लेखक – सय्यद अबुल आला मौदुदी
भाषांतर – प्रा. अब्दुल रहमान शेख
पाश्चिमात्यांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीने आमच्या समाजमनावर जिहादबद्दल अत्यंत चुकीचा समज करून दिला आहे. जिहादचे नाव ऐकताच आम्ही त्वरित दोन्ही कानांवर हात ठेवून लागलीच तोंड लपविण्याचा प्रयत्न करू लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळात तर भले भले ज्ञानी लोकसुध्दा जिहादचे नाव ऐकून विचलीत होऊन जात असत. शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीच्या या कठीण काळांत मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी मोठ्या हिमतीने जिहादवर लिहीण्यासाठी लेखणी हातात घेतली. संशोधनात्मक आणि विद्वत्तापूर्ण लिखाण करून त्यांनी एक श्रेष्ठतम ग्रंथ जिहाद याविषयी उपलब्ध करून दिला. मूळ ग्रंथ उर्दूत असून त्याचे शीर्षक आहे ‘अल् जिहाद फिल इस्लाम’. हा ग्रंथ स्वकीयांना आणि परकीयांनासुध्दा चांगलाच भावला आहे. जगातील कोणत्याच भाषेत याविषयी इतका सविस्तर ग्रंथ दुसरा नाही, हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
आयएमपीटी अ.क्र. 101 पृष्ठे – 64 मूल्य – 30 आवृत्ती – 4 (March 2015)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/c8u0o8q9ailx8ffllo96eo00vgkfgi9l
0 Comments