भूतलावर जेव्हापासून मानवी जीवनाची सुरुवात झाली, त्याच वेळी मनुष्यासाठी ‘इस्लाम’ चा आरंभ झाला. ‘इस्लाम’ चा अर्थ अल्लाहचे आज्ञापालन करणे आहे. इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे. मनुष्यजातीचा निर्माणकर्ता आणि पालनकर्ता अल्लाहच आहे. मनुष्यांसाठी मुलभूत कर्तव्य हेच आहे की त्यांनी रचयिताचे आज्ञापालन करावे.