हजरत अबुबकर, इस्लामचे दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो बिनुल आस हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंतर बैतुलमुकद्दसकडे ते निघाले. तिथे ख्रिस्ती किल्लाबंद होऊन त्यांच्याशी लढत देत राहिले. त्यांचा धीर खचल्यानंतर त्यांनी समेट घडवण्याचा प्रस्ताव सादर केला. अमरो बिनुल आस यांचे सहकारी अबु उबैदा यांना पत्र पाठवून कळविले की बैतुलमुकद्दस जिंकण्यासाठी आपली प्रतिक्षा होत आहे. ह. उमर (र.) यांनी आपल्या इतर सहकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ह. उस्मान यांनी म्हटले की ख्रिस्ती लोकांचे मनोबल खचले आहे. जर आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी करार केला नाही तर ते आणखीनच खचून जातील आणि मुस्लिम लोक त्यांना मान देत नाहीत. त्यांना तुच्छ समजतात अशी त्यांची धारणा होऊन ते कोणत्याही अटी न घाल ता स्वतःच पराभूत होतील. ह. अली (र.) यांनी त्या उलट दुसरा विचार मांडला. उस्मान (र.) यांनी तो स्वीकारला. ह. उमर भले मोठे लष्कर आणि शस्त्रास्त्रे घेऊन बैतुलमुकद्दसच्या दिशेने निघतील असा कयास लोकांनी बांधला होता. भव्यदिव्य लष्कर तर सोडाच ते निघाले त्या वेळी त्यांचयाकडे तंबू उभारण्यासाठीही काही सामग्री नव्हती. एक घोडा होता पण ह. उमर यांच्या स्वारीची वार्ता सर्वत्र पोहोचली. जिथं जिथं ही बातमी पोहोचली तिथल्या लोकांचे धाबे दणाणले. शासकीय अधिकाऱ्यांना आधीच कळवले गेले होते. त्यांनी जाबिया या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली. यझीद बिन अबी सुफियान आणि खालिद बिन वलीद यांनी याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.
सीरिया या देशात रेशिम असल्याने त्यांच्या अधिकारीवर्गामध्ये अरबांसारखे साधेपण गायब झाले होते. ह. उमर (र.) यांना भेटायला हे लोक आले तेव्हा त्यांनी रेशिमची वस्त्रे परिधान केलेली होती. आपल्या हावभावाने हे लोक बिगर अरबांसारखे दिसत होते. ह. उमर यांना ही अवस्था पाहून राग आल ा. ते घोड्यावरून खाली उतरले आणि जमिनीवरील खडे हातात घेऊन त्यांच्या दिशेने भिरकावल े. म्हणाले की एवढ्या लवकर तुम्हाला अरबांच्या साधेपणाच्या जीवनाचा विसर पडला?
जाबिया या ठिकाणी बराच काळ ते थांबले होते. याच ठिकाणी बैतुलमकद्दसचा करार संमत झाला. त्या लिखित करारावर सर्वांच्या सह्या घेतल्या गेल्या. करार संमत झाल्यावर ह. उमर (र.) बैतुलमकद्दसकडे निघाले. त्यांच्या घोड्याचे नाल झिजले होते, म्हणून घोडा एकेका पावलावर थांबत होता. उमर (र.) घोड्यावरून खाली उतरले आणि पायीच निघाले. बैतुलमकद्दसच्या जवळ अबु उबैदा आणि इतर अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. तिथल्या मुस्लिम लोकांना लाज वाटल्यासारखे झाले. एवढ्या बलाढ्या अधिराज्याचा अधिपती अशी वस्त्रे परिधान करतो हे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्यासाठी तुर्की देशाचा एक घोडा आणि आलिशान वस्त्रे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ते घेण्यास नकार देत ह. उमर (र.) म्हणाले की आम्हाला मानसन्मान मिळाला तो इस्लाम धर्मामुळे मिळाला आहे आणि तोच सन्मान आम्हाला पुरेसा आहे.
(संदर्भ – अल-फारुक, अल्लामा शिबली नोमानी)
संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद
0 Comments