लेखक – शेख मुहम्मद कारकुन्नू
भाषांतर – एल. पुणेकर
माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते की आपल्यामुळे जगातील आनंदाचा क्षण आपल्या या लोकांना मिळाला हा आपण केवढा मोठा त्याग केला. हे सर्व कशामुळे घडते तर आपण आपली नम्रता, दया, माणुसकी हे गुण हरवले आहेत, ज्या गुणामुळे जगण्यातला खरा आनंद मिळतो.
आजच्या आधुनिक भांडवलशाहीतून टाळता न आलेले हे अयोग्य बदल असून ते आमच्या संस्कृतीस हानिकारक आहेत. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमातून (टी.व्ही., इंटरनेट इ.) याचा झपाट्याने प्रसार होत आहे.
आयएमपीटी अ.क्र. 193 पृष्ठे – 48 मूल्य – 22 आवृत्ती – 3 (January 2016)
0 Comments