📘 लेखक: मुहम्मद यूसुफ नबीसाहेब अत्तार
📄 वर्णन:
ही पुस्तिका विविध विषयांवरील हदीससंग्रह आहे. इस्लामची जीवनव्यवस्था अंतिम ईशग्रंथ कुरआन आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आचरण (सुन्नत) यावर आधारलेली आहे. सुन्नत म्हणजे कुरआननुसार प्रत्यक्ष आचरणात आणलेली आदर्श जीवनपद्धत. सृष्टिनिर्मात्याने आदर्श जीवन म्हणून पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनाकडे निर्देश केला आहे. मनुष्यजीवन सफल होण्यासाठी पैगंबरांचे अनुकरण व आज्ञापालन आवश्यक आहे. विविध जीवनविषयांवरील हदीससंकलनाद्वारे हे महत्त्व अधोरेखित केले आहे.




0 Comments