page १
१. अल्फातिहा
शीर्षक :
या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव “अल्फातिहा’ त्यातील तपशीलाच्या अनुषंगाने आलेले आहे. “फातिहा’ एखाद्या कार्याच्या शुभारंभाला अथवा ग्रंथाच्या प्रारंभाला म्हटले जाते. दुसऱ्या शब्दांत यास ग्रंथाचा प्रारंभ (प्रस्तावना) म्हटले जाते. अवतरण काळ : कुरआनचा हा सूरह (अध्याय) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाच्या प्रारंभकाळात अवतरित झालेला आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे स्पष्ट होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर सर्वप्रथम पूर्णरुपेण अवतरित अध्याय हाच आहे. या अगोदर फक्त वेगवेगळी वचने (आयत) अवतरित झाली होती जे अध्याय “अलक’, “मुजम्मिल’ आणि “मुदस्सिर’ यात समाविष्ट आहेत.
विषय :
खरे तर हा अध्याय एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना अल्लाहने त्या प्रत्येक मनुष्याला शिकविली आहे जो दिव्य कुरआन अध्ययन प्रारंभ करतो आहे. दिव्य कुरआनच्या प्रारंभी या सूरहला (अध्यायाला) निश्चित करण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही या ग्रंथापासून लाभ घेऊ इच्छिता तर सर्वप्रथम अल्लाहशी ही प्रार्थना करा. स्वभावत: मनुष्य प्रार्थना त्या गोष्टीसाठी करतो जिला प्राप्त करण्याची त्याची मनोमन इच्छा असते आणि त्याच विभूतिकडे करतो जिच्याकडून आपल्या अपेक्षेची परिपूर्त होण्याची त्याला खात्री असते. कुरआनने प्रारंभी या प्रार्थनेची शिकवण देऊन मनुष्याला जणूकाही सावध केले आहे की सत्य जाणून घेण्यासाठीच सत्यशोधक वृत्तीने या ग्रंथाचे पठण करावे. प्रथमत: मनुष्याने याची खूणगाठ मनात बांधून घेतली पाहिजे की ज्ञानाचा मूळस्त्रोत एकमेव अल्लाह आहे. म्हणून मार्गदर्शनासाठी अल्लाहजवळ प्रार्थना करूनच दिव्य कुरआन अध्ययन करावे. या विषयावरून हेच सिद्ध होते की दिव्य कुरआन आणि सूरह अल्फातिहा या दोहोंतील वास्तविक संबंध ग्रंथ आणि त्याच्या प्रस्तावनेचा प्रथम सूरह (अध्याय) नसून एक प्रार्थना आणि प्रार्थनेला दिलेल्या उत्तरासमान आहे. “सूरह अल्फातिहा’ ईशदासाने केलेली एक प्रार्थना आहे आणि प्रार्थनेचे अल्लाहाने दिलेले उत्तर म्हणजेच दिव्य कुरआन आहे. दास प्रार्थना करतो, “हे अल्लाह, तू माझे मार्गदर्शन कर.’ उत्तरादाखल अल्लाह पूर्ण कुरआन दासापुढे ठेवतो आणि सचेत करतो, “”हाच तो सरळ मार्ग आणि मार्गदर्शन आहे ज्यासाठी तू माझ्याजवळ प्रार्थना केली आहेस.” [next]
page २
१. अल्फातिहा
pg_२.jpg
अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.१ (१) स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे२ जो सर्व सृष्टीचा रब (पालनकर्ता)३ आहे. (२) एकमात्र असीम करुणामय आणि परम दयावंत,४ (३) निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.५
१) इस्लाम मनुष्याला ज्या संस्कृतीचे धडे देतो त्यापैकी एक नियम हासुद्धा आहे की, मनुष्याने आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात अल्लाहच्या नावाने करावी.
२) हा अध्याय एक प्रार्थना आहे. मात्र ही प्रार्थना त्या अस्तित्वाचे स्तुतीगान करून होत आहे ज्याच्याकडे मनुष्य याचना करीत आहे. प्रार्थना करण्याच्या योग्य पद्धतीचीच ही शिकवण आहे. म्हणजे ज्याच्याशी प्रार्थना केली जात आहे त्याची सर्वप्रथम स्तुती आणि प्रशंसा केली जावी. त्याचे गुण, कृपा आणि श्रेष्ठत्व स्वीकार करावे. “”स्तुती तर फक्त अल्लाहसाठीच आहे” असे सांगून एक मोठे वास्तव स्पष्ट करण्यात आले आहे. जगात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात सौंदर्य दिसते व श्रेष्ठत्व व प्रभुत्वाची प्रचिती होते; त्या सर्वांचा मूळस्त्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रशंसा आणि स्तुतीला पात्र तोच निर्माता आहे, निर्मिती मुळीच पात्र नव्हे. सामर्थ्य व श्रेष्ठत्व प्रदान करणारा अल्लाह स्तुतीला पात्र आहे.
३) “रब’ हा शब्द प्रयोग अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयुक्त आहे. १) मालक व स्वामी २) पालनपोषण, खबरगिरी व देखभाल करणारा, ३) शासक, प्रशासक, स्वामी, व्यवस्थापक. अल्लाह या सर्व अर्थाने सृष्टीचा “रब’ आहे. ४) अल्लाहचे स्तुतीगान करताना “रहमान’ (परम कृपाळू) यानंतर पुन: रहीम (परम दयाळू) या शब्दाचा प्रयोग यासाठी केला आहे की, अल्लाहची कृपा अनंत आहे. दया असीम आहे. ५) अल्लाहचे स्तुतीगान असीम दयाळु व कृपाळु असे केल्यानंतर अल्लाह न्याय-निवाड्याच्या (अंतिम) दिवसाचा स्वामी आहे, असे म्हटले गेले आहे. यावरून हेच स्पष्ट होते की अल्लाह फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो न्यायीसुद्धा आहे. न्याय देणारासुद्धा असा की अंतिमदिनी न्याय-निवाडा करण्याचा पूर्ण अधिकार त्याच्याच हातात असेल. म्हणून आम्ही अल्लाहशी फक्त प्रेमच करीत नाही तर त्याच्या न्यायी गुणवैशिष्ट्यांमुळे त्याचे भय बाळगून आहोत.
[next]
page ३
pg_३.jpg
(४) आम्ही तुझीच इबादत (उपासना)६ करतो आणि तुजपाशीच मदत मागतो.७ (५) आम्हाला सरळ मार्ग दाखव.८ (६) त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस.९ (७) जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.१०
६) “इबादत’ (उपासना, भक्ती) हा शब्दसुद्धा अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयोग केला जातो. १) उपासना, पुजाअर्चा, २) आज्ञापालन, ३) दास्यत्व व गुलामी. येथे हे तिन्ही अर्थ अपेक्षित आहेत. म्हणजे आम्ही तुझे उपासक, आज्ञाधारक आणि गुलामसुद्धा आहोत. ७) म्हणजे आम्ही आमच्या गरजपूर्तसाठी तुझ्याकडेच रुजू होतो. केवळ तुझ्याच मदतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. याच कारणास्तव आम्ही विनंतीसह तुझ्या सेवेत हजर होत आहोत. ८) म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचार, विचार व वागणुकीचा असा मार्ग आम्हाला दाखव जो निव्वळ सत्य असावा. ज्यावर चालून आम्ही आमच्या जीवनात वास्तविक सफलता आणि सौभाग्य प्राप्त करू शकावे. ९) हा तो सरळ मार्ग आहे ज्याचे ज्ञान आम्ही अल्लाहजवळ मागत आहोत. तो सरळ मार्ग जो तुझ्या प्रियजनांनी अंगीकारला आहे. १०) “अनुग्रह’ म्हणजे खरी आणि शाश्वत कृपा आहे जी सरळ मार्गावर चालून आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करूनच मनुष्याला मिळते. तो क्षणिक आणि दिखाव्याचा अनुग्रह नव्हे जो मार्गभ्रष्ट लोकांना जगात मिळतो आणि पूर्व फिरऔन, नमरूद आणि कारूनसारख्या अनेक अत्याचारींना मिळाले आहेत आणि आजही आमच्या डोळ्यांदेखत मोठमोठ्या अत्याचारींना, दुष्टांना आणि मार्गभ्रष्ट लोकांना मिळत आहेत. [next] page ४ “”अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे” २. अल्बकरा परिचय शीर्षक : या अध्यायाचे नाव “बकरा’ यासाठी आहे की यात एके ठिकाणी गाईचा (बकरा) उल्लेख आला आहे. “बकरा’चा अर्थ होतो गाय. दिव्य कुरआनच्या प्रत्येक अध्यायात (सूरह) अनेक विषय आल्यामुळे त्या प्रत्येकाचे विषयानुरूप नामकरण अशक्य आहे. यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनात कुरआनच्या बहुतेक अध्यायासाठी (सूरह) विषयानुसार शीर्षक देण्याऐवजी प्रतिकात्मक नावे निश्चित केली आहेत ज्यामुळे अध्याय ओळखले जाते. या अध्यायाला (सूरह) “बकरा’ हे नाव देण्याचा अर्थ हा मुळीच नाही की यात गाईविषयी तपशील आला आहे तर फक्त हाच अर्थ आहे की तो सूरह (अध्याय) ज्यात गाईचा उल्लेख आला आहे. अवतरण काळ : या अध्यायाचा (सूरह) बहुतांश भाग मदिनेला हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर “मदनीकाळा’च्या प्रारंभी अवतरित झाला आणि कमी भाग नंतर अवतरित झालेला आहे. परंतु विषयानुकूल यात समाविष्ट केला आहे. पार्श्वभूमी : या अध्यायाला समजून घेण्यासाठी प्रथमत: याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. १) “हिजरत’पूर्व मक्का शहरात इस्लामचे आवाहन प्रामुख्याने अरब अनेकेश्वरवादी लोकांसाठी होते. हे आवाहन त्या लोकांसाठी नवीन व अनोळखी असे होते. हिजरतनंतर आता संबंध यहुदी लोकांशी आला. हे यहुदी लोक एकेश्वरत्व, प्रेषित्व, परलोकत्व, दिव्यप्रकटन, फरिश्ते आणि ईशग्रंथाशी परिचित होते. तत्वत: त्यांचा दीन (धर्म) इस्लामच होता ज्याची शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत होते. परंतु शतकानुशतकात झालेल्या फेरबदलाने व विकृतीने त्या लोकांना खऱ्या धर्मापासून फार दूर हाकलून दिले होते. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे आल्यानंतर अल्लाहने आदेश दिला की त्यांना (यहुद्यांना) सत्यधर्माचे (इस्लामचे) आवाहन द्या. म्हणून या अध्यायातील प्रारंभीच्या एकशे एक्केचाळीस (१४१) आयती या विषयाशी निगडीत आहेत. २) मदीना येथे पोहचल्यानंतर “इस्लामी आंदोलन’ एका नव्या स्थितीला सामोरे जात होते. मक्केतील कार्य फक्त इस्लामी मूलतत्वांचा प्रचार आणि नवमुस्लिमांचे नैतिक प्रशिक्षणापुरतेच [next] page ५ मर्यादित होते. परंतु हिजरतनंतर मदीना शहरात एका लहानशा स्वरुपातील “इस्लामी शासन’ प्रणालीचा पाया घातला गेला. तेव्हा अल्लाहने सभ्यता, संस्कृती, कौटुंबिक, कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक आणि राज्य व्यवस्थेसंबंधी मूलभूत मार्गदर्शन अवतरित करण्यास प्रारंभ केला. अल्लाहने दाखवून दिले की जगात इस्लामी मूलतत्वांच्या आधारे एक आदर्श जीवनप्रणाली कशी स्थापित करावी. हा अध्याय आयत क्रमांक १४२ पासून ते शेवटपर्यंत याच विषयाला वाहिलेला आहे. ३) हिजरतपूर्व “इस्लामी आवाहन’ अनेकेश्वरवादी मक्कावासीयांना दिले जात होते. त्यांच्यापैकी जे कोणी इस्लामचा स्वीकार करीत असत ते स्वत: आपल्या कुवतीने आपल्या ठिकाणी इस्लाम प्रसारकार्य करीत असत. यास्तव प्रसंगी त्यांना भयानक अत्याचारांना सामोरे जावे लागत असे. परंतु हे विखुरलेले मुस्लिम हिजरतनंतर मदीना येथे एक समुदाय बनले तेव्हा त्यांनी एक लहानसे स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन केले. तेव्हा अशी स्थिती निर्माण झाली होती की एकीकडे लहानसी इस्लामी वस्ती आणि दुसरीकडे तिला नष्ट करण्यासाठी तुटून पडलेले समस्त अरब विश्व! आता या मूठभर लोकांच्या यशप्राप्तीचाच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न यावर आधारित होता की त्यांनी आपल्या सर्वशक्तीनिशी प्रथमत: इस्लामचा प्रचार करून जास्तीतजास्त लोकांना आपल्या विचारांना मानणारे बनवावेत. दुसरे, विरोधक असत्यावर आहेत हे प्रमाणित आणि पुर्णत: स्पष्ट करावे की कोणत्याही विचारी व्यक्तीला त्यात शंका राहू नये. तिसरे, ज्या संकटात ते चोहोकडून घेरले गेले होते त्यात हताश न होता संपूर्ण धैर्याने आणि दृढतेने या स्थितीचा मुकाबला करावा. चौथे, या इस्लामी आंदोलनाला नेस्तानाबूत करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या सशक्त शक्ती¨चा मुकाबला करण्यासाठी सर्वशक्तीनिशी व सशस्त्र सिद्ध व्हावे. पाचवे, त्यांच्यात (मुस्लिमांत) एवढे साहस निर्माण केले जावे की विरोधकांनी इस्लामच्या नवीन व्यवस्थेच्या अधिपत्याला समजाविण्याने स्वीकारत नसतील तर त्यांच्या रानटी, अन्यायी व दूषित व्यवस्थेला बळपूर्वक नष्ट करण्यातही त्यांना संकोच वाटू नये. अल्लाहने या अध्यायात या पाचही बाबीविषयी आरंभिक उपदेश केला आहे. ४) इस्लामी आंदोलनाच्या या टप्प्यात दांभिकांचा एक नवीन उपद्व्याप डोके वर काढू लागला होता. हा उपद्व्याप मक्केच्या शेवटच्या टप्प्यातच दिसू लागला होता. मात्र मक्केतील दांभिक इस्लामच्या सत्यतेला मानत होते आणि श्रद्धाही ठेवत असत. परंतु त्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार नव्हते. मदीनेत मात्र या दांभिकांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे दांभिकही निर्माण झाले. म्हणूनच या दांभिकांबद्दलही योग्य ते आदेश येणे आवश्यक होते. सूरह (अध्याय) “बकरा’ अवतरण होताना या विविध दांभिकांच्या प्रादुर्भावाला केवळ सुरवातच झाली होती म्हणून याविषयी अल्लाहने संक्षिप्त मार्गदर्शन केले. मात्र नंतरच्या काळात जसजसे त्यांचे अवगुण आणि उपद्व्याप समोर येत गेले तसतसे त्या अनुषंगाने नंतरच्या अध्यायांत सविस्तर मार्गदर्शन केले गेले. [next] page ६ २. अल्बकरा (मदीनाकालीन, एकूण २८६ आयती) pg_६.jpg अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे. (१) अलीफ लाऽऽम मीऽऽम.१ (२) हा अल्लाहचा ग्रंथ आहे. यात काही संशय नाही.२ मार्गदर्शन आहे अल्लाहचे भय बाळगणाऱ्या त्या लोकांसाठी३ (३) जे परोक्षवर श्रद्धा४ ठेवतात, नमाज कायम करतात५ आणि जी
१) अशाप्रकारचे विलग शब्द (मुकत्तआत) कुरआनच्या काही अध्यायांच्या सरुवातीला सापडतात. ज्या काळात दिव्य कुरआनचे अवतरण झाले त्या काळात ही शैली प्रचलित होती. त्यामुळे लोक जाणत असत की या शब्दांचा अर्थ कोणता आहे. परंतु पुढे असा शब्दप्रयोग होणे बंद झाले. परिणामी या विलग शब्दांचा अर्थ निश्चित करणे भाष्यकारांसाठी कठीण झाले. परंतु हे स्पष्ट आहे की, कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी अशा विलग शब्दप्रयोगांचा अर्थ जाणणे मुळीच आवश्यक नाही. २) याचा एक सरळ सोपा अर्थ हा आहे, “”नि:संशय हा अल्लाहचा ग्रंथ आहे” परंतु दुसरा अर्थ हासुद्धा होतो की हा असा ग्रंथ आहे ज्यात शंकेला अजिबात वाव नाही आणि सत्याधिष्ठित आहे. कारण याचा लेखक (निर्माता) तो आहे जो पूर्ण वास्तवतेची जाण ठेवून आहे. म्हणून यात शंकेला काहीच जागा शिल्लक राहत नाही. ३) हा ग्रंथ तर पूर्ण मार्गदर्शन आहे. परंतु यापासून लाभान्वित होण्यासाठी मनुष्यामध्ये काही गुण असणे आवश्यक आहे. त्यापैकी सर्वप्रथम अट म्हणजे मनुष्य अल्लाहचे भय बाळगणारा असणे आवश्यक आहे, मनुष्याने दुराचारापासून अलिप्त असावे आणि सदाचाराची त्याला मनापासून आवड असली पाहिजे. ४) मनुष्याने परोक्षवर (गैब) विश्वास ठेवणे आवश्यक आहे. ही कुरआनपासून लाभान्वित होण्यासाठी दुसरी अट आहे. परोक्षाने अभिप्रेत त्या वास्तविक गोष्टी आहेत ज्या माणसाच्या आकलनापलीकडे आहेत आणि कधीही सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष अनुभवात व दृष्टिक्षेपात येत नाहीत. जे वास्तव मनुष्याच्या ज्ञानापलीकडचे आहे त्याला परोक्ष म्हटले जाते. उदा. अल्लाहचे अस्तित्व व त्याचे गुणवैशिष्ट्ये, फरिश्ते, दिव्य प्रकटन (वही), स्वर्ग (जन्नत) व नरक (जहन्नम)इ. या वास्तवांना न पाहता त्यावरश्रद्धा ठेवणे आणि यास्तव विश्वास ठेवणे की, पैगंबर त्यांची माहिती देत आहे. यालाच परोक्षवर विश्वास ठेवणे म्हणतात. या आयतीचा अर्थ, जी व्यक्ती पैगंबर देत असलेल्या या परोक्षाच्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून आहे; तीच व्यक्ती दिव्य कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करू शकते. राहिला प्रश्न त्याचा जो मानण्यासाठी दिसण्याची, चवीची आणि गंध होण्याची अट लावतो, असा मनुष्य या ग्रंथापासून काहीएक मार्गदर्शन प्राप्त करू शकत नाही. [next] page ७ pg_७.jpg उपजीविका आम्ही त्यांना दिली आहे तिच्यामधून खर्च करतात६ (४) जो ग्रंथ (हे मुहम्मद स.) तुमच्यावर अवतरला आहे (अर्थात कुरआन) आणि जे (ग्रंथ) तुमच्या पूर्वी अवतरले गेले होते त्या सर्वांवर (देखील) जे श्रद्धा ठेवतात७ आणि परलोक जीवनावर दृढ विश्वास ठेवतात.८ (५) असेच लोक आपल्या पालनकर्त्याकडून सन्मार्गावर आहेत आणि तेच सफल होणारे आहेत.
५) ही तिसरी अट आहे. ती म्हणजे मनुष्याने ईमान धारण केलानंतर त्वरित व्यावहारिक स्वरुपात. आज्ञापालनार्थ प्रत्यक्ष आचरण करण्याला तयार व्हावे आणि या आचरणाची (व्यावहारिक आज्ञापालन) सर्वप्रथम आणि शाश्वत लक्षण “नमाज’ आहे. एखादी व्यक्ती इमानचा दावा तर करत आहे, परंतु मोअज्जिनच्या (अजान देणारा) अजानला प्रतिसाद देत नाही तर ही व्यक्ती आज्ञाधारक सिद्ध होत नाही. नमाज कायम करणे हा एक व्यापक पारिभाषिक शब्द आहे. याचा अर्थ म्हणजे एकट्याने वैयक्तिकपणे नेहमी नमाज अदा करणे नव्हे तर सामुदायिकरित्या विधिवत नमाजची कायमस्वरूपी व्यवस्था स्थापित होणे आहे. ६) कुरआनच्या मार्गदर्शनाचा लाभ उठविण्यासाठी ही चौथी अट आहे. ती म्हणजे मनुष्य संकुचित मनाचा नसावा की तो धनपूजकही नसावा. त्याच्या मिळकतीत अल्लाह आणि दास यांचा हक्क निश्चित केले जावे व तो देण्यास मनुष्याने तत्पर राहावे. ७) ही पाचवी अट आहे की मनुष्याने त्या सर्व ईशग्रंथंावर विश्वास ठेवला पाहिजे जे दिव्य प्रकटनाद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या पूवvच्या पैगंबरांवरकालपरत्वे विभिन्न देशांत अवतरित झाले होते. या अटीवर कुरआन मार्गदर्शनाचे द्वार त्या सर्व लोकांसाठी बंद आहे, ज्यांना मूळत: ईशमार्गदर्शनाची गरजच भासत नाही किंवा ही गरज मान्य करतात परंतु ईशमार्गदर्शनासाठी दिव्य प्रकटन आणि पैगंबरत्वाला ते आवश्यक समजत नाहीत किंवा स्वयंम एखादी विचारसरणी निश्चित करून तिलाच ईशमार्गदर्शन समजून बसतात. ते त्याच ग्रंथ किंवा ग्रंथाचे समर्थक आहेत, ज्यांना त्यांचे वाडवडील मानत आले आहेत, त्याच ग्रंथांवर ते विश्वास ठेवतात. ईशग्रंथांनासुद्धा मानतात परंतु त्याच स्त्रोताच्या इतर ग्रंथांना ते मान्य करीत नाहीत. ८) ही सहावी आणि शेवटची अट आहे. परलोक (आखिरत) एक व्यापक शब्द असून ज्याचा संबंध खालील श्रद्धांविषयी आहे. १) मनुष्य या जगात बेजबाबदार नाही तर आपल्या प्रत्येक कृत्यासाठी तो अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. २) ही प्रचलित विश्व व्यवस्था शाश्वत नाही. एका निश्चित समयी ज्याला फक्त अल्लाहच जाणतो हे विश्व नष्ट पावणार आहे. ३) या विश्वाच्या समाप्तीनंतर अल्लाह एक नवे विश्व निर्माण करील आणि आदिपासून कयामतपर्यंत जमिनीवर निर्मित सर्व मानवांना अल्लाह [next] page ८ pg_८.jpg (६) ज्या लोकांनी (या गोष्टींचा स्वीकार करण्यास) नकार दिला,९ त्यांच्यासाठी सर्वकाही समान आहे, तुम्ही त्यांना सावध करा अथवा करू नका, ते कदापि मानणार (श्रद्धा ठेवणार) नाहीत. (७) अल्लाहने त्यांच्या हृदयांवर आणि त्यांच्या कानांवर मुहर लावली आहे१० व डोळ्यांवर पडदा पडलेला आहे. (त्यामुळे) त्यांना कठोर शिक्षा आहे. (८) काही लोक असे आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहवर आणि अंतिम न्यायदिनावर श्रद्धा ठेवतो. वास्तविक ते ईमानधारक नाहीत. (९) ते अल्लाह आणि ईमानधारकांची फसवणूक करीत आहेत. वस्तुतः ते स्वतःचीच फसवणूक करीत आहेत.
पुन्हा एकाच वेळी जिवंत करील. समस्त मावनजातीला एकत्रित करून प्रत्येकाच्या कर्मांचा हिशेब घेईल आणि प्रत्येकाला त्याच्या कार्यांचा पुरेपूर मोबदला दिला जाईल. ४) अल्लाहच्या या निर्णयानुसार जे लोक सदाचारी सिद्ध होतील ते स्वर्गात (जन्नत) जातील आणि जे लोक दुराचारी (पापी) सिद्ध होतील त्यांना नरकात (जहन्नम)टाकले जाईल. ५) सफलता आणि असफलतेचे मापदंड या जगातील खुशहाली अथवा हालअपेष्टा नाहीत. वास्तविकत: सफल मनुष्य तो आहे, ज्याला न्यायनिवाड्याच्या अंतिमदिनी अल्लाहच्या न्यायालयात यश प्राप्त होईल. असफल तो मनुष्य आहे जो तिथे अयशस्वी ठरेल. या सर्व मौलिक धारणांवर (सत्यतेवर) ज्यांचा विश्वास नाही त्यांना दिव्य कुरआनातून मार्गदर्शन लाभणे शक्य नाही. ९) म्हणजे वरील सहा अटी पूर्ण न करता अथवा त्या सर्व अटींना अथवा त्यांच्यापैकी एकही अट मान्य न करणे. १०) याचा अर्थ असा होत नाही की अल्लाहने मुहर (सील) लावली म्हणून त्यांनी मान्य करण्यास नकार दिला, तर अर्थ असा आहे की जेव्हा त्यांनी या मूलभूत तत्वांना मान्य करण्यास नकार दिला आणि कुरआनने दाखविलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग अवलंबला तेव्हा अल्लाहने अशा लोकांच्या मनावर, कानावर सील ठोकून दिले. [next] page ९ pg_९.jpg परंतु त्यांना त्याची जाण नाही.११ (१०) त्यांच्या हृदयात विकृती (आजार) आहे. ज्याला अल्लाहने अधिक वाढू दिली आहे१२ आणि जे काही खोटे ते बोलताहेत त्याबद्दल त्यांना यातनामय शिक्षा आहे. (११) जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ‘‘आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!’’ (१२) सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना त्याची जाणीव नाही. (१३) आणि जेव्हा त्यांना सांगितले गेले की, ‘‘ज्याप्रमाणे इतरांनी श्रद्धा ठेवली त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा श्रद्धा ठेवा.’’१३ तेव्हा ते म्हणाले, ‘‘काय, आम्ही मूर्खासारखी श्रद्धा ठेवावी१४? सावधान! हेच लोक मूर्ख आहेत, परंतु त्यांना त्याचे ज्ञान नाही. (१४) जेव्हा ते श्रद्धावंतांना
११) ते स्वत:ला या गैरसमजूतीत गुरफटून घेत आहेत की त्यांची ही दांभिक विचारसरणी त्यांच्यासाठी लाभकारक ठरेल. खरेतर प्रत्यक्षात जगातसुद्धा यामुळे त्यांना नुकसान पोहचेल आणि मरणोत्तर जीवनातसुद्धा. जगात असा दांभिक मनुष्य काही काळ लोकांना धोका देऊ शकतो, परंतु तो नेहमी असे करू शकत नाही. शेवटी त्याच्या दांभिकतेचा पर्दाफाश होतोच आणि तेव्हा समाजात अशा व्यक्तीची पत राहात नाही. परलोकातसुद्धा अशा दांभिकांच्या श्रद्धेचा तोंडी दावा काहीच कामी येणार नाही. आचरण त्याविरुद्ध असेल तर ती व्यक्ती तिथे असफल ठरते. १२) आजारपणाचा अर्थ दांभिकतेचा आजार आहे. अल्लाहद्वारा या आजारात वाढ करण्याचा अर्थ असा आहे की अल्लाह दांभिकांना त्यांच्या दांभिकतेची व विद्रोहाची शिक्षा लगेच देत नाही, तर त्यांना या कामी ढील देतो. परिणामस्वरूप दांभिक आपल्या चालींना यशस्वी होताना पाहून आणखीन जास्त दांभिक बनतात. १३) म्हणजे तुमच्या समाजाचे दुसरे लोक मनापासून आणि स्वखुशीने आज्ञाधारक (मुस्लिम) बनलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर इस्लाम स्वीकारत असाल तर मनापासून इस्लामचा स्वीकार करा. १४) ते अशा लोकांना मुर्ख समजत होते जे खरोखर इस्लाम कबूल करून स्वत:ला अडचणीत, संकटात व धोक्यात टाकत होते. त्यांना हा मूर्खपणा वाटत होता की फक्त सत्य व खऱ्यासाठी संपूर्ण समाजाचे आणि राष्ट्राचे शत्रुत्व विकत घ्यावे. बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ ही होती की मनुष्याने सत्य आणि असत्याच्या विवादात पडू नये तर प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ पाहावा. [next] page १० pg_१०.jpg भेटतात तेव्हा म्हणतात, ‘‘आम्हीही श्रद्धा ठेवली आहे’’ पण जेव्हा ते एकटे आपल्या शैतानांना१५ भेटतात तेव्हा म्हणतात, ‘‘आम्ही तर तुमच्याच बरोबर आहोत आणि या लोकांची थट्टा करीत आहोत. (१५) (वास्तविक) अल्लाहच त्यांची थट्टा करीत आहे. त्यांना त्यांच्या बंडखोरीमध्येच राहू देत आहे. (त्यामुळे) ते या बंडखोरीमध्ये असेच भरकटत चालले आहेत. (१६) हेच ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाच्याऐवजी मार्गभ्रष्टता खरेदी केली आहे. परंतु त्यांच्या या व्यवहारामध्ये न त्यांना फायदा झाला न ते सन्मार्गावर आहेत. (१७) त्यांचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या व्यक्तीने अग्नी प्रज्वलित करावा, त्यामुळे सर्व परिसर प्रकाशमान व्हावा आणि (त्याचवेळी) अल्लाहने यांची दृष्टी हिरावून घ्यावी व याना अशा अवस्थेत सोडावे की अंधारात यांना काहीही दिसू नये.१६ (१८) हे बहिरे, मुके (व) आंधळे आहेत.१७ तेव्हा हे मागे परतणार नाहीत.
१५) अरबी भाषेत शैतान शब्द अहंकारी, उदंड आणि मर्यादाभंग करणाऱ्यासाठी वापरला जातो.”शैतान’ हा शब्द मनुष्य आणि जिन्न या दोहोंसाठी उपयोगात आणला जातो. कुरआनमध्ये हा शब्द जास्त करून शैतान जिन्नसाठी वापरला जातो. परंतु काही ठिकाणी शैतानी गुण असलेल्या माणसासाठीसुद्धा वापरला गेला आहे. संदर्भ व प्रसंग पाहुन कुठे हा शब्द शैतान, जिन्न अथवा मनुष्यासाठी वापरला हे स्पष्ट होते. येथे शैतान हा शब्द मोठमोठ्या सरदारांसाठी (पुढाऱ्यांसाठी) वापरला गेला आहे. हेच लोक त्यावेळी इस्लामच्या विरोधात पुढे पुढे नेतृत्व करीत होते. १६) अर्थ हा आहे की अल्लाहच्या एका दासाने प्रकाश प्रसारित केला आणि सत्याला असत्यापासून, खऱ्याला खोट्यापासून तसेच मार्गदर्शनाला पथ भ्रष्टतेपासून स्पष्टत: विलग केले. म्हणून जे लोक डोळस होते, त्यांना तर सत्य कळून चुकले. परंतु हे दांभिक जे आपल्या इच्छा-आकांक्षेच्या मागे लागून अंध बनले त्यामुळे त्यांना त्या प्रकाशात काहीच दिसले नाही. “अल्लाहने त्यांची दृष्टी हिरावून घेतली.’ या वाक्याने कोणी हा गैरसमज करून घेऊ नये की अंधारात भटकत राहण्यासाठीची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. अल्लाह प्रकाशाची ओळख अशा व्यक्तीपासून काढून घेतो जो स्वत: प्रकाशापासून तोंड फिरवून बसलेला असतो. जेव्हा अशा व्यक्तीने सत्य प्रकाशापासून तोंड फिरवून असत्याच्या अंधारात भटकणेच पसंत केले तेव्हा अल्लाहने त्याला तशीच प्रेरणा दिली. १७) सत्य ऐकण्यासाठी बहिरे, सत्य बोलण्यासाठी मुके आणि सत्य पाहण्यासाठी आंधळे बनले. [next] page ११ pg_११.jpg (१९) किंवा यांचे उदाहरण असे आहे की, आकाशातून पर्जन्याचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर अंधार, कडकडाट आणि लखलखाटही होत आहे. विजेचा कडकडाट ऐकून जीवाच्या भीतीने कानात बोटे खुपसून घेत आहेत आणि अल्लाहने या सत्य नाकारणाऱ्यांना चोहिकडून वेढले आहे.१८ (२०) लखलखाटामुळे यांची अवस्था अशी आहे जणू काही लवकरच यांची दृष्टी विजेच्या लखलखाटाने हिरावून घेतली जाईल. जेव्हा त्यांच्यावर वीज चमकते तेव्हा त्या प्रकाशात ते पुढे चालू लागतात. आणि जेव्हा त्यांच्यावर अंधार पसरतो तेव्हा ते उभेच राहतात.१९ अल्लाहने जर इच्छिले असते तर यांची श्रवणशक्ती व दृकशक्ती (दृष्टी) पूर्णतः हिरावून घेतली असती.२० निःसंशय अल्लाह सर्व गोष्टींवर सामर्थ्यवान आहे.
१८) म्हणजे कानात बोटे ठोसून ते स्वत:ला काही वेळेपुरते या गैरसमजुतीत फसवू शकतात की विनाशापासून वाचले जाऊ; परंतु खरेतर ते वाचू शकतच नाहीत कारण अल्लाह सर्वशक्तीनिशी अशा लोकांना व्यापून आहे. १९) पहिले उदाहरण त्या दांभिक लोकांचे आहे जे मनातून द्रोही होते आणि गरजेपोटी मुस्लिम बनले होते. दुसरे उदाहरण त्यांचे आहे जे शंकेत गुरफटलेल्या, स्थितीत आणि श्रद्धेमध्ये ते कमजोर होते. काही प्रमाणात सत्याला मान्य करीत होते परंतु सत्यावर एवढे दृढ नव्हते की त्यासाठी ते संकटाना आणि अडचणींना सामोरे जाऊ शकतील. येथे पावसाने अभिप्रेत इस्लाम आहे जो समस्त मानवतेसाठी कृपा बनून आला आहे. अंधार आणि विजांचा कडकडाट आणि चमकणेने अभिप्रेत संकटे व अडचणीचे प्रचंड वादळ आणि तो पराकोटीचा संघर्ष आहे जो इस्लामी आंदोलनाच्या विरोधात अज्ञानी लोकांकडून केला जात होता. शेवटी दांभिकांच्या त्या स्थितीची रूपरेखा आखली गेली की जेव्हा सोपी गोष्ट होते तेव्हा हे आगेकूच करतात आणि जेव्हा त्यांच्या मनोकामनांविरुद्ध आणि अनिष्ट रूढी-परंपराविरुद्ध आदेश दिले जातात तेव्हा स्तब्ध होतात. त्यांच्या इच्छा आकांक्षेविरुद्ध व मनाविरुद्ध काही घडले तर त्यांना कठीण जाते. २०) म्हणजे ज्याप्रकारे पहिल्या प्रकारच्या दांभिक लोकांची पाहण्याची शक्ती अल्लाहने नष्ट करून टाकली होती, त्याचप्रमाणे तो यांनादेखील सत्यासाठी आंधळा व बहिरा बनवू शकला असता. परंतु अल्लाहचा हा शिरस्ता नाही की जो कोणी एखाद्या मर्यादेपर्यंत पाहू व ऐकू इच्छित असेल त्याला पाहू व ऐकू देऊ नये. ज्या मर्यादेपर्यंत ते सत्य जाणून घेण्यास म्हणजेच सत्य ऐकण्यास व पाहण्यास तयार होते त्या मर्यादेपर्यंत अल्लाहने त्यांची पाहण्याची व ऐकण्याची तेवढी शक्ती कायम ठेवली. [next] page १२ pg_१२.jpg (२१) लोकहो,२१ बंदगी (आज्ञाधारकता) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वी जे होऊन गेले त्या सर्वांनाही निर्माण केले. जेणेकरून तुम्ही दुष्कृत्यांपासून२२ परावृत्त व सुरक्षित राहू शकाल. (२२) तोच तर आहे ज्याने तुमच्यासाठी पृथ्वीचा बिछाना आणि आकाशाचे छत बनवले. आणि आकाशातून पर्जन्य वर्षविले आणि त्यापासून सर्व प्रकारची पिके व फळे तुमच्या उपजीविकेसाठी उत्पन्न केली. तेव्हा हे तुम्ही जाणत असताना अन्य कुणालाही अल्लाहचे समवर्ती२३ ठरवू नका. (२३) जर तुम्हाला आमच्या दासांवरील या ग्रंथाचे अवतरण आमच्याकडून (साक्षात अल्लाहकडून) असण्याबद्दल शंका असेल तर यातील सूरह (अध्याया)समान एकच सूरह रचून दाखवा. आपल्या सर्व समर्थकांना बोलवा. एक अल्लाहशिवाय ज्या कुणाची हवी असेल त्याची मदत घ्या आणि जर तुम्ही खरे असाल तर हे कार्य करून दाखवा.२४
२१) कुरआनचे आवाहन समस्त मानवजातीसाठी जरी असले तरी त्यापासून फायदा घेणे अथवा न घेणे हे सर्वस्वी लोकांच्या इच्छेवर आणि त्यानुसार त्यांना लाभणाऱ्या अल्लाहच्या कृपेवर अवलंबून आहे. म्हणून आधी मानवामध्ये फरक करून स्पष्ट केले गेले की कोणत्या प्रकारचे लोक या ग्रंथापासून मार्गदर्शन प्राप्त करू शकतील आणि कोणत्या प्रकारचे लोक हा लाभ उठवू शकत नाहीत. यानंतर समस्त मानवतेसमोर मूळ गोष्ट ठेवली जात आहे ज्याकडे आवाहन करण्यासाठी कुरआन अवतरित झाला आहे. २२) म्हणजे जगात दुराचार व विकृतदृष्टी आणि परलोकात ईशप्रकोपापासून सुरक्षित राहण्याची अपेक्षा. २३) म्हणजे तुम्ही स्वत: या गोष्टीला मान्य करता आणि तुम्हाला माहीत आहे की हे सर्व कार्य अल्लाहचेच आहे; तर तुमची भक्ती फक्त अल्लाहसाठीच असली पाहिजे. दुसरा कोण यासाठी पात्र आहे ज्याची तुम्ही पूजाअर्चा करावी.? दुसऱ्यांना अल्लाहचा भागीदार ठरविण्याचा अर्थ भक्ती व पुजाअर्चेमध्ये अल्लाहसोबत दुसऱ्या एखाद्याचीसुद्धा पूजा केली जावी. पुढे कुरआन याविषयी तपशीलवार माहिती देत आहे की उपासनेच्या त्या कोणत्या पद्धती आहेत ज्या फक्त अल्लाहसाठीच निश्चित असाव्यात आणि दुसऱ्यांना त्यात सामील करणे म्हणजे ईशद्रोह (शिर्क) आहे ज्याला रोखण्यासाठी कुरआन आला आहे. [next] page १३ pg_१३.jpg (२४) मात्र जर तुम्ही तसे केले नाही आणि कदापि करू शकणार नाही, तर भिऊन असा त्या भयंकर अग्नीला ज्याचे इंधन असेल मानव व दगड२५ जो सत्याचा विरोध करणाऱ्यांसाठी भडकावलेला असेल. (२५) आणि हे पैगंबर (स.)! जे या ग्रंथावर ईमान धारण करतील व (यानुसार) सद्वर्तन करतील त्यांना खूशखबर द्या की त्यांच्यासाठी अशी नंदनवने असतील ज्यांच्या खालून झरे वाहत असतील. या बागांतील फळे दिसण्यात जगातील फळांसारखीच असतील. जेव्हा त्यांना एखादे फळ खाण्यासाठी दिले जाईल तेव्हा ते म्हणतील की अशीच फळे यापूर्वी जगात आम्हाला दिली जात असत.२६ त्यांच्यासाठी तिथे पवित्र व चारित्र्यवान पत्नीं असतील.२७ आणि ते सदैव तिथेच राहतील. (२६) नि:संशय डास किंवा त्यापेक्षाही क्षुल्लक गोष्टींचे उदाहरण देण्यास अल्लाहला मुळीच संकोच वाटत
२४) यापूर्व मक्का येथे अनेकदा आव्हान दिले गेले की जर तुम्ही या कुरआनला मनुष्य लिखित समजता तर त्याच्यासारखे एखादा ग्रंथ लिहून दाखवा. आता मदीना येथेसुद्धा याची पुनरावृत्ती केली जात आहे. (पाहा. कुरआन, १०:३८, ११:१३, १७:८८, ५२:३३-३४) २५) यात सूक्ष्म संकेत आहे की नरकाग्नीचे इंधन फक्त तुम्हीच राहणार नाही तर ते उपास्य (मूर्त) सुद्धा इंधन बनतील ज्यांची तुम्ही अल्लाहव्यतिरिक्त पुजाअर्चा करत आहात आणि ज्यांच्यापुढे तुम्ही नतमस्तक होत आहात. तुम्हाला तेव्हा स्वत: माहीत होईल की त्यांचा ईशत्वात कितपत सहभाग होता. २६) म्हणजे अनोळखी आणि निराळी फळे नसतील तर त्यांच्यासारखीच ती फळे असतील, ज्यांचा आस्वाद तुम्ही दुनियेत घेत होता. चवीत मात्र ते कैक पटीने गोड व चवदार असतील. स्वर्गातील लोक त्या फळांना पाहुन ओळखतील की हा आंबा, डाळींब आणि संत्रा आहे. परंतु चवीने मात्र जगातील फळांपेक्षा खूपखूप श्रेष्ठ असतील. २७) अरबी भाषेत “अज़वाज’ या शब्दाचा प्रयोग “जोडी’ साठी होतो. हा शब्द पती आणि पत्नी या दोघांसाठी उपयोगात येतो. पतीसाठी पत्नी “जौज’ आहे आणि पत्नीसाठी पती “जौज’ आहे. परंतु स्वर्गात ही जोडी पवित्र असेल. जगात जर पती सदाचारी व पत्नी दुराचारी असेल तर परलोकात त्यांचे संबंध तुटतील आणि त्या सदाचारी पतीला दुसरी एखादी सदाचारी पत्नी दिली जाईल. याउलट जगात जर पत्नी सदाचारी आहे आणि तिचा पती दुराचारी तर तिथे परलोकात तिला त्या वाईट पतीपासून सुटका मिळेल आणि दुसरा एखादा सदाचारी मनुष्य तिचा पती म्हणून जीवनसाथी बनविला जाईल. [next] page १४ pg_१४.jpg नाही.२८ जे लोक श्रद्धा ठेवतात ते जाणतात की हे त्यांच्या पालनकर्त्याकडून आलेले सत्य आहे. आणि जे नाकारणारे आहेत ते त्यास ऐकून म्हणतात की ‘‘या उदाहरणात अल्लाहचे काय प्रयोजन आहे?’’ अल्लाह याचव्दारे कित्येकांना मार्गभ्रष्ट होऊ देतो तर कित्येकांना सन्मार्ग दाखवितो.२९ आणि याव्दारा तो त्यांनाच मार्गभ्रष्ट करतो जे अवज्ञाकारी (फासिक) आहेत.३०(२७) अल्लाहशी केलेल्या वचनाशी दृढबद्ध झाल्यानंतरही जे वचनभंग करतात३१ आणि अल्लाहने ज्यांच्याशी संबंध जोडण्याचा आदेश दिला आहे त्याच्याशी संबंध तोडून टाकतात३२
जर जगात पती-पत्नी दोघे सदाचारी आहेत तर परलोक जीवनातसुद्धा हाच त्यांचा संबंध राहील. ते दोघे त्या शाश्वत जीवनात पती-पत्नी म्हणून राहतील. २८) येथे एका आक्षेपाचा उल्लेख केल्याविना त्याचे उत्तर दिले आहे. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कोळी, माशी, मच्छर इ.ची उदाहरणे दिली गेली आहेत. याविषयी विरोधकांचा आक्षेप होता की हा कसा ईशग्रंथ आहे ज्यात अशा क्षुल्लक उपमा दिल्या आहेत. त्यांचे म्हणणे होते की ही जर ईशवाणी असती तर अशा क्षुल्लक गोष्टींचा उल्लेख त्यात नसता. २९) म्हणजे जे कोणी सत्य जाणून घेऊ इच्छित नाही व त्यांना सत्याची चाडही नाही, त्यांची दृष्टी फक्त बाह्य शब्दांवर टिकून राहाते आणि ते त्या गोष्टीपासून उलटे निष्कर्ष काढून सत्यापासून आणखीन दूर जातात. मात्र जे सत्य जाणून घेणारे आहेत आणि सद्विवेकबुद्धीला बाळगून आहेत, त्यांना तर येथे चातुर्याचे गुण सापडतात. त्यांचे मन ग्वाही देऊ लागते की अशा तात्विक गोष्टी अल्लाहकडूनच असू शकतात. ३०) फासिक म्हणजे अवज्ञाकारी व मर्यादांचे उल्लंघन करणारा. ३१) बादशाह आपले नोकर-चाकर व प्रजेच्या नावे जो आदेश देतो त्यास अरबी भाषेत “अहद’ (वचन) म्हणतात. कारण त्याची अंमलबजावणी प्रजेवर बंधनकारक आहे. अल्लाहचा “अहद’ म्हणजे तो स्पष्ट आदेश ज्यान्वये समस्त मानवजात त्याचीच पूजा, बंदगी व आज्ञापालन करण्यास बाध्य आहे. “पक्का निर्धार केल्यानंतर’ (दृढबद्ध झाल्यानंतरही) ने अभिप्रेत आहे की आदम (अ.) (प्रथम मानव) च्या निर्मितीच्या वेळी समस्त मानवजातीकडून या आदेशाचे काटेकोर पालन केले जाईल असे वचन घेण्यात आले होते. कुरआन ७:१७२ मध्ये याविषयी तपशीलवार माहिती आली आहे. ३२) म्हणजे जे संबंध स्थापित व दृढ करणे यावर मनुष्याचे व्यक्तीगत व सामुदायिक यश अवलंबून आहे आणि ज्यांना दुरुस्त राखण्याची अल्लाहने ताकीद केली आहे; त्या संबंधाचा हे लोक विच्छेद करतात. [next] page १५ pg_१५.jpg आणि पृथ्वीवर अनाचार माजवितात३३ हेच ते आहेत जे नुकसान भोगणार आहेत. (२८) अल्लाहला तुम्ही कसे नाकारता? जेव्हा तुम्ही निर्जीव होतात तेव्हा त्याने तुम्हाला जीवन प्रदान केले. नंतर तोच तुमचे प्राण हरण करील. नंतर तुम्हाला तोच पुन्हा जिवंत करील. नंतर त्याच्याकडेच तुम्हाला परत जावयाचे आहे. (२९) तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. नंतर आकाशाभिमुख झाला आणि सप्तआकाश३४ व्यवस्थित बनविले. आणि तोच प्रत्येक गोष्टीला जाणतो आहे.३५
३३) येथे तीन वाक्यात अवज्ञा आणि अवज्ञाकारींचा (फासिक) तपशील आला आहे. अल्लाह आणि दासांदरम्यानचा संबंध आणि माणसामाणसातील संबंध विच्छेद करण्याचे अनिवार्य परिणाम उपद्रव आहे. जो या उपद्रवाला कारणीभूत होतो तोच दुराचारी, उपद्रवी आहे. ३४) सात आकांशाची वस्तुस्थिती काय आहे हे सांगणे कठीण आहे. मनुष्य आकाश म्हणजेच पृथ्वीच्या पलीकडील सृष्टीसंबंधी निरीक्षण आणि संकल्पनेनुसार विविध निष्कर्ष काढत आला आहे जे सदैव बदलत राहिले आहेत. म्हणून त्यांच्यापैकी एखाद्या संकल्पनेला मूलाधार समजून कुरआनच्या या शब्दांचा अर्थ लावणे योग्य नाही. एकंदरीत असे म्हणता येईल की पृथ्वी पलीकडे सृष्टी आहे. तिचे अल्लाहने सात मजबूत टप्पे पाडलेले असावेत किंवा जमीन या सृष्टीच्या ज्या भागात आहे त्या सृष्टीचे एकूण सात विभाग आहेत. ३५) येथे दोन महत्वपूर्ण गोष्टींपासून सचेत केले आहे. एक म्हणजे तुम्ही अल्लाहविरुद्ध विद्रोह आणि नाकारण्याचे धाडस कसे करता जो तुमच्या प्रत्येक कृत्यास जाणून आहे. दुसरे असे की जो अल्लाह समस्त वस्तुस्थितीचे ज्ञान राखून आहे, त्याच्याशी विमुख होऊन तुमचे अंधारात भटकण्याव्यतिरिक्त दुसरा काय परिणाम निघू शकतो? [next] page १६ pg_१६.jpg (३०) आणि आठवण करा३६ जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना३७ सांगितले, ‘‘मी पृथ्वीवर एक खलीफा३८ (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ तेव्हा त्या दूतांनी विचारले, ‘‘काय, तू धरतीच्यामध्ये त्याला नियुक्त करणार आहेस, जो धरती व्यवस्थेला बिघडवील आणि रक्तपात करील?३९ (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगान व
३६) वरच्या प्रभागात (रुकू) मध्ये अल्लाहची बंदगी (भक्ती) चे आवाहन या आधारे दिले की तो तुमचा मालक, पालक व शासक आहे. त्याच्याच हातात तुमचे जगणे आणि मरणे आहे आणि ज्या सृष्टीत तुम्ही राहत आहात त्याचा नियंता आणि मालक तोच आहे. म्हणून त्याचीच भक्ती व उपासनेशिवाय दुसरा प्रकार योग्य नाही. आता या प्रभागात हेच आवाहन या आधारे दिले जात आहे की या जगात अल्लाहने तुम्हाला त्याचा प्रतिनिधी (खलीफा) नियुक्त केले आहे. प्रतिनिधीच्या नात्याने तुमची हीच निव्वळ जबाबदारी नाही की त्याची उपासना करावी; तर तुम्ही त्याच्या अवतरित आदेशानुसार जीवनयापन करावे. या संदर्भात मनुष्याची वस्तुस्थिती आणि सृष्टीत त्याचे स्थान स्पष्ट केले आहे आणि मानवी इतिहासातील तो अध्याय वर्णन केला गेला आहे, ज्याला माहीत करून घेण्यास मनुष्यासमोर दुसरा मार्ग उपलब्ध नाही. येथे जे निष्कर्ष निघतात ते अमोल निष्कर्ष आहेत. जमिनीतून हाडे काढून त्यावरून जे कपोलकल्पित निष्कर्ष काढले जातात ते सर्व यापुढे शुल्लक आहेत. ३७) अरबी शब्द “मलक’चा अर्थ “संदेश देणारा’ होतो. याचा शाब्दिक अर्थ “पाठविलेला’ किंवा “फरिश्ता’ आहे. मात्र अशा शक्ती नव्हेत ज्यांचे अस्तित्व नसावेत. परंतु त्या स्वतंत्र व्यक्तिमत्व असणाऱ्या शक्ती आहेत ज्यांच्याकडून अल्लाह आपल्या या महान साम्राज्याचे व्यवस्थापन व नियोजनाचे कार्य घेतो. ३८) “खलीफा’ जो आपल्या स्वामीने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करून त्याच्या साम्राज्यात त्याचा नायब म्हणून कार्यरत राहातो. (स्वामी इच्छेला पूर्णत्वास नेतो.) ३९) हा फरिश्त्यांचा आक्षेप नव्हता तर त्यांचा तो प्रश्न होता. फरिश्त्यांची काय बिशाद की अल्लाहच्या निर्णयावर आक्षेप घ्यावा. “खलीफा’ या शब्दाने फरिश्ते उमजून बसले होते की पृथ्वीवर मनुष्याला काही अधिकार अल्लाह बहाल करू इच्छितो. परंतु त्यांना हे उमजत नव्हते की सृष्टी व्यवस्थेत अधिकारप्राप्त एखाद्या निर्मितीला काय वाव असू शकतो. जर एखाद्याला थोडेफार अधिकार दिले तर राज्यातील त्या भागातील व्यवस्था कशी सुरक्षित राहील, ते जाणू इच्छित होते. [next] page १७ pg_१७.jpg पवित्र्यगान होत आहे,४० (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ‘‘मी जाणतो जे तुम्ही जाणत नाही.’’४१ (३१) नंतर अल्लाहने आदमला सर्व नावे शिकविली.४२ नंतर त्यांना (सर्व वस्तूंना) दूतांसमोर ठेवले आणि म्हणाला, ‘‘जर तुम्ही सत्यवादी असाल, (की प्रतिनिधी नियुक्त केल्याने व्यवस्था बिघडून जाईल) तर जरा या वस्तूंची नावे सांगा!’’ (३२) ते म्हणाले, ‘‘तूच महिमावंत आहेस. तू जे काही आम्हाला शिकवलेस तेवढेच ज्ञान आम्हाला आहे.४३ नि:संशय तूच सर्वज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेस.’’ (३३) मग अल्लाहने आदमला सांगितले ‘‘यांना या सर्व वस्तूंची नावे सांग.’’ नंतर जेव्हा त्याने (आदमने) दूतांना सर्व नावे
४०) येथे ईशदूतांचा (फरिश्ते) हेतू खिलाफत (प्रतिनिधित्व) स्वत:ला मिळावे असा मुळीच नव्हता आणि त्यांची भूमिका अशी नव्हती की तो आमचा हक्क आहे, तर अर्थ हा होता की ईशआदेशाचे पालन पूर्णत: होत आहे. अल्लाहच्या मर्जप्रमाणे संपूर्ण सृष्टी पवित्र ठेवली जात आहे आणि अल्लाहचे स्तवन आणि स्तुतीगान आम्ही फरिश्ते मोठ्या आदराने सतत करीत आहोत. अशा स्थितीत कमी कोणत्या गोष्टीची राहिली आहे की ज्यासाठी “खलीफा’ ची नियुक्ती केली जात आहे? यामागचे कारण आम्हाला समजू शकले नाही. (“तसबिह’चा अर्थ स्तुतीगान करणे आणि स्फूर्तने काम करणेसुद्धा होतो). ४१) ईशदूतांच्या (फरिश्ते) दूसऱ्या शंकेचे हे उत्तर आहे. अर्थात खलीफा नियुक्तीचे रहस्य आणि आवश्यकता मी जाणतो तुम्ही नव्हे. आपल्या ज्या सेवांचा उल्लेख तुम्ही करत आहात त्या पुरेशा नाहीत तर त्याहून अधिक काही अपेक्षित आहे. याचसाठी भूतलावर एक अशी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला गेला ज्याला काही अधिकार दिले जावेत. ४२) मनुष्याच्या ज्ञानाचे स्वरुप हेच आहे की तो नामनिर्देश करून वस्तूंबद्दल जाणून घेतो. मनुष्याचे सर्व ज्ञान हे वास्तविकपणे त्या त्या वस्तूंच्या नावांवर अवलंबून आहे. आदम (अ.) यांना सर्व नावं शिकविण्यामागचा उद्देश त्यांना सृष्टीचे ज्ञान देणे हा होता. ४३) असे कळते की प्रत्येक प्रकारच्या ईशदूताचे (फरिश्ता) ज्ञान फक्त विशिष्ट मर्यादित क्षेत्रापुरतेच आहे ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे. उदा. हवेसाठी जे ईशदूत नियुक्त केले आहेत त्यांना हवेविषयी पूर्ण ज्ञान देण्यात आले, परंतु ते पाण्याविषयी काहीच जाणत नाहीत. हीच स्थिती दुसऱ्या विभागांच्या ईशदूतांची आहे. या विपरीत मनुष्याला व्यापक ज्ञान दिले गेले आहे. परंतु मनुष्य एक एका क्षेत्राविषयी जरी संबंधित क्षेत्रातील फरिश्त्याच्या तुलनेत कमी जाणत असला तरी एकंदरीत जी सर्वसमावेशकता मानवाच्या ज्ञानाला दिली गेली ती फरिश्त्यांना प्राप्त नाही. [next] page १८ pg_१८.jpg सांगितली४४ तेव्हा (अल्लाह) म्हणाला, ‘‘काय, मी तुम्हाला सांगितले नव्हते की, आकाश आणि पृथ्वीमधील सर्व गुप्त गोष्टी मीच जाणतो आणि मी तेही जाणतो जे काही तुम्ही प्रकट करता आणि जे काही लपविता’’ (३४) आणि जेव्हा आम्ही दूतांना (फरिश्त्यांना) आदेश दिला की, आदमच्या पुढे नतमस्तक व्हा. तेव्हा सर्वजण४५ नतमस्तक झाले. परंतु इब्लीस४६ झाला नाही. त्याने नाकारले व अहंकार केला आणि अवज्ञाकारींपैकी झाला.४७(३५) मग आम्ही आदमला सांगितले, ‘‘हे आदम,
४४) हे ईशदूतांच्या (फरिश्ते) पहिल्या शंकेचे उत्तर आहे. अल्लाहने त्यांना स्पष्ट सांगितले की आदम (अ.) यांना फक्त अधिकारच देण्यात आले नाही तर ज्ञानसुद्धा देत आहे. त्याच्या नियुक्तीने पृथ्वीवर उपद्रव होण्याविषयीची जी शंका ईशदूतांना आली होती, तो केवळएक भाग आहे व दुसरा भाग सुधार आणि विकासाचासुद्धा आहे आणि तो उपद्रवापेक्षा जास्त महत्वाचा आणि मूल्यवान आहे. ४५) म्हणजे जमीन आणि तिच्या संबंधित सृष्टीच्या विभिन्न क्षेत्रांत जितके फरिश्ते (ईशदूत) कार्यरत आहेत त्या सर्वांना मनुष्याच्या आधीन होण्याचा आदेश दिला आहे. सृष्टीच्या या भागात पृथ्वीवर मनुष्याला अल्लाहच्या आदेशाने त्याचा प्रतिनिधी (खलीफा) नियुक्त करण्यात येत होते म्हणून आदेश देण्यात आला की मनुष्य ज्याला अल्लाहने अधिकार बहाल केले त्यांना तो सत्य किंवा चुकीच्या कोणत्याही मार्गात वापरात आणू इच्छित असेल ज्याचे त्याला अल्लाहने स्वातंत्र्य दिले आहे; तेव्हा तुमचे कर्तव्य आहे की त्या त्या क्षेत्रातील नियुक्त फरिश्त्यांनी त्यासाठी सहकार्य करावे. परंतु हेसुद्धा शक्य आहे की केवळ आधीन होण्यासच सजदाच्या नावाने व्यक्त करण्यात आले असावे किंवा या आधीन होण्याच्या स्वरुपात एखाद्या प्रत्यक्ष कृतीचा आदेशसुद्धा दिला गेला असावा, हे जास्त योग्य वाटते. ४६) “इब्लीस’ शब्दाचा अनुवाद “आत्यंतिक निराश’ आहे. परिभाषेत हे त्या “जिन्न’चे नाव आहे ज्याने अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा केली आणि आदम (अ.) यांच्या संततीच्या आधीन राहण्यास नकार दिला. यालाच शैतान म्हटले आहे. हे केवळ एखाद्या शक्तीचे नाव नसून तेसुद्धा मानवाप्रमाणे एक निश्चित असे व्यक्तित्व धारण केलेले अस्तित्व आहे. म्हणून कुरआन याचापुढे खुलासा करतो की इब्लीस जिन्नपैकी होता जे ईशदूत (फरिश्ते) पेक्षा वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. ४७) यावरून असे ज्ञात होते की संभवत: इब्लीस नतमस्तक होण्यास नकार देणारा एकटाच नव्हता तर जिन्नचा एक गट अवज्ञेवर प्रवृत्त झाला होता. इब्लीसचे नाव याकरिता घेतले गेले की तो या गटाचे नेतृत्व करत होता व अवज्ञेत पुढाकार घेत होता. या आयतचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, “”तो (इब्लीस) नाकारणाऱ्यांपैकी होता.” याने तात्पर्य असे की जिन्नांचा एक गट पहिल्यापासूनच अस्तित्वात होता जो बंडखोर आणि अवज्ञाकारी होता. इब्लीसचा संबंध याच गटाशी होता. कुरआनमध्ये शैतान या शब्दाचा प्रयोग या जिन्न आणि त्यांच्या वंशासाठी प्रयुक्त झाला आहे. जिथे शैतान शब्द मनुष्यासाठी वापरला गेल्याचा संकेत नसेल तिथे शैतान जिन्नच अभिप्रेत असतात. [next] page १९ pg_१९.jpg तू आणि तुझी पत्नी दोघेही स्वर्गामध्ये राहा आणि इथे मनसोक्त हवे ते खा. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका.४८ अन्यथा तुम्ही अत्याचारी४९ व्हाल.’’ (३६) शेवटी शैतानाने त्यादोघांना त्या झाडाचे प्रलोभन दाखऊन आमची अवज्ञा करविली आणि त्यांना ज्या स्थितीत ते होते तिथून बाहेर काढविले (तेव्हा) आम्ही आदेश दिला, ‘‘खाली उतरा तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात.५० आणि तुम्हाला एका निश्चित काळापर्यंत पृथ्वीवर राहावयाचे आहे आणि तिथेच निर्वाह करायचा आहे. (३७) त्यावेळी आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने
४८) यावरुन माहीत होते की धरती अर्थात आपल्या नियुक्तीस्थळावर प्रतिनिधी म्हणून पाठविण्याअगोदर या दोघांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांना स्वर्गात ठेवले होते जेणेकरून त्यांचा कल कुणीकडे आहे, हे पाहिले जावे आणि हे माहीत व्हावे की शैतानाच्या बहकविण्याच्या विरोधात मनुष्य कोणत्या मर्यादेपर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन करील. याची परीक्षा घेण्यासाठी एका वृक्षाची निवड करण्यात आली आणि आदेश देण्यात आला की त्याच्या जवळही फिरकू नये. याचा परिणामसुद्धा स्पष्ट करण्यात आला की असे कराल तर आमच्या नजरेत अवज्ञाकारी सिद्ध व्हाल. वृक्षाचे नाव व तपशील सांगितला गेला नाही कारण तपशील अवाजवी होता. परीक्षेसाठी स्वर्गाची जागा निवड करण्याचा उद्देश वास्तवात माणसाच्या मनात ही गोष्ट दृढ करणे होते की मनुष्यासाठी त्याच्या पदानुसार स्वर्गाचे ठिकाणच योग्य आहे. (म्हणून मनुष्याने असेच आचरण करणे योग्य आहे व आवश्यक आहे ज्यामुळे त्याला त्याचे पात्र ठिकाण प्राप्त व्हावे.) ४९) “जुल्म’ (अत्याचार) म्हणजे हक्कांची पायमल्ली करणे आहे. जो माणूस अल्लाहची अवज्ञा करतो, तो वस्तुत: तीन मुख्य हक्क पायदळी तुडवितो. प्रथम, अल्लाहचा हक्क. कारण त्याचे आज्ञापालन केले जावे. याचा तो हकदार आहे. दुसरे, त्या सर्व गोष्टींचे हक्क ज्यास त्याने या नाफरमानीच्या अपराधात वापरले कारण की या सर्वांचा त्याच्यावर हा हक्क होता की त्याने फक्त त्यांच्या स्वामीच्या मर्जनुसार त्यांच्यावर आपले अधिकार वापरावेत. तिसरा प्रकार म्हणजे स्वत:च्या हक्कास पायदळी तुडविणे कारण मनुष्यावर त्याचा स्वत:चा हा हक्क आहे की अल्लाहच्या आदेशाच्या अवज्ञेपासून दूर राहून विनाशापासून स्वत:चा बचाव करावा. याच कारणामुळे कुरआनमध्ये अनेक ठिकाणी “जुल्म’ (अत्याचार) हा शब्द गुन्ह्यासाठी आणि गुन्हेगारासाठी जालीम (अत्याचारी) वापरला गेला आहे. ५०) म्हणजे “”मनुष्याचा शत्रू शैतान व शैतानाचा शत्रू मनुष्य” आहे. शैतान मनुष्याचा शत्रू असणे तर उघड आहे पण माणसाने शैतानाचा शत्रू असणे याचा अर्थ माणसाने तर शैतानाशी शत्रुत्व ठेवलेच पाहिजे हे रास्त आहे. परंतु ही मनुष्याची स्वत:शी धोकेबाजी आहे की तो शैतानाला आपला मित्र बनवितो. [next] page २० pg_२०.jpg शिकून घेतली आणि पश्चात्ताप५१ व्यक्त केला. तेव्हा अल्लाहने त्याच्या पश्चात्तापाचा स्वीकार केला. नि:संशय तो क्षमावंत आणि दयावंत आहे.५२(३८) आम्ही सांगितले, ‘‘तुम्ही सर्वजण इथून खाली उतरा.५३ नंतर जर माझ्याकडून तुमच्याकडे काही मार्गदर्शन लाभले तर जे माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतील तर त्यांना
५१) जेव्हा आदम (अ.) यांना आपली चूक समजली आणि त्वरित अवज्ञेऐवजी अल्लाहच्या आज्ञाधारकतेकडे वळण्यास प्रवृत्त झाले. त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली होती की आपल्या पालनकर्त्याशी आपल्या चुकीची क्षमायाचना करावी. तेव्हा आदम (अ.) यांना क्षमायाचनेसाठी शब्द सापडत नव्हते. अल्लाहने त्या दोघांवर दया दाखवून प्रार्थनेचे शब्द त्यांना शिकविले. “तौबा’ याचा अर्थ परत येणे व क्षमायाचना करणे असा आहे. दासाने “तौबा’ करणे म्हणजे दास बंडखोरी सोडून आज्ञाधारकतेकडे परतला आणि अल्लाहकडून “तौबा’चा अर्थ असा आहे की तो आपल्या लज्जित झालेल्या दासांकडे आपल्या कृपेसह आकृष्ट झाला. अशा स्थितीत अल्लाह आपल्या दासांवर कृपावर्षाव करून त्याच्याकडे आकृष्ट होतो. ५२) कुरआन या विचारसरणीचे खंडण करतो की गुन्ह्याचे दुष्परिणाम निश्चित आहेत आणि ते मनुष्याला भोगावेच लागणार आहे. ही मानवनिर्मित भ्रष्ट विचारसरणींपैकी एक घातक विचारसरणी आहे. मनुष्याने जर गुन्हा केला तर यानुसार तो या विचाराने नेहमीसाठी निराश होतो. परंतु कुरआन या विचारसरणीविरुद्ध तत्व मांडतो की सदाचाराचा मोबदला व दुराचाराची शिक्षा देणे अल्लाहच्याच हातात आहे. तुम्हाला ज्या सदाचाराबद्दलचा चांगला मोबदला मिळतो तो त्या सदाचाराचा स्वाभाविक परिणाम नसून अल्लाहची कृपा आहे, हवे तर करील किंवा नाही. याचप्रमाणे ज्या दुराचाराची तुम्हाला शिक्षा मिळते तीसुद्धा दुराचाराचा स्वाभाविक परिणाम नाही की तसेच व्हावे किंबहुना अल्लाहला पूर्ण अधिकार आहे की त्याला माफ करावे अथवा शिक्षा द्यावी. (अल्लाह आपल्या निर्मितीविषयीचा निर्णय पूर्ण न्यायानिशीच घेतो.) ५३) वर हा उल्लेख आला आहे की आदम (अ.) यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि अल्लाहने त्यांचा पश्चात्ताप स्वीकारला. याचा अर्थ हा आहे की, गुन्हेगारीचा जो डाग त्यांना लागला होता तो धूवून टाकला गेला. हा डाग त्यांच्यावर आणि त्यांच्या संततीवर अजिबात शिल्लक राहिला नाही त्यासाठी आता अल्लाहचा एकमात्र पुत्र बनवून (अल्लाहचा आश्रय करोत) समस्त मानवजातीच्या गुन्ह्याच्या मोबदल्यात (कफ्फारा) सुळीवर चढण्यासाठी कोणाला पृथ्वीवर पाठविण्याची गरज राहिली नव्हती. आता स्वर्गातून बाहेर पडण्याचा जो आदेश पुन्हा दिला गेला तो म्हणजे आदम (अ.) यांची क्षमायाचना कबूल करण्याचा अर्थ हा नव्हता की त्यांना स्वर्गातच राहू देणे. त्यांना तर भूतलावरील प्रतिनिधित्वा (खिलाफात) साठीच निर्माण केले होते. स्वर्ग त्यांचे निवासस्थान नव्हते. स्वर्गातून त्यांना बाहेर काढणे म्हणजे शिक्षा नव्हती. मूळ योजना त्यांना (आदम (अ.) आणि हव्वा (अ.)) भूतलावर उतरविण्याचीच होती. या अगोदर त्यांना जन्नत (स्वर्ग) मध्ये परीक्षा घेण्यासाठी ठेवले गेले होते ज्याचा उल्लेख वर आला आहे. (टीप नं. ४८) [next] page २१ pg_२१.jpg न कोणते भय असेल, न ते कधी शोक करतील. (३९) आणि जे लोक हे मान्य करणे नाकारतील आणि आमच्या आयतींना५४ खोटे लेखतील तेच नरकाग्नीमध्ये पडतील आणि तिथेच सदैव खितपत राहतील.५५(४०) ‘‘हे इस्राईच्या संततींनो!५६ आठवण करा माझ्या त्या अनुग्रहाची जो मी तुमच्यावर केला होता आणि माझ्याशी केलेल्या वचन-कराराची तुम्ही पूर्तता करा. तुमच्याशी केलेल्या कराराची मी पूर्तता करीन आणि फक्त माझेच भय बाळगा. (४१) आणि जो ग्रंथ मी अवतरला आहे त्यावर श्रद्धा ठेवा. जो तुमच्याजवळ असलेल्या ग्रंथाचे समर्थन करणारा आहे. आणि त्याला सर्वांपेक्षा अगोदर नाकारणारे
५४) आयतचे अनेकवचन आयात होते. आयत म्हणजे संकेत, चिन्ह जे एखाद्या गोष्टीकडे निर्देश करते. कुरआनमध्ये हा शब्द चार वेगवेगळ्या अर्थाने आला आहे. एक निशाणी, चिन्ह, दुसरे कुठे सृष्टी निशाण्यांना अल्लाहची आयत म्हटले गेले आहे. कारण सृष्टीच्या निरीक्षणाने कळते की सृष्टीतील प्रत्येक वस्तू या सत्यतेकडे इशारा करीत आहे जी या बाह्य आवरणापलीकडे आहे. तिसरे, पैगंबरांच्या चमत्कारांना (मोजिजा) आयात म्हटले आहे, कारण हे चमत्कार या सत्यतेचे प्रतीक होते की पैगंबर सृष्टी निर्माणकर्त्या अल्लाहचे प्रतिनिधी आहेत. चौथे, कधी ईशग्रंथाच्या भागांना आयात संबोधले गेले आहे, कारण ते फक्त सत्याकडेच मार्गदर्शन करतात, असे नव्हेतर त्यांच्यामध्ये खरेतर या ग्रंथाच्या महिमावान लेखकाच्या व्यक्तित्व निशाण्या स्पष्टत: जाणवतात. ५५) मानवजातीच्या बाबतीतील निर्मितीपासून ते प्रलयापर्यंतचा हा शाश्वत ईशादेश आहे. अल्लाहने यास तिसऱ्या प्रभागात (रुकु) अल्लाहचा अहद (वचन) या नावाने संबोधन केले आहे. स्वत: मार्गाची निश्चिती करणे मनुष्याचे काम नाही, तर अल्लाहचा दास आणि त्याचा प्रतिनिधी या दोन्ही भूमिकेतून त्याने त्याच मार्गावर चालावे जो मार्ग अल्लाहने दाखवून दिला आहे. ५६) इस्राईलचा अर्थ होतो अल्लाहचा दास (अब्दुल्लाह). ही उपाधी आदरणीय याकूब (अ.) यांना अल्लाहकडून देण्यात आली होती. त्यांच्याच संतती (यहुदी) ला बनीइस्राईल असे म्हणतात. (मदीना आणि त्याच्या आजूबाजूला यहुदी मोठ्या संख्येने राहात होते म्हणून) आता येथून ते चौदाव्या प्रभागापर्यंत (आयत ४० ते १२१ पर्यंत) या समुदायाला संबोधन निरंतर आले आहे ज्यात काही ठिकाणी ख्रिश्चन व अनेकेश्वरवादी अरबांकडे तसेच मुस्लिमांनासुद्धा संबोधन आले. या व्याख्यानाला वाचतांना खालील गोष्टींना डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. [next] page २२ pg_२२.jpg तुम्हीच होऊ नका. आणि माझ्या आयतींना अल्पश:लाभासाठी विकू नका.५७ माझ्या कोपापासून स्वत:ला वाचवा (४२) आणि सत्याला असत्याचे आवरण घालून सत्याला संदिग्ध करू नका आणि हेतुपुरस्सर सत्य लपवू नका जेव्हा तुम्ही जाणता.५८ (४३) नमाज कायम करा, जकात अदा करा५९ आणि जे माझ्यापुढे झुकत आहेत
१) मागील काळातील पैगंबरांच्या अनुयायांपैकी जे काही थोडे लोक अद्याप हयात (जिवंत) आहेत, त्यांच्यात सत्याचा अंश बाकी आहे. त्या सर्वांना या सत्यावर श्रद्धा ठेवण्याचे व सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात यावे ज्याला घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) आले आहेत. २)सर्व यहुदींसमोर पूर्ण सत्य प्रकट करणे आणि त्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिक तसेच जीवनपद्धतीच्या सद्यस्थितीला स्पष्ट उघडे करून देणे. याचा फायदा असा झाला की यहुदींपैकी जे सदाचारी होते त्यांचे डोळे उघडले, तर दुसरीकडे मदीनेतील लोकांवर व अनेकेश्वरवादींवर यहुद्यांचा धार्मिक व नैतिक प्रभाव होता तो नष्ट झाला. तसेच स्वत:चे पितळ उघडे पडल्यावर त्यांचे धैर्य इस्लामच्या विरोधात खचले गेले. ३)मागील चार प्रभागांमध्ये (आरभांपासुन ते ३९ आयतीपर्यंत) इस्लामचे आवाहन करतांना समस्त मानवजातीला संबोधन होते. त्याच संदर्भात एका राष्ट्राचे उदाहरण देऊन लोकांना ईशमार्गदर्शनाकडे विमुखता स्वीकारण्याचा काय दुष्परिणाम होतो हे उदाहरणासह दाखवून दिले. ४)चौथे, यावरून पैगंबर (स.) यांच्या अनुयायींना शिकवण दिली गेली आहे की त्यांनी ईशमार्गदर्शनाची अवहेलना करून अध:पतित होऊ नये जसे पूर्वच्या पैगंबरांचे अनुयायीं झाले होते. ५७) थोड्याशा किंमतीचा अर्थ भौतिक फायदे आहेत, ज्यांच्यासाठी हे लोक अल्लाहच्या आदेशाला आणि मार्गदर्शनाला रद्द करीत होते. ५८) या आयतीला समजण्यासाठी हे लक्षात ठेवले पाहिजे की अरब लोक सामान्यत: अशिक्षित होते तर यहुदी सुशिक्षित होते. त्यामुळे अरबांवर यहुदी लोकांचा शिक्षित होण्याचा प्रभाव जास्त होता. त्यांच्या पुरोहित व पंडितांनी याचा चांगलाच फायदा उठविला होता. अशा स्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना जेव्हा इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन देणे सुरु केले तेव्हा स्वाभाविकपणे अशिक्षित अरब लोक ग्रंथधारक यहुदी लोकांकडे जाऊन याविषयी विचारणा करू लागले. ते विचारू लागले की तुम्हीसुद्धा एका पैगंबराचे अनुयायी आहात आणि एका ग्रंथाला मानतात. तुम्ही आम्हाला सांगा की हे जे आमच्यापैकी आहेत आणि पैगंबर असण्याचा दावा करतात; तर तुमचा त्यांच्या शिकवणीविषयी काय विचार आहे ? उत्तरादाखल यहुदींना हे सांगणे तर कठीण होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन खोटे आहे. परंतु ते हे स्पष्ट सांगण्यास तयार नव्हते. या दोन्ही स्थितीतून त्यांनी एक मार्ग काढला की, प्रत्येक प्रश्नकर्त्याच्या मनात पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या ध्येयाविरोधात भ्रम निर्माण करू लागले. एखादा खोटा आरोप पैगंबर मुहम्मद (स) यांच्यावर लावला जात असे. काही असे कुंभाड रचत की लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण व्हाव्यात. त्यांची हीच कपट-कारस्थानं होती ज्यामुळे त्यांना सांगितले जात आहे, “”सत्यावर असत्याची आवरणे टाकू नका” आपल्या खोट्या प्रचाराने आणि खोडसाळ आक्षेपांनी सत्याला दाबून टाकण्याचे प्रयत्न करू नका व सत्य व असत्याची सरमिसळ करून जगाला धोका देऊ नका. [next] page २३ त्यांच्यासोबत तुम्हीही झुका. (४४) तुम्ही तर इतरांना सन्मार्गाचा अंगीकार करण्यास सांगता परंतु स्वतःला मात्र विसरता? वास्तविक तुम्ही ग्रंथाचे वाचन करीत आहात. काय तुम्ही बुद्धीचा मुळीच उपयोग करीत नाही? (४५) संयम व नमाजाचे६० सहाय्य घ्या. नि:संशय नमाज हे अत्यंत कठीण कर्म आहे. परंतु त्या आज्ञाकारी सेवकांसाठी कठीण नाही (४६) जे जाणतात की सरतेशेवटी आपल्या पालनकर्त्याला भेटावयाचे आहे आणि त्याच्याचकडे परत जावयाचे आहे.’’६१(४७) ‘‘हे इस्राईलच्या संततीनों! आठवण करा माझ्या अनुग्रहाची ज्याने मी तुम्हाला उपकृत केले होते. आणि जगातील सर्व जनसमूहावर श्रेष्ठत्व प्रदान केले होते.६२ (४८) आणि त्या दिवसाचे भय बाळगा जेव्हा कुणीही कुणाच्या यत्किंचितही उपयोगी पडणार नाही.
५९) नमाज आणि जकात प्रत्येक काळात इस्लामचे मूलतत्व राहिले आहेत. सर्व पैगंबरांप्रमाणे बनीइस्राईलच्या पैगंबरांनीसुद्धा याची सक्त ताकीद केली होती; परंतु यहुदी यापासून गाफील बनले होते. सामुदायिक नमाज पठणाची परंपरा त्यांच्याजवळ नष्ट झाली होती. समाजात वैयक्तिकरित्या नमाजचे प्रचलनसुद्धा बंद झाले होते आणि जकात देण्याऐवजी हे लोक व्याज खाऊ लागले होते. ६०) म्हणजे तुम्हाला सन्मार्गावर चालणे कठीण जाते तर याचा उपाय नमाज आणि संयम आहे. या दोन्ही गोष्टीमुळे तुम्हाला ती ताकत प्राप्त होईल ज्यामुळे हा मार्ग सोपा होईल. “सब्र’ याचा अर्थ रोखणे व बांधणे आहे. म्हणजेच हेतूची मजबूती, दृढ संकल्प आणि वासनांवर दृढ नियंत्रण ज्यामुळे मनुष्य वासनेच्या व इच्छेच्या आहारी न जाता तसेच बाह्य संकटाला न डगमगता आपल्या आंतरमनाने निश्चित केलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत जातो. अल्लाहच्या आदेशाचा अर्थ आहे की या नैतिक गुणाला आपल्या मनात रूजवा आणि बाहेरून त्याला सामर्थ्य प्रदान करण्यासाठी नमाज नियमित अदा करा. ६१) म्हणजे जी व्यक्ती अल्लाहची आज्ञाधारक नाही आणि परलोकावर श्रद्धा नाही त्याच्यासाठी नमाज असे संकट आहे ज्यास तो प्रत्येक वेळी टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्याने स्वेच्छेने व आवडीने अल्लाहला समर्पित केले असेल आणि अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारली आणि ज्याचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर अल्लाहसमोर जाब द्यावा लागेल, अशा व्यक्तीला नमाज अदा करणे नव्हे तर नमाज सोडणे कठीण जाते. ६२) याचा हा अर्थ होत नाही की नेहमीसाठीच तुम्हाला जगातील इतर लोकसमुदायांपेक्षा श्रेष्ठ बनविले होते, तर एक काळ होता जेव्हा जगात तुम्ही एक समुदाय होता ज्याच्याजवळ अल्लाहने दिलेले सत्यज्ञान [next] page २४ कुणाकडून शिफारसही स्वीकारली जाणार नाही व कुणालाही मोबदला घेऊन सोडले जाणार नाही. आणि गुन्हेगारांना कुठूनही मदत मिळू शकणार नाही.’’६३ (४९) ‘‘आठवण करा त्या वेळेची६४ जेव्हा आम्ही तुम्हाला फिरऔनी६५ सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त केले. ज्यांनी तुम्हाला भयंकर यातनेत अडकवून ठेवले होते; तुमच्या मुलांना ठार करीत होते आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवीत होते. (वास्तविक) त्या स्थितीत तुमच्या पालनकर्त्याकडून तुमची परीक्षा पाहिली जात होती.६६ (५०) आठवण करा जेव्हा आम्ही समुद्र दुभंगून तुमच्यासाठी रस्ता बनविला आणि त्यातून तुम्हाला सुखरूप पार केले. नंतर तिथेच तुमच्या डोळ्यांदेखत फिरऔनच्या लोकांना बुडवून टाकले. (५१) आठवण करा, जेव्हा आम्ही मूसा (अ.)
होते आणि तुम्हाला जगाचे नेतृत्व बहाल केले होते. हे याचसाठी होते की तुम्ही लोकांना अल्लाहकडे बोलवावे आणि सर्वांना सत्य मार्गाकडे बोलवावे व चालवावे. ६३) बनीइस्राईलच्या बिघाडाचे एक अतिमहत्वाचे कारण हे होते, की त्यांची परलोकजीवनाची श्रद्धा विकृत झाली होती. ते चुकीच्या समजुतीत होते की आम्ही अत्यंत प्रतिष्ठित पैगंबरांची संतती आहोत आणि मोठमोठे संत, समाजसुधारक व ईशपरायण लोकांशी संबंधित आहोत. म्हणुन आमच्या मुक्तीसाठी हेच पुरेसे आहे. याच खोट्या विश्वासामुळे ते लोक सत्य मार्गापासून गाफील झाले आणि गुन्ह्यांच्या चक्रव्यूहात अडकले. म्हणून त्यांच्यावरील कृपेचे स्मरण करून त्वरित त्यांच्या गैरसमजुतीला दूर केले गेले. ६४) येथून पुढे अनेक प्रभागांपर्यंत (आयत ४९ ते १२३ पर्यंत) बनीइस्राईलच्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख आला आहे, या प्रसिध्द ऐतिहासिक घटनांना या समाजातील प्रत्येकजण जाणून होता. म्हणून तपशील सांगण्याऐवजी एक एक घटनेकडे संक्षिप्तपणे इशारा करण्यात आला आहे. या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करण्यामागे हा उद्देश आहे की एकीकडे हे अल्लाहने केलेले, असंख्य उपकार आणि अनंत कृपा, आणि दुसरीकडे अनेक अशी कुकृत्ये आहेत जे या उपकाराच्या बदल्यात तुम्ही करत आहात. ६५) “आलेफिरऔन’ म्हणजे फिरऔनचे कुटुंब आणि इजिप्तचा शासकवर्ग या दोन्हींचा समावेश होतो. ६६) परीक्षा अशी की तुम्ही त्या भट्टीतून विशुद्ध सोने बनून बाहेर येता किंवा खोटे ठरता आणि परीक्षा या गोष्टीची की इतक्या महानतम संकटातून चमत्कारिकरित्या तुम्हाला सोडवल्यानंतरही तुम्ही अल्लाहचे कृतज्ञ व आज्ञाधारक दास बनून राहता किंवा नाही. [next] page २५ यांना चाळीस रात्रींच्या करारावर बोलविले६७ तेव्हा तुम्ही त्याच्या मागे वासराची पूजा६८ केलीत. तेव्हा तुम्ही घोर अत्याचार केलात. (५२) परंतु तरीही आम्ही तुम्हाला क्षमा केली जेणेकरून तुम्ही कृतज्ञ व्हाल. (५३) आठवण करा (जेव्हा तुम्ही हा अत्याचार करीत होतात तेव्हा) आम्ही मूसाला ग्रंथ व सत्यासत्यतेची कसोटी६९ प्रदान केली होती, जेणेकरून त्याव्दारे तुम्ही सन्मार्ग प्राप्त करू शकाल.(५४) आठवण करा जेव्हा मूसा (अ.) (हा कृपाप्रसाद घेऊन परतला तेव्हा तो) आपल्या लोकांना म्हणाला , ‘‘लोकहो! तुम्ही वासराला उपास्य ठरवून स्वत:वर भयंकर अत्याचार केलात. तेव्हा तुम्ही आपल्या निर्मात्याच्या पुढे पश्चात्ताप व्यक्त करा आणि आपल्या लोकांना मारा७० (ज्यांनी हा घोर अन्याय केला) यातच तुमच्या पालनकर्त्यापाशी तुमचे भले आहे. त्यावेळी तुमच्या निर्मात्याने तुमचा पश्चात्ताप स्वीकारला. तो अत्यंत क्षमावंत
६७) म्हणजे इजिप्तहून बाहेर पडल्यानंतर जेव्हा बनीइस्राईलचे लोक सीना प्रदेशात आले तेव्हा अल्लाहने मूसा (अ.) यांना चाळीस दिवसांसाठी “तूर’ या पर्वतावर बोलावून घेतले होते. जेणेकरून त्या समाजाकरिता जो आता स्वतंत्र होता, अल्लाह त्यांना आचारसंहितेचे कायदे आणि व्यावहारिक जीवनाविषयी मार्गदर्शन देणार होता आणि जीवनपध्दतीविषयीचे काही निर्देश देणार होता (पाहा बायबल, पुस्तक निर्गमन, अध्याय २४ ते ३१) ६८) गाय आणि बैलांना ईश्वर मानून त्यांच्या पूजेची परंपरा बनीइस्राईलच्या शेजारी लोकांत व जवळपासच्या लोकांत पसरलेली होती. इजिप्त व कनान देशात ही प्रथा जोरात प्रचलित होती. आदरणीय पैगंबर यूसुफ (अ.) यांच्यानंतर बनीइस्राईल जेव्हा अध:पतित झाले व कालांतराने किब्ती समुदायाचे गुलाम बनले होते, तेव्हा त्यांनी इतर विकृतीसह आपल्या शासकवर्गाची ही कुप्रथा स्वीकारली होती (वासरू पूजनाचा हा वृत्तान्त पाहा बायबल, निर्गमन प्रकरण ३२) ६९) “फुरकान’ म्हणजे कसोटी ज्याद्वारे सत्य व असत्य या दोहोंत फरक स्पष्ट केला जातो. म्हणजे धर्माचे ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य सत्य व असत्य जाणून घेतो. ७०) म्हणजे आपल्या त्या माणसांना ठार करा. ज्यानी वासराला पूज्य बनवून त्याची पूजा केली. [next] page २६ आणि दयावंत आहे. (५५) आठवण करा जेव्हा तुम्ही मूसाला सांगितले होते की, आम्ही तुमच्या सांगण्यावर कदापि विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत आमच्या डोळ्यांनी उघडपणे अल्लाहला (तुझ्याशी बोलताना) पाहात नाही. त्यावेळी एका कडकडाटाने तुम्हाला गाठले आणि (५६) तुम्ही अचेत होऊन कोसळलात. परंतु आम्ही तुम्हाला पुन्हा सचेत उभे केले जेणेकरून या उपकारानंतर तरी तुम्ही कृतज्ञ राहाल.७१(५७) आम्ही तुमच्यावर ढगांची सावली केली.७२ ‘मन्न’ आणि ‘सल्वा’चे अन्न तुम्हाला उपलब्ध करून दिले.७३ तेव्हा तुमच्यासाठी ज्या पवित्र वस्तू तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्याचा उपभोग घ्या. (परंतु तुमच्या पूर्वजांनी) जे काही केले तो त्यांनी आमच्यावर केलेला अत्याचार नसून त्यांनी स्वतःच त्यांच्यावर अत्याचार केला होता.
७१) हा संकेत ज्या घटनेकडे केला आहे त्याचा खुलासा असा आहे की, चाळीस दिवसांसाठी आदरणीय पैगंबर मूसा (अ.) तूर पर्वऱ्या वर गेले होते तेव्हा त्यांना आदेश देण्यात आला होता की बनीइस्राईलचे सत्तर प्रतिनिधीसुद्धा बरोबर घेऊन यावे. अल्लाहने जेव्हा मूसा (अ.) यांना ग्रंथ आणि कसोटी दिली तेव्हा त्यांनी तिला त्या प्रतिनिधींसमोर ठेवले. या घटनेसंदर्भात कुरआनचे स्पष्टीकरण आहे की त्यांच्यातील काही खोडसाळ लोक म्हणाले की, केवळ तुमच्या म्हणण्यास्तव आम्ही कसे मान्य करावे की अल्लाहने तुमच्याशी संवाद केला. यावर अल्लाहचा कोप झाला आणि त्यांना शिक्षा दिली गेली. परंतु बायबलचे म्हणणे आहे, “”त्यांनी इस्राईलच्या देवाला पाहिले. त्याच्या पायाखाली निलम दगडांचा चबुतरा होता जो आकाशासारखा प्रखर होता. त्याने बनीइस्राईलच्या स‚ानांवर आपला हात ठेवला नाही. त्यांनी देवाला पाहिले आणि खाल्ले व प्याले.” (निर्गमन, प्रकरण २४, श्लोक नं. १०-११) मात्र विपर्यास असा आहे की याच ग्रंथात पुढे म्हटले आहे, जेव्हा पैगंबर मूसा (अ.) यांनी म्हटले, “”हे देवा, मला तुझे दर्शन दे.” त्यावर देवाने सांगितले, “”तू मला पाहू शकत नाही,” (निर्गमन, प्रकरण ३३, श्लोक १८-२३) ७२) म्हणजे सीना प्रदेशात उन्हापासून बचाव करण्यासाठी काहीएक आश्रय तुमच्यासाठी नव्हता. तेव्हा आम्ही ढगांचे आच्छादन करून तुमचा बचाव केला होता. या ठिकाणी हे लक्षात असावे की बनीइस्राईल लोक लाखोंच्या संख्येने इजिप्तहून बाहेर पडले होते आणि सीना प्रदेशात राहण्यासाठी घरे तर सोडाच त्यांच्याकडे तंबूसुद्धा नव्हते. त्यावेळी जर अल्लाहने दीर्घकाळ आकाशात ढगांचे आच्छादन केले नसते तर ते सर्व लोक तळपत्या उन्हामुळे नष्ट झाले असते. ७३) “मन्न व सलवा’ एक नैसर्गिक खाद्य होते जे सतत चाळीस वर्ष स्थलांतरित काळात त्या लोकांना मिळत होते. मन्न हे धण्याच्या बीसारखी वस्तू होती, जी दवबिंदूप्रमाणे वरून जमिनीवर पडून जमा [next] page २७ (५८) आठवण करा जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले होते की, जी वस्ती७४ तुमच्यासमोर आहे त्यामध्ये दाखल व्हा. तिथे जे उत्पन्न होते त्याचा मनसोक्त उपभोग घ्या परंतु वसाहतीच्या दरवाजातून नतमस्तक होऊन प्रवेश करा आणि ‘हित्ततून’ ‘हित्ततून’७५ म्हणत जा. आम्ही तुमच्या अपराधांना दुर्लक्षित करू आणि सदाचाऱ्यांना खूप कृपा व दयेने उपकृत करू. (५९) परंतु जी गोष्ट त्यांना सांगितली होती तिला अत्याचाऱ्यांनी बदलून वेगळीच बनविली. सरतेशेवटी अत्याचार करणाऱ्यांविरूद्ध आम्ही आकाशातून प्रकोपाचा वर्षाव केला. ही शिक्षा होती त्या अवज्ञाकारांसाठी जी ते करीत होते. (६०) आठवण करा जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रार्थना केली तेव्हा आम्ही सांगितले,
व्हायची आणि सलवा बटेरसारखे लहानलहान पक्षी होते. अल्लाहच्या कृपेने हे विपुल प्रमाणात उपलब्ध होते म्हणून ते एका पूर्ण राष्ट्राचे (बनीइस्राईल) जीवन खाद्य होते. यामुळे कधीच उपासमारीची त्यांच्यावर वेळ आली नाही. आज एखाद्या राष्ट्रात अचानक काही लाख शरणार्थ लोक आले तर त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न बिकट बनतो. (निर्गमन, प्रकरण १६ : १-३६ पाहा गिनती ११:७-९ व ३१-३२) ७४) अद्याप शोध लागला नाही की या वस्तीने अभिप्रेत कोणती वस्ती आहे. ज्या संदर्भात हे स्पष्टीकरण आलेले आहे त्यावरून असे कळते की तो काळ बनीइस्राईलच्या सीना प्रदेशात वास्तवाचाच काळ होता. बहुदा हे त्याच सीना प्रदेशातील एखादे शहर असावे. ही पण शक्यता आहे की याने अभिप्रेत “शत्तीम’ शहर असावे, जे यरोहोसमोर जॉर्डन नदीच्या पूर्वेला समुद्रकिनारी वसलेले होते. बायबलचे वर्णन आहे की बनीइस्राईलच्या लोकांनी पैगंबर मूसा (अ.) यांच्या जीवनाच्या शेवटी या शहराला जिंकून ताबा मिळविला होता. त्यांनी तिथे अतोनात दुराचार केला म्हणून अल्लाहचा त्यांच्यावर कोप (महामारी) कोसळला त्यात चोवीस हजार लोक ठार झाले होते. (गिनती-२५, श्लोक १-८) ७५) म्हणजे आदेश होता की अन्यायी व अत्याचारी विजेत्यासारखे उद्दामपणे दाखल न होता, ईशभीरू दासांसारखे नम्रतापूर्वक दाखल व्हा जसे पैगंबर मुहम्मद (स.) मक्का विजयानंतर मक्का शहरात दाखल झाले होते. “हित्ततून’ या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे आपल्या अपराधांची क्षमायाचना अल्लाहजवळ करीत करीत जा. दुसरा म्हणजे लुटमार व मानव संहार न करता शहरातील लोकांना सार्वजनिक माफी देऊन प्रवेश करावा. [next] page २८ ‘‘अमुक खडकावर आपली काठी मारा’’ त्यामुळे बारा स्रोत७६ उसळून आले. आणि प्रत्येक टोळीने ओळखले की कोणता पाणवठा आपल्यासाठी आहे. (त्यावेळी हे मार्गदर्शन केले होते की) अल्लाहने दिलेल्या उपजीविकेचा उपभोग घ्या आणि पृथ्वीवर अनाचार माजवत फिरू नका. (६१) आठवण करा, जेव्हा तुम्ही सांगितले होते की, ‘‘हे मूसा! आम्ही एकाच प्रकारच्या अन्नाचा उपभोग घेऊन संयम करू शकत नाही. आपल्या पालनकर्त्याकडे याचना करा की आमच्यासाठी जमिनीमधून पिके, भाजीपाला, गहू, लसूण, कांदा, डाळी वगैरे उत्पन्न करावे.’’ तेव्हा मूसा (अ.) ने सांगितले, ‘‘एक उत्तम प्रकारच्या वस्तूऐवजी तुम्ही कनिष्ठ दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता?’’७७ ठीक, कोणत्यातरी शहरी वस्तीमध्ये जाऊन राहा, जे काही तुम्ही मागता ते तिथे मिळेल.’’ सरतेशेवटी इतकी पाळी आली की त्यांच्यावर अपमान, अधोगती व दुर्दशा ओढवली. आणि
७६) (हा पर्वत अद्याप सीना द्वीपावर आहे. पर्यटक त्याला पहावयास जातात. त्यात झऱ्यांच्या निशाण्या आहेत. ) बारा (१२) झऱ्यांच्या प्रयोजनामागे हेतू हा होता की बनीइस्राईलच्या बाराच (१२) टोळ्या होत्या. अल्लाहने प्रत्येक कबिल्यासाठी एक स्वतंत्र झरा निर्माण केला जेणेकरून त्यांच्या दरम्यान पाण्यावरून भांडणतंटा होऊ नये. ७७) हा अर्थ नाही की मन्न आणि सलवा जे सहजासहजी मिळत आहे त्यास सोडून ते मागत आहात ज्यांच्यासाठी शेतीवाडी करावी लागते. अर्थ हा आहे की ज्या महान उद्देशासाठी तुम्हाला वाळवंटात भटकंती करविली जात आहे ते सोडून तुम्ही लालसेत पडून या महान उद्देशाला विसरून जात आहात? आणि काय या क्षुल्लक गोष्टींचा तात्पुरता त्याग त्या महान उद्देशासाठी तुम्ही सहन करू शकत नाही? (पाहा गिनती, अध्याय ११, श्लोक ४-९) [next] page २९ ते अल्लाहच्या कोपाने वेढले गेले. हा परिणाम यामुळेच झाला की, अल्लाहच्या आयतींशी ते द्रोह करू लागले७८ आणि पैगंबरांची नाहक हत्या करू७९ लागले. हे यामुळेच घडले की त्यांनी अवज्ञा केली आणि शरिअत कायद्याचे वारंवार उल्लंघन केले. (६२) नि:संशय जे मुहम्मद (स.) यांच्यावर श्रद्धा ठेवणारे असोत. तसेच यहुदी, इसाई किंवा साबिईन असोत जे जे कोणी अल्लाह व मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवतील आणि सत्कर्मे करतील त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे. त्यांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील.८०
७८) आयतींचा इन्कार करण्याचे अनेक रूपे आहेत. उदा. अल्लाहच्या अवतरित शिकवणींपैकी ज्या आपल्या इच्छेविरुद्ध आहेत त्यांचा स्पष्ट इन्कार केला. दुसरे म्हणजे एका गोष्टीला हे जाणूनसुद्धा की ती अल्लाहने सांगितली आहे, पूर्ण धिटाईने व बंडखोरीने त्याविरुद्ध केले आणि अल्लाहच्या आदेशाची काही एक पर्वा केली नाही. तिसरा प्रकार म्हणजे अल्लाहच्या अवतरित शिकवणींना चांगल्या प्रकारे जाणून व उमजून घेऊनसुद्धा आपल्या इच्छेनुसार त्यात फेरबदल केला. ७९) बनीइस्राईलनी आपल्या या अपराधाला आपल्या इतिहासात स्वत: तपशीलवार नमूद केले आहे. (पाहा, जकरिया पैगंबराला हैकल सुलैमानी मध्ये दगडांनी ठेचून मारण्याचा प्रसंग, (२ इतिहास-२४ : २१) यरमिहा पैगंबराला कैद करून दोरखंडाने बांधून मारझोड करून व बंदिस्त करून गाळाने भरलेल्या विहिरीत लटकवून ठेवण्याचा प्रसंग. (पाहा यरमिहा प्रकरण १५, १०, १८, २०-२३, २०: १ ते १८, प्रकरण ३६ ते ४०) पैगंबर यहया (योहना) यांच्या पवित्र शिराला तत्कालिन बादशाहाच्या प्रेयसीच्या इच्छेखातर धडा वेगळा करून तिच्यापुढे नजराणा देण्याची घटना (मरकुस ६ : १७-२९) स्पष्ट आहे की, ज्या लोकांनी आपले नेतृत्व नालायक व दुराचारींच्या सुपूर्द केले व याउलट सुधारक व पुण्यवान लोकांना कैदेत टाकले आणि फासावर लटकवले, अशा लोकांना अल्लाहने आपल्या धिक्कारासाठी निवडले नसते तर शेवटी काय केले असते? ८०) हे वृत्तान्त समोर ठेवल्यावर ही गोष्ट स्पष्ट होते की येथे इमान आणि सदाचाराचा तपशील देणे हा उद्देश नाही. कोणकोणत्या गोष्टी माणसाने कराव्यात आणि कोणते आचरण करावे जेणेकरून अल्लाहजवळ त्याला मोबदला मिळेल, हे पुढे तपशीलाने स्पष्ट केले जाईल. येथे यहुदींच्या असण्याप्रती असलेल्या दुराग्रहाचे खंडन अभिप्रेत आहे की ते फक्त यहुद्यांनाच मुक्तीस पात्र समजत होते. या भ्रमात ते होते की त्यांच्याशी अल्लाहचे खास संबंध आहेत जे इतरांशी नाहीत. परिणामी जो त्यांच्या समूहाशी संबधित आहे, त्याची श्रद्धा आणि आचरण भल कसेही असोत, त्याला मुक्ती मिळणारच आणि इतर सर्व लोक जे त्यांच्या समुदायाव्यतिरिक्त आहेत, ते केवळ नरकाग्नीसाठीच निर्मिले आहेत. या भ्रमाला दूर [next] page ३० (६३) आठवा तो प्रसंग, जेव्हा आम्ही तूर पर्वताला तुमच्यावर अधांतरी उचलून धरले व तुमच्याकडून पक्के वचन घेतले आणि सांगितले,८१ ‘‘जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्यानुसार आचरण करण्याच्या दृढ निश्चयाने त्याचा स्वीकार करा आणि जे आदेश त्यामध्ये दिले आहेत त्याचे स्मरण ठेवा. जेणेकरून तुम्ही धर्मपरायणतेच्या मार्गावर चालू शकाल’’. (६४) परंतु त्यानंतर तुम्ही आपल्या वचनाकडे पाठ फिरवली तरीदेखील अल्लाहचा अनुग्रह आणि त्याच्या दयेने तुमची साथ सोडली नाही अन्यथा तुम्ही केव्हाच उद्ध्वस्त झाला असतात. (६५) तसेच तुम्हाला आपल्या जमातीपैकी त्या लोकांची गोष्ट तर माहितच आहे ज्यांनी सब्तच्या८२ नियमाचा भंग केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले,‘‘माकडे व्हा आणि अशा अवस्थेमध्ये राहा की सर्व बाजूंनी तुमचा धिक्कार होवो.’’८३ (६६) अशा तNहेने आम्ही त्यांच्या झालेल्या परिणामांना तत्कालीन लोकांसाठी आणि नंतर
करण्यासाठी सांगितले गेले की अल्लाहजवळ तुमच्या जात व वंशाला महत्व नाही. तेथे तर महत्व ईमान आणि सदाचारालाच आहे. जो कोणी या गोष्टी घेऊन हजर होईल तो अल्लाहकडून आपला मोबदला प्राप्त करील. अल्लाहजवळ न्यायनिवाडा माणसाच्या गुणानुसार होईल, तुमच्या जनगणनेच्या नोंदीनुसार नव्हे. ८१) या घटनेला कुरआनमध्ये निरनिराळ्या ठिकाणी ज्याप्रकारे स्पष्ट केले गेले आहे त्यावरून कळून येते की त्याकाळी बनीइस्राईल लोकांमध्ये ही घटना प्रसिद्ध होती. आता त्याचा खुलासा व तपशील माहीत करून घेणे अशक्यप्राय आहे. संक्षिप्तपणे असे समजावे की डोंगराच्या कुशीत वचन घेताना भयावह स्थिती निर्माण केली गेली होती जेणेकरून त्यांना वाटावे की डोंगर त्यांच्यावर येऊन कोसळेल. असाच प्रसंग सूरह आअराफ आयत नं. १७१ मध्ये आला आहे. (पाहा सूरह ७ (आअराफ), टीप १३२) ८२) सब्त म्हणजे शनिवारचा दिवस. बनीइस्राईलसाठी हे विधीवत केले होते की त्यांनी शनिवारचा दिवस विश्रांती आणि उपासनेसाठी राखीव ठेवावा. त्या दिवशी कोणत्याही प्रकारचे ऐहिक काम अगदी खाणे व स्वयंपाक स्वत:ही बनवू नये आणि नोकरांकडूनही करून घेऊ नये. याविषयी सक्त ताकीद होती की जो कोणी या दिवसाचे पावित्र्य भंग करील, तो मृत्यूदंडास पात्र ठरेल. (निरगमन, प्रकरण ३१, श्लोक १२-१७) मात्र जेव्हा बनीइस्राईलच्या नैतिक व धार्मिक अध:पतनाचा काळ आला तेव्हा ते राजरोस शनिवारचे पावित्र्य भंग करू लागले येथपावेतो की शहरामध्ये त्या पवित्र दिवशी (सब्त) खुलेआम व्यापार होऊ लागला. ८३) या घटनेचा तपशील पुढे सूरह आअराफ मध्ये (७:१६३-१६४)आलेला आहे. त्यांना माकड बनविण्याच्या घटनेबद्दल विवाद आहे. काहींचे म्हणणे आहे की त्यांचे शरीर बिघडवून [next] page ३१ येणाऱ्या पिढ्यांसाठी बोध आणि शिकवण बनवून ठेवली. (६७) नंतर तो प्रसंगही आठवा जेव्हा मूसाने आपल्या लोकांना सांगितले की अल्लाह तुम्हाला एका गाई जुब्ह (कापणे) करण्याचा आदेश देत आहे. तेव्हा ते म्हणू लागले, ‘‘तुम्ही आमची थट्टा करता काय? तेव्हा मूसा म्हणाला की असे अज्ञानी कृत्य करण्यापासून (परावृत्त राहण्यासाठी) मी अल्लाहकडे शरण मागतो. (६८) तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे. आपल्या पालनकर्त्याकडे प्रार्थना करा की त्याने गाईविषयी सविस्तर सांगावे. मूसाने म्हटले, ‘‘अल्लाहचा आदेश आहे की, गाय न वृद्ध असावी न अतिलहान किंबहुना मध्यम वयाची हवी. आता ईशआज्ञेचे अनुपालन करा.’’ (६९) म्हणू लागले ‘‘अल्लाहला पुन्हा विचारा, तिचा रंग कसा असावा?’’ मूसा (अ.) ने सांगितले, ‘‘अल्लाहची इच्छा आहे, पिवळ्या जर्द रंगाची गाय हवी की पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न व्हावे.’’ (७०) पुन्हा म्हणू लागले, ‘‘अल्लाहला स्पष्ट विचारून सांगा की, गाय कशी असावी? आम्ही तिच्यासंबंधी संभ्रमात आहोत. अल्लाहने इच्छिले तर आम्ही ती शोधून काढू’’. (७१) मूसाने उत्तर दिले, ‘‘अल्लाह फर्मावितो की ती गाय अशी असावी जी राबविण्यांत आलेली नसेल किंवा जमीनही नांगरत नसेल अथवा पाणीही उपसत नसेल, धष्टपुष्ट परंतु डाग नसलेली असावी.
करण्यात आले होते तर काही जण म्हणतात की त्यांच्यामध्ये माकडांचे गुण निर्माण झाले होते. परंतु कुरआनातील शब्द आणि वर्णनशैलीने हेच स्पष्ट होत आहे की हा बदल मानसिक नव्हता तर शारीरिक होता. मलासुद्धा असेच वाटते की त्यांची बुद्धी पूर्ववतच ठेवली गेली मात्र शरीर बिघडवून माकडाप्रमाणे केले गेले. [next] page ३२ त्यावर ते म्हणाले, ‘‘होय, आता तुम्ही ठीक ठीक सांगितलेत. त्यानंतर त्यांनी तिला जुब्ह (कापले) केले. एरव्ही ते असे करतील असे वाटले नव्हते.८४ (७२) तुम्हाला आठवतो तो प्रसंग जेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे प्राण घेतले होते. मग तिच्यासंबंधी भांडू लागला होतात व एकमेकांवर खुनाचा आरोप ठेवू लागला होतात, आणि अल्लाहने निर्णय घेतला होता की जे काही तुम्ही लपवीत आहांत तो ते उघडकीस आणील. (७३) त्यावेळेस आम्ही आज्ञा केली की खून झालेल्या व्यक्तीच्या शवाला तिच्या एका भागाने आघात करा. पाहा, अशाप्रकारे अल्लाह मृतांना पुन्हा जिवंत करतो आणि तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवितो जेणेकरून तुम्ही समजावे.८५ (७४) परंतु अशा निशाण्या पाहूनदेखील शेवटी तुमची हृदये कठोर झाली, अगदी दगडाप्रमाणे कठोर. किंबहुना कठोरतेमध्ये त्यापेक्षाही अधिक. कारण दगडांमध्ये एखादा असा असतो ज्याला
८४) बनीइस्राईलींना इजिप्तवासी आणि आजूबाजूच्या लोकांमुळे गाईला पूजनीय व पवित्र समजून गाई पूजनाची लागण झाली होती आणि याकारणास्तव त्यांनी इजिप्तहून बाहेर पडल्यावर लगेच एका वासराला पूज्य बनविले. म्हणून त्यांना आदेश दिला गेला की गाईला जुबाह करावे. ही अत्यंत कठोर परीक्षा होती. त्यांच्या मनात पूर्णपणे ईमान परिपूर्ण नव्हते. म्हणून त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला आणि गाईसंबंधी तपशील विचारू लागले. परंतु जितका तपशील व खुलासा ते विचारत गेले तितकेच ते अडकत गेले. सरतेशेवटी त्याच विशिष्ट सोनेरी गायीकडे जिची त्याकाळी पूजा होत होती, निर्देश केला गेला की ही गाय जुबह करा. बायबलमध्येसुद्धा या घटनेचा उल्लेख आला आहे. परंतु तिथे बनीइस्राईल लोकांनी टाळण्याचा जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख आला नाही. (पाहा गिणती, प्रकरण १९, श्लोक १ – १०) ८५) या ठिकाणी हे स्पष्ट होते की ठार केलेल्या व्यक्तीला एवढ्या वेळेपुरते पुन्हा जिवंत केले गेले की त्याने खुन करणाऱ्याचे नाव सांगावे. मात्र यासाठी जी युक्ती केली गेली अर्थात प्रेताच्या शरीराला तिच्या एका भागाने जरब लावावी, हे शब्द काहीसे अस्पष्ट वाटतात. तरीसुद्धा याचा निकटचा अर्थ तोच आहे जो अनेक भाष्यकारांनी सांगितला आहे. म्हणजे वर उल्लेखित ज्या गाईला जुबह करण्याचा आदेश दिला गेला तिच्या मांसाच्या तुकड्याने ठार केलेल्या व्यक्तीच्या प्रेतावर आघात करावा. अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारले गेले. एक अल्लाहच्या सामर्थ्याची निशाणी त्यांना दाखविली गेली. दुसरे, असे की गाईचे श्रेष्ठत्व, पावित्र्य व तिच्या पूज्य असण्यावरही कठोर आघात करण्यात आला. या तथाकथित उपास्याजवळ थोडेदेखील सामर्थ्य असते तर तिला जुबह केल्यामुळे एक मोठे संकट कोसळले असते. उलट तिला जुबह करून खुन्याचा शोध लागला, हे फायद्याचेच ठरले. [next] page ३३ पाझर पुâटतो. आणि पुâटून त्यामधून पाणी बाहेर पडते. व अल्लाहच्या भयाने तो खालीही कोसळतो. अल्लाह तुमच्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही. (७५) हे मुस्लिमांनो! काय तुम्ही या लोकांकडून अशी अपेक्षा करता की हे तुमच्या आवाहनावर ईमान धारण करतील?८६ वास्तविक यांच्यापैकी एका गटाची प्रवृत्ती अशी आहे की अल्लाहची वाणी त्यांनी ऐकली आणि त्यानंतर चांगल्याप्रकारे समजून उमजूनदेखील हेतुपुरस्सर तिला विकृत केले.८७ (७६) (अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर) ईमान धारण करणाऱ्यांना जेव्हा हे भेटतात तेव्हा म्हणतात,‘‘आम्हीदेखील ईमानधारक आहोत.’’ परंतु जेव्हा
८६) हे संबोधन मदीनेतील त्या नवमुस्लिमांशी आहे ज्यांनी नुकताच इस्लामचा स्वीकार केला होता. त्यांना पैगंबर, ईशदूत, परलोक, धर्मशास्त्र व ग्रंथविषयी अगोदरच शेजारील यहुद्यांकडून माहिती प्राप्त झाली होती. हेसुद्धा त्यांनी यहुद्यांकडूनच ऐकले होते की जगात आणखी एक पैगंबर येणार आहे. जे लोक त्याला साथ देतील ते संपूर्ण जगावर अधिपत्य गाजवतील. याच आधारवर त्यांना (नवमुस्लिमांना) आशा होती की जे पूर्वपासून ईशग्रंथ व पैगंबरांचे अनुयायी आहेत (म्हणजे यहुदी) आणि ज्यांच्या माहितीवरच आम्ही मुस्लिम बनलो आहोत, ते जरूर आम्हाला साथ देतील. नव्हे ते पुढाकार घेतील व पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायित्व स्वीकारतील. याच अपेक्षा घेऊन हे जोशीले नवमुस्लिम आपल्या यहुदी मित्र आणि शेजाऱ्यांकडे जात असत आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन करत असत. मात्र जेव्हा ते या आवाहनाला नाकारत असत तेव्हा दांभिक आणि इस्लामचे विरोधक त्या आधारे हा दावा करीत की प्रकरण काही संदिग्धच आहे. जर हे खरेच पैगंबर असते तर जाणकार यहुद्यांनी त्यांना का स्वीकारले नाही आणि निष्कारण आपले पारलौकिक जीवन धोक्यात का आणले? या आधारे बनीईस्राइलींच्या इतिहासाचे वर्णन केल्यानंतर या साध्याभोळ्या मुस्लिमांना सांगितले जात आहे की ज्यांचा इतिहास असा काही आहे, त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगू नये. जेव्हा हे पाषाणöदयी लोक तुमच्या आवाहनाला नाकारतील तेव्हा तुमची मने दुखावतील. हे लोक तर शतकांपासून बिघडलेले आहेत. अल्लाहच्या ज्या आयतींना ऐकूण तुमचा थरकाप होतो, त्याच आयतींची टिंगलटवाळी करताना यांच्या पिढ्या गेल्या. सत्य धर्माला विकृत करून यांनी आपल्या वासनानुरूप बनविले आहे आणि याच विकृत धर्माकडून ते मुक्तीची आशा लागून आहेत, यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे की, सत्य आवाहन कानावर पडताच त्याच्या समर्थनार्थ हे चोहोकडून धावत येतील. ८७) एका गटाने अभिप्रेत त्यांच्यातील धर्मपंडित व धर्माधिकारी आहेत. ते विज्ञानी आणि धर्ममार्तंड लोक आहेत. अल्लाहची वाणी म्हणजे तौरात ग्रंथ, जबुर आणि इतर ईशग्रंथ आहेत जे त्या लोकांना त्यांच्या पैगंबरांकरवी प्राप्त झाले होते. “तहरीफ’ म्हणजे विकृत करणे. मूळ गोष्टीला आपल्या फायद्यासाठी बदलून टाकणे व अर्थाचा अनर्थ करणे. बनीइस्राईली धर्मपंडितांनी ईशग्रंथाला विकृत [next] page ३४ आपसांत एकमेकांशी एकांतात बोलतात तेव्हा म्हणतात, ‘‘काय मूर्ख झालांत?’’ या लोकांना त्या गोष्टी सांगता ज्या अल्लाहने तुम्हांवर उघड केल्या आहेत की ज्यामुळे त्यांनी तुमच्या पालनकर्त्याजवळ तुमच्या विरोधात त्या प्रमाणस्वरुप सादर कराव्यात?८८ (७७) काय हे जाणत नाहीत की जे काही ते लपवितात आणि जे काही ते प्रकट करतात ते सर्वकाही अल्लाह जाणतो आहे? (७८) यांच्यामध्ये दुसरा एक गट निरक्षरांचा आहे. ज्यांना धर्मग्रंथाचे ज्ञान तर नाहीच, फक्त आपल्या निराधार इच्छा-आकांक्षांना ते कवटाळून बसले आहेत आणि केवळ भ्रामक कल्पनेंत भरकटत चालले आहेत.८९ (७९) तेव्हा त्या लोकांचा विनाश व विध्वंस आहे जे आपल्या हातांनी ग्रंथ लिहितात आणि लोकांना सांगतात,‘‘हा अल्लाहकडून आलेला आहे.’’ जेणेकरून त्याच्या मोबदल्यात काही लाभ करून घ्यावा.९०
केले आहे. मूळ गोष्टीला आपल्या फायद्यासाठी आणि इच्छेनुसार बदलून टाकणे आणि त्याला विरोधी रंग चढविणे. अर्थाचा अनर्थ करणे आहे शब्दांमध्ये फेरबदल करणेसद्धा विकृती आहे. बनीइस्राईलच्या धर्मपंडितांनी ईशग्रंथामध्ये या दोन्ही प्रकारच्या विकृती केल्या आहेत. ८८) म्हणजे ते एक दुसऱ्याशी सांगत असत की तौरात आणि इतर ईशग्रंथात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी ज्या भविष्यवाणी आल्या आहेत, अथवा अशा शिकवणी आमच्या पवित्र धर्मग्रंथात आहेत ज्यांच्याद्वारा आमच्या आचरणाची पकड होऊ शकते त्यांना मुस्लिमांसमोर वर्णन करू नका. अन्यथा हे लोक तुमच्या रबसमोर तुमच्याच विरुद्ध प्रमाण बनवून सादर करतील. अशी अल्लाहविषयी या जालिमांच्या श्रद्धेच्या विकृतीची ही दशा होती. जणूकाही ते समजत असत की जर जगात त्यांनी आपल्या विकृतीवर आणि सत्यावर टाकलेल्या पडद्याला लपविले तर परलोकजीवनात त्यांच्यावर कारवायी होणार नाही. याचकरता नंतर आलेल्या वाक्यात त्यांना सचेत केले गेले की काय तुम्ही अल्लाहला अनभिज्ञ समजता? ८९) येथे त्यांच्या प्रजेची स्थिती सांगितली गेली. ते ग्रंथाच्या ज्ञानापासून निव्वळ कोरे होते. त्यांना काहीच माहीत नव्हते की अल्लाहने आपल्या ग्रंथात कोणती शिकवण व आदेश दिले आहेत. मनुष्याचे जीवनसाफल्य कशात दडलेले आहे आणि कशामुळे त्याचा विनाश होतो. या ज्ञानाविना ते आपल्या मनाप्रमाणे व मनोकामनांच्या मागे लागून बनावटी गोष्टींना जीवन धर्म समजून बसले होते आणि खोट्या आशेवर जगत होते. ९०) हा त्यांच्या धर्मपंडितांविषयीचा उल्लेख आहे. या लोकांनी केवळ एवढेच केले नाही की ईशग्रंथाच्या अर्थाला आपल्या इच्छेनुसार विकृत केले, तर हेसुद्धा केले की बायबलमध्ये आपल्या भाष्यांना, [next] page ३५ त्यांच्या हातांनी हे लिहिलेलेदेखील त्यांच्यासाठी विध्वंसाची सामुग्री आहे आणि त्यांची ही कमाईदेखील त्यांच्यासाठी विनाशकारक आहे. (८०) ते म्हणतात की नरकाग्नी आम्हाला कदापि स्पर्ष करू शकणार नाही, फक्त काही थोड्या दिवसांची शिक्षा कदाचित झाली तर होईल.९१ त्यांना विचारा, ‘‘काय तुम्ही अल्लाहकडून एखादे वचन घेतले आहे जे तो भंग करू शकणार नाही? किंवा अल्लाहच्या नावावर अशा गोष्टी बोलता ज्याविषयी तुम्हाला ज्ञान नाही?’’ काय त्यांची जबाबदारी अल्लाहने घेतली आहे? तुम्हाला नरकाग्नि का शिवणार नाही. (८१) जो कोणी वाईट (कर्मे) कमवील आणि अपराधाच्या दुष्चक्रांत अडकून पडेल तो नरकवासी असेल आणि नरकामध्येच सदैव खितपत पडेल. (८२) परंतु जे ईमान धारण करतील व सदाचार करतील तेच स्वर्गात वास करणारे असतील आणि ते सदैव स्वर्गात राहतील.
आपल्या जातीच्या इतिहासाला, आपल्या अंधश्रद्धा आणि अटकळींना, आपल्या कल्पित तत्वज्ञानाला तसेच आपल्या तर्कानुसार घडलेल्या नियमांना ईशग्रंथाबरोबर सरमिसळ केले. या सर्व गोष्टी लोकांसमोर अशा प्रकारे मांडल्या की त्या अल्लाहतर्फे आलेल्या आहेत. प्रत्येक ऐतिहासिक कथानक, प्रत्येक भाष्यकाराचे भाष्य, प्रत्येक तत्वज्ञाची दैवीश्रद्धा, प्रत्येक धर्मशास्त्रीची शास्त्रगत धारणा, ज्यांना बायबलमध्ये स्थान मिळाले, ते सर्व ईशवाणी म्हणून प्रसिद्ध पावले. त्यावर श्रद्धा ठेवणे अनिवार्य झाले आणि त्याला नाकारणे धर्माला नाकारण्यासारखे बनले. ९१) हे यहुद्यांच्या आम गैरसमजुतीचे वर्णन आहे ज्यात त्यांचे सामान्यजन व धर्मपंडित सर्वच अडकलेले होते. ते समजत होते की आम्ही भले कसेही वागलो तरी केवळ यहुदी असल्याने नरकाग्नि आमच्यावर निषिद्ध आहे. यदाकदाचित आम्हाला शिक्षा झालीच तरी मोजक्या दिवसांसाठीच आम्हाला ती भोगावी लागेल आणि नंतर आम्ही स्वर्गात जाणारच! [next] page ३६ (८३) आठवण करा, इस्राईलच्या संततीकडून आम्ही दृढ वचन घेतले होते की अल्लाहशिवाय अन्य कुणाचीही भक्ती (बंदगी) करू नका. मातापित्याशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा. लोकांशी चांगले बोला. नमाजचे पालन करा आणि जकात द्या. परंतु थोडे लोक वगळता तुम्ही सर्वांनी या वचनाकडे पाठ फिरवलीत. आणि अजूनही पाठ फिरवीत आहात.(८४) तसेच आठवण करा, आम्ही तुमच्याकडून दृढ वचन घेतले होते की आपसांत एकमेकांचे रक्त सांडू नका. एकमेकांना आपल्या घरापासून बेघर करू नका. तुम्ही ते मान्यही केले होते आणि स्वत: त्याचे साक्षीही आहात. (८५) परंतु आज तुम्ही तेच आहात जे आपल्या बांधवांची हत्या करता. आपल्या बांधवांपैकी काही लोकांना देशाबाहेर काढीत आहात. अत्याचार आणि अतिरेक करून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान करता. आणि जेव्हा ते युद्धबंदी होऊन तुमच्यापुढे येतात तेव्हा त्याना बंधमुक्त करण्यासाठी आर्थिक दंड घेता. वास्तविक त्यांना घराबाहेर काढणेच तुमच्यासाठी निषिद्ध होते. तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर श्रद्धा ठेवता आणि दुसऱ्या भागाला नाकारता?९२ तुमच्यापैकी
९२) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्व मदीना शहराच्या आजूबाजूच्या यहुदी लोकांनी आपल्या शेजारी अरब टोळ्यांशी (औस व खजरज) मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. जेव्हा एक अरब टोळी दुसऱ्या अरब टोळीशी युद्ध करत तर यहुदी लोक आपापल्या मित्रांना साथ देत असत आणि एक दुसऱ्यांशी युद्ध [next] page ३७ जे लोक असे करतील त्यांच्यासाठी याशिवाय अन्य कोणती शिक्षा असेल की या जगातील जीवनामध्ये अपमानित व धिक्कारीत होतील. आणि निवाड्याच्या दिवशी कठोरत्तम शिक्षेच्या दिशेने नेण्यात येईल. अल्लाह त्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही ज्या तुम्ही करीत आहात. (८६) हे तेच लोक आहेत ज्यांनी मरणोत्तर जीवनाचा सौदा करून हे नश्वर जीवन खरेदी केले आहे. न याची शिक्षा कमी होईल न यांना कोणती मदत लाभेल.(८७) आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ दिला त्यानंतर सतत पैगंबर पाठविले. शेवटी मरयमपुत्र इसाला स्पष्ट संकेत देऊन पाठविले. आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याला मदत केली.९३ पण तुमची ही कोणती रीत आहे की जेव्हा जेव्हा कुणी पैगंबर तुमच्या इच्छेविरूद्ध कोणती गोष्ट घेऊन तुमच्याकडे
करीत असत. हे कृत्य अल्लाहच्या आदेशाविरुद्ध (ग्रंथाविरुद्ध) होते तरी हे जाणूनसुद्धा ते विरोधी कृत्य करत असत. परंतु लढाईनंतर जेव्हा एका यहुदीला दुसऱ्या यहुदीचे युद्धकैदी सापडत असे तेव्हा ते प्रतिदान देऊन त्यांना परत करीत असत आणि या व्यवहाराला धर्मसंमत ठरविण्यासाठी ईशग्रंथाचा प्रमाण घेतला जात असे. परंतु आपापसात युद्ध न करणारा आदेश पायदळी तुडवित असत. ९३) रूहेपाक (पवित्र आत्मा) म्हणजे दिव्य प्रकटनसुद्धा आहे आणि जिब्रिल (अ.) हे ईशदूतसुद्धा आहेत जे दिव्य प्रकटन घेऊन येत असत. तसेच आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांचा पवित्र आत्मा ज्यास अल्लाहने कुदसी (पवित्र) बनविले होते. रोषण निशाणी (स्पष्ट संकेत) म्हणजे उघडउघड निशाण्या ज्यंना पाहून सत्यप्रिय मनुष्य जाणून घेत असे की इसा (अ.) अल्लाहचे पैगंबर आहेत. [next] page ३८
0 Comments