लेखक – डॉ. मकसुद आलम सिद्दिकी
भाषांतर – प्रो. मुबारक हुसेन मनियार
पवित्र कुरआनचे पठन करताना तो समजण्यात काही लोकांना अडचण येते, त्याला कारण असे आहे की, लोकांना पुस्तके लेखाच्या स्वरूपात वाचण्याची सवय आहे. परंतु पवित्र कुरआन आदरणीय प्रेषित महम्मद (स.) यांच्या २३ वर्षांच्या आंदोलन-जीवनात अल्लाहकडून त्यांना दिल्या गेलेल्या शिकवणी, आदेश व उपदेशांचा संग्रह आहे. स्वत: प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ते संग्रहित केले. हा संग्रह मौखिक वाणीचे लिखित रूप आहे.
या अडचणीचा विचार करता हे योग्य समजले गेले की, जे लोक याच्या अभ्यासासाठी अधिक वेळ काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी पवित्र कुरआनच्या मूळ सिद्धान्त व धारणासारख्या नैतिक व महत्त्वपूर्ण गोष्टी निवडून त्यांना पुस्तकरूपाने छापून पवित्र कुरआनचा संक्षिप्त परिचय सादर करावा. याचबरोबर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनासंबंधीचे ज्ञानसुद्धा पवित्र कुरआनचे क्रांतिकारी धर्मकार्य समजून घेण्यास लाभदायक ठरेल. आशा आहे की, वाचक हे पुस्तक या संकल्पाने वाचतील की याने दाखविलेला मार्ग जर हृदयस्पर्शी वाटला, तर तो मार्ग अवलंबिण्याच्या अथवा तो चांगल्याप्रकारे समजून घेण्याच्या प्रयत्नासाठी पुढे वाटचाल करतील. प्रार्थना आहे की, ईशज्योतीने आमचे हदय व आमचे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन उजळले व पृथ्वी शांतीस्थळ व्हावी. आमीन (असेच होवो)!

आयएमपीटी अ.क्र. 57 -पृष्ठे – 64 मूल्य – 35 आवृत्ती – 4 (2015)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/tdy6n1t8c4ft2srnwf3vnbu5g02wbq4o
0 Comments