Home A परीचय A अनेकेश्वरत्व

अनेकेश्वरत्व

त्या मतांपैकी एक मत असे आहे की, सृष्टीची ही व्यवस्था विनास्वामी तर नाही, परंतु तिचा केवळ एकच स्वामी (अधिपती व पालनकर्ता) आहे असे नाही, तर तिचे अनेक स्वामी (अधिपती व पालनकर्ते) आहेत. सृष्टीच्या निरनिराळ्या शक्ती¨चे निरनिराळे सूत्रधार आहेत, तसेच माणसाचे सुदैव व दुदैव, त्याचे यशापयश आणि त्याची हानी व लाभ अनेक शक्ती¨च्या कृपा व अवकृपेवर अवलंबून आहे. सदरहू मत ज्या लोकांनी स्वीकारले आहे, ज्यांनी मग तर्क लढवून हे निश्चित करण्याचा प्रयत्न केला की, दैवी शक्ती कोठे कोठे आणि कोणाकोणाच्या हातात आहे. असे करताना ज्या ज्या वस्तूंवर त्यांची दृष्टी जाऊन खिळली त्यांना त्यांनी देव मानले आहे.
या मताच्या आधारे मनुष्य जे वर्तन अंगिकारतो त्याची गुणवैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत –
पहिले असे की, त्यामुळे माणसाचे उभे जीवन भ्रामक कल्पनेचे माहेरघर बनते. माणूस कोणत्याही शास्त्रोक्त पुराव्याविना केवळ आपल्या भ्रामक कल्पनेने बऱ्याचशा वस्तूंसंबंधी असे मत निश्चित करतो की, त्या चमत्कारिकरीत्या त्याच्या भाग्यावर इष्ट वा अनिष्ट प्रभाव टाकीत असतात. त्यामुळे तो इष्ट प्रभावाच्या भ्रामक आशेत आणि दुष्ट प्रभावाच्या काल्पनिक भीतीत गुरफटला जाऊन आपल्या बऱ्याचशा शक्ती¨ना व्यर्थरीतीने वाया घालवून बसतो, कोठे एखाद्या कबरी व समाधीशी अपेक्षा करतो की, त्या त्याचे कार्य सिद्ध करतील, तर कोठे एखाद्या मूर्तीवर भिस्त ठेवतो की, ती त्याचे भाग्य उजळेल, कोठे एखाद्या काल्पनिक वि¿नहत्र्याला खूश करण्यासाठी धावपळ करतो, तर कोठे अशुभ शकुनामुळे वैफल्यग्रस्त होतो व शुभ शकुनाच्या आधारे कपोलकल्पित किल्ले उभारतो. अशा सर्व गोष्टी त्याचे विचार व प्रयत्नांना स्वाभाविक कृतीच्या मार्गापासून दूर करून एका अगदी अनैसर्गिक मार्गावर टाकतात.
दुसरे असे की, या मतामुळे पूजाअर्चा, नवस व नैवेद्य आणि इतर विधी व रूढींची एक लांबलचक नियमावली तयार होते. त्यात गुरफटून माणसाच्या शक्ती व प्रयत्नांचा मोठा भाग निरर्थक उद्योगांत खर्च होतो.
तिसरे असे की, जे लोक अनेकेश्वरवादी भ्रामक कल्पनेत गुरफटलेले असतात त्यांना मूर्ख बनवून आपल्या जाळ्यात अडकविण्याची चलाख व्यक्ती¨ना चांगलीच संधी मिळते. एखादा राजा होऊन बसतो आणि सूर्य, चंद्र व इतर देवांशी आपला वंशसंबंध जोडून लोकाची अशी खात्री पटवितो की, “”आम्हीसुद्धा देवापैकी आहोत, तुम्ही आमचे दास आहात.” एखादा पुरोहित अथवा मुजावर होऊन विराजमान होतो आणि म्हणतो की, “”तुमचा लाभ व तुमची हानी ज्यांच्याशी निगडीत आहे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. तुम्ही आम्हाला माध्यम बनविल्याशिवाय त्यांच्याप्रत पोचू शकत नाही.” कोणी ताईत, गंडे आणि मंत्र व तंत्र चे सोंग करून लोकांची अशी खात्री पटवितो की, आमच्या या गोष्टी चमत्कारिकरीत्या तुमच्या गरजा भागवतील, मग अशा चाणाक्ष लोकांच्या वंशजांना कायमस्वरूपी घराण्याचे व वर्गाचे रूप येते, मग कालांतराबरोबर त्यांचे हक्क व अधिकार आणि प्रभाव व प्रतिष्ठेत वाढ होत जाऊन त्यांची पाळेमुळे खोलवर रूतली जात असतात. अशा प्रकारे या धारणेद्वारे शाही घराणे, धार्मिक व आध्यात्मिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या ईशत्वाचे जोखड सर्व माणसांच्या मानगुटीवर बसते. हे ढोंगी देव त्यांना अशा प्रकारे आपले सेवक बनवितात की, जणू ते त्यांच्यासाठी दूध देणारे व स्वारी आणि ओझे वाहणारी जनावरे आहेत.
चौथे असे की, हा दृष्टिकोन ज्ञानविज्ञान आणि कला व तंत्राज्ञानासाठी, साहित्य व तत्त्वज्ञानासाठी आणि संस्कृती व राजकारणासाठी कोणताही कायमस्वरूपी पाया उपलब्ध करीत नाही, तसेच या कपोलकल्पित देवांपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही की, ज्याचे नियमितपणे पालन व्हावे. या ढोंगी देवांशी माणसाचा संबंध केवळ या हद्दीत मर्यादित असतो की, माणसाने त्यांची कृपा व साहाæय प्राप्त करण्यासाठी केवळ पूजेच्या काही विधी पूर्ण कराव्यात, उरले जीवनाचे इतर व्यवहार तर त्यांच्यासंबंधी नियम व कायदे करणे, अंमलबजावणीच्या पद्धती ठरविणे माणसाचे स्वत:चे काम आहे.
अशा प्रकारे अनेकेश्वरवादी समाज प्रत्यक्षात त्याच सर्व मार्गांवर चालतो ज्या मार्गांचा उल्लेख निव्वळ अज्ञानासंबंधी आताच मी केला आहे. तीच नीतिमत्ता, तेच आचरण, तीच सांस्कृतिक पद्धत, तीच आर्थिकव्यवस्था आणि तेच शिक्षण व साहित्य, या सर्व दृष्टींनी अनेकेश्वरवादाच्या वर्तनात आणि निव्वळ अज्ञानाच्या वर्तनात कोणताही मौलिक स्वरूपाचा फरक नसतो.
संबंधित पोस्ट
September 2024 Safar 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
26 21
27 22
28 23
29 24
30 25
31 26
1 27
2 28
3 29
4 Rabi'al Awwal 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *