणि मुलांना आईवडिलांचे आज्ञापालन व सेवेचा हुकूम देण्यात आलेला आहे. इस्लाम अशा ढिल्या कुटुंबव्यवस्थेस मान्य करत नाही, ज्यामध्ये शिस्त नसते आणि घरातील लोकांचे आचार व व्यवहाराचे योग्य नियंत्रणाला कोणी जबाबदार नसतो. शिस्त ही तर एका जबाबदार व्यवस्थापकामुळेच प्रस्थापित होऊ शकते आणि इस्लामच्या दृष्टीने या जबाबदारीसाठी कुटुंबाचा प्रमुख स्वाभाविकत: पुरुषच होऊ शकतो. परंतु याचा अर्थ हा नव्हे की पुरुषाला घराचा एक जुलमी व रागीट शासक बनविला गेला आहे. आणि स्त्रीला एक असाहाय्य दासी बनवून त्याच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. इस्लामजवळ वैवाहिक जीवनाचा खरा अर्थ दया व माया हा आहे. पतीचे आज्ञापालन हे पत्नीचे कर्तव्य आहे आणि पतीचेही हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या सुधारणेसाठी करावा. इस्लाम वैवाहिक संबंधाना तोपर्यंत चालू ठेवू इच्छितो जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा किंवा कमीतकमी स्नेहाची भावना शक्य असते. ही शक्यता नाहीशी झाल्यास इस्लाम पुरूषाला “तलाक’ व स्त्रीला “खुलाअ’ ची परवानगी देतो आणि काही बाबतीत इस्लामी न्याय संस्थेला हे अधिकार देतो की त्याने अशा विवाहांना रद्द करावे जे सुखाऐवजी दु:खास कारणीभूत होतात.
कुटुंबाच्या मर्यादित क्षेत्राच्या बाहेर-जवळची सरहद्द नातलगांची आहे. याचे क्षेत्र फार व्यापक असते. जे लोक आई-बाप अगर भाऊ-बहीण यांच्या संबंधामुळे वा सासरकडील संबंधामुळे एक दुसऱ्याचे नातलग असतात, त्या सर्वांना इस्लाम एक दुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व एक दुसऱ्याबद्दल सहानुभूती व प्रेम बाळगणारे पाहू इच्छितो. पवित्र कुरआनमध्ये जागोजागी “”जिल्कुर्बा” म्हणजे नातलगांच्या बरोबर चांगली वागणूनक ठेवा अशी आज्ञा दिली गेली आहे. हदीसमध्ये आप्तजनाबरोबर प्रेम व त्यांचे साहाय्य करण्याबद्दल वरचेवर ताकीद दिली गेली आहे आणि त्याला मोठे सत्कृत्य म्हणून संबोधिले गेले आहे. ती व्यक्ती इस्लामच्या दृष्टीने अत्यंत नावडती आहे जी नातेवाईकाकडे कानाडोळा व दुर्लक्ष करते. त्याचप्रमाणे नातेवाईकाबद्दल पक्षपाताला इस्लाममध्ये स्थान नाही. आपल्या कुटुंबाचे व घराण्याचे अन्यायी समर्थन इस्लामच्या दृष्टीने रानटीपणा आहे. त्याचप्रमाणे शासनाचा एखादा अधिकारी सरकारी खर्चाने नातलगांना पोसू लागला किंवा न्याय निर्णयामध्ये आपल्या जवळच्या लोकांबद्दल पक्षपात करू लागला तर ते काही इस्लामी कार्य नव्हे- ते सैतानी कार्य आहे. इस्लाम ज्या आप्तजनांबद्दल प्रेम व साहाय्याची आज्ञा करतो ते स्वहस्ते व स्वत:कडून झाले पाहिजे आणि ते सत्य व न्यायाच्या मर्यादेत झाले पाहिजे.
नातलगांबरोबरच्या संबंधानंतर दुसरा जवळचा संबंध शेजाऱ्याशी येतो. पवित्र कुरआनच्या दृष्टीने शेजाऱ्यांचे तीन प्रकार आहेत. एक नातलग शेजारी, दुसरा परका शेजारी, तिसरा तो तात्पुरता शेजारी ज्याच्याबरोबर बसण्याचा व जगण्याचा योग आला असेल. हे सर्व शेजारी इस्लामी आदेशानुसार स्नेह, सहानुभूती सद्वर्तनास पात्र आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे.
“”मला शेजाऱ्यांच्या हक्काबद्दल इतकी ताकीद केली गेली की मला वाटू लागले की त्यांना कदाचित वारसा हक्कसुद्धा दिले जाईल.”
दुसऱ्या एका ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“”तो माणूस मोमिन नाही ज्याच्या कटकटीपासून त्याचा शेजारी सुरक्षित नाही.”
एका दुसऱ्या हदीसमध्ये आले आहे,
“”तो माणूस ईमान बाळगत नाही जो स्वत: पोटभर जेवतो पण त्याचा निकटचा शेजारी उपाशी असतो.”
एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“”एक स्त्री पुष्कळ नमाज पढते, नेहमी रोजे करते आणि पुष्कळसा दानधर्मही करते परंतु तिच्या फटकळपणाने तिचे शेजारी त्रस्त झालेले आहेत.” “”ती स्त्री दोजखी आहे, ती नरकात जाईल.”
लोकांनी सांगितले, “”दुसरी एक स्त्री आहे. तिच्यामध्ये पहिल्या स्त्रीचे हे सर्व गुण नाहीत (मात्र ती अनिवार्य उपासना करते) परंतु ती कधी शेजाऱ्यांना त्रास देत नाही.”
त्यावर पैगंबरांनी सांगितले,
“”ही स्त्री जन्नती आहे, ती स्वर्गात जाईल.”
पैगंबरांनी लोकांना इथपावेतो ताकीद दिली होती की,””आपल्या मुलांच्यासाठी फळफळावळ आणाल तर शेजाऱ्यासाठीही आणा. नसता फळांच्या साली बाहेर फेकू नका. तुमचे गरीब शेजारी दु:खी होता कामा नये.”
एके प्रसंगी पैगंबरांनी सांगितले,
“तुझे शेजारी तुला चांगला म्हणत असतील तरच तू खरोखर चांगला आहेस आणि त्यांचे मत तुझ्या बाबतीत वाईट असेल तर तू वाईट आहेस.”
थोडक्यात हे की इस्लाम, त्या सर्व लोकांना जे एकदुसऱ्याचे शेजारी आहेत, आपसात एकदुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व सुख-दु:खाचे वाटेकरी बघू इच्छितो, त्या सर्वामध्ये अशाप्रकारचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो की विश्वास ठेवावा आणि एकदुसऱ्याजवळ आपले प्राण, आपली धनदौलत व आपले शील सुरक्षित समजावे आणि ते समाज जीवन ज्यामध्ये फक्त एका भिंतीच्या आड वर्षानुवर्ष राहणारी दोन माणसे एकमेकाशी अपरिचित असतात त्याचप्रमाणे एका मोहल्ल्यात व पेठेत राहणाऱ्या लोकांमध्ये स्नेह, जिव्हाळा, सहानुभूती व विश्वास नसतो, असे समाज जीवन कदापिही इस्लामी समाज जीवन होऊच शकत नाही.
या जवळच्या संबंधानंतर संबंधाचे ते व्यापक क्षेत्र आहे जे साऱ्या समाजापर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रामध्ये इस्लाम आमच्या सामूहिक जीवनाला ज्या मोठमोठ्या तत्वांवर प्रस्थापित करतो ती थोडक्यात अशी,
1) सदाचाराच्या व संयमनाच्या कार्यामध्ये एकमेकांशी सहकार्य करा आणि दुराचाराच्या व अत्याचाराच्या कामामध्ये कोणास साथ देऊ नका. (दिव्य कुरआन, 5:2)
2) तुमची मैत्री व तुमचे शत्रुत्व अल्लाहसाठी असले पाहिजे. जे काही द्याल ते अशासाठी द्या की ते देणे अल्लाहला पसंत आहे आणि जे काही रोखाल ते अशासाठी रोखा की ते देणे अल्लाहला पसंत नाही. (हदीस)
3) तुम्ही तो उत्कृष्ट जनसमूदाय आहात ज्याला लोकांच्या भलाईसाठी निर्माण केले आहे. तुमचे कर्तव्य सदाचाराची आज्ञा देणे व दुराचारापासून रोखणे हे आहे. (दिव्य कुरआन, 3:110)
4) आपसात गैरसमज करून घेऊ नका. एकदुसऱ्याच्या व्यवहारांचा छडा लावण्याचा प्रयत्न करू नका. एकाविरुद्ध दुसऱ्याला भडकवू नका. हेव्यादाव्यापासून अलिप्त राहा. एकदुसऱ्याला खजिल करून नका. अल्लाहचे दास आणि आपसात भाऊ बनून राहा. (हदीस)
5) एखादा अत्याचारी आहे हे माहीत असता त्याचे साहाय्य करू नका. (हदीस)
6) अन्यायाच्या कामी आपल्या समूहाचे समर्थन करणे म्हणजे विहिरीत पडत असलेल्या उंटाच्या शेपटीला धरून स्वत:ही विहिरीत पडणे होय. (हदीस)
7) दुसऱ्यासाठी तेच पसंत करा जे तुम्ही स्वत:साठी पसंत कराल (हदीस)

0 Comments