भाषांतर – प्रा. अब्दुल रहमान शेख
ह्या पुस्तकांत इस्लामच्या मौलिक तत्वांची तोंड ओळख देण्यात आलेली आहे. दीर्घ कालापासूनची अशी मागणी सतत येत होती. म्हणून लेखकांने पुढील गोष्टी डोळ्या समोर ठेवूनच ह्या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ फार काही तपशीलात जात नाही की अतिविद्वत्तापूर्ण सुध्दा नाही. एखाद्या बाबीवर जास्त महत्व देत नाही आणि इतरबाबींकडे दुर्लक्ष सुध्दा करीत नाही. हे संकलन कार्य अत्यंत साधे, सोपे आणि सरळ असे इस्लामचे वर्णन आहे. अत्यंत सुलभतेने इस्लामच्या मौलिकतत्वांना ह्या ग्रंथात वर्णन केले आहे. जेणेकरून इस्लाम धर्माचे गुणवैशिष्टयें, आदर्श तसेच धर्माची मौलिक शिकवण वाचकांपुढे ठेवून इस्लामची पूर्ण जीवनपध्दती, इस्लामची शिस्त बध्दता आणि इस्लामची कार्य प्रणाली इ. बाबींचा गांभिर्यपूर्वक विचार करून वाचकाने श्रध्दाशीलतेकडे यावे.
आयएमपीटी अ.क्र. 90 पृष्ठे – 225 मूल्य – 45 आवृत्ती – 1 (2004)
0 Comments