Home A blog A हे प्रभू, मला क्षमा कर!

हे प्रभू, मला क्षमा कर!

हे प्रभू! हे ईश्वरा!! हे अल्लाह!!!
मी गेले काही दिवस माझ्याच घरात बंदिस्त आहे याची तुला कल्पना आहेच. ‘कोरोना’ने सर्व जगभर थैमान घातले आहे. तो कसा आला, कुठून आला, कुठे गेला, किती बाधित झाले,  किती मृत्युमुखी पडले हे सर्व सांगायची मला गरज नाही. ते सर्वश्रुत आहेच. पृथ्वीच्या उत्तपत्तीपासून कस्रfचत ही पहिलीच घटना की ज्याने विकसनशील देशांपासून ते प्रगतशील पाश्चिमात्य देश अक्षरश: होरपळून निघत आहेत. आज जगातील असा एकही प्रदेश वा देश नाही की जेथे कोरोनाचे नाव घेतले जात नाही. या  विषाणूचा जन्म मानवनिर्मित चीन या  देशातून झाला असे म्हणतात. यात तथ्य असेल किंवा नसेल. पण एक मात्र खरे की पाश्चिमात्य देशांना प्रामुख्याने अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी दु:ख काय असते याची तू कल्पना  दिली हे बरेच झाले! अर्थात तेथील नागरिक हे आमचेच बांधव आहेत हे आजही आम्ही मानतो. इटली, स्पेनसारख्या देशात दररोज शेकडो लोक मेंढरांसारखे मृत्युमुखी पडतात हे  पाहाताना थरकाप हा होतोच. परंतु एकेकाळी आमच्या देशात व आजही क्षय, टीबी अशा रोगांनी दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. याकडे कोणत्याही प्रगतशील किंवा पाश्चिमात्य  देशांनी मानवतावादी दृष्टिकोनातून कधी नजर फिरवली होती का? असाही प्रश्न मनी निर्माण होतो. एक बाब प्रकर्षाने जाणवते की देश कितीही प्रगत संपन्न असला तरी सर्व जण  नामोहरम झाले आहेत. परिस्थिती एवढी भयावह आहे की इटलीचे पंतप्रधान हतबल होतात, तर जर्मनीचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी चक्क आत्महत्या अर्थात जीवन संपवायचा मार्ग  अवलंबतात. हे पाहाताना माझ्यासारख्या सामान्यांना कोरोनाशी मुकाबला कसा करवा हेच उमगत नाही. हे प्रभू, अल्लाह! तूच खरा सृष्टीचा निर्माता. आम्ही नवनवीन शोध तंत्रज्ञान  निर्माण केले. चंद्रावरही जाऊन आलो. एक मात्र खरे की आमचा फाजील आत्मविश्वास नडू लागला. हळू हळू आम्ही निसर्गावर मात करू लागलो.  शेकडो वर्षांची हजारो वृक्ष आमच्या  स्वार्थासाठी कत्तल केली. नदी-नाले, ओढे यांच्यावर अतिक्रमण करत त्यांचा श्वास रोखला, मोठमोठ्या शहरांतून कारखानदारीच्या माध्यमातून प्रदूषणाचा कळस गाठला. पर्यायाने  पशुपक्ष्यांना पूर्ण हद्दपार केले. चिमण्यांचा आवाज इतिहासजमा झाला. या सर्व बाबींना आम्हीच जबाबदार आहोत. त्याचे परिणाम आज दिसू लागले आहेत, हे आज पटले. एवढेच नव्हे   तर आमची संवेदनशीलता एवढी लयाला गेली की आज जन्म देणाऱ्या पित्याचा मुलाकडून खून होतो, तर पती आपल्या पत्नीचा शिरच्छेद करतोय. रक्ताची नाती ही फक्त नावालाच  राहिली असून स्वार्थ आमच्या नसानसांत भिणू लागला आहे. हे असे का झालेय? जन्मापासून प्रत्येकाचे एकच ध्येय- पैसा, पैसा आणि केवळ पैसा! त्यासाठी तो आपले कुटुंब, समाज  सर्व काही सोडून पुढे जाण्याचे स्वप्न मनी बाळगतो आहे. दरवर्षी माझ्या संपत्तीमध्ये किती वाढ होणार हे गणित करण्यातच आयुष्य कधी संपते हेच कळत नाही आणि हो- 

आम्ही  सर्व एकाच मानवजातीची लेकरे आहोत हे विसरलो आहोत. त्याची विभागणी जातीधर्मांमध्ये करून विषमता कशी निर्माण होईल यातच सर्व जीवन व्यतीत करतो आणि धन्यता मानतो.   
‘स्वच्छता अभियान’ केवळ नावालाच. ते आम्ही कधी अंगीकारलेच नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या कोरोनामुळे तू जाणीव करून दिलीस, हे बरे झाले.
‘जीवन’ हे अल्प आहे. उद्याचा दिवस आयुष्यात असेल किंवा नसेल, हे सांगता येत नाही. म्हणूनच इतरांच्या मदतीसाठी धावायला हवे. प्रामुख्याने वृद्ध मंडळी व लहान मुले यांच्याकडे  बारकाईने काळजी घ्यायला हवी अन्यथा आपल्या प्रेताला खांदेकरी सुधा मिळणार नाही, हे आम्हाला आज पटले.
या ‘पृथ्वी’मातेने लाखो वर्षे आम्हाला झेलले. प्रदूषणाच्या माध्यमातून आम्ही तिचा नायनाट करू लागलोय. अनेक धोक्याच्या घंटा महाप्रलय, महापूर, भूकंपाच्या स्वरूपात अनुभवास येतात. तरीसुद्धा आम्ही सावध होत नाही. कोरोनाद्वारे आम्हाला घरात बसणे अथवा मृत्यूला सामोरे जाणे एवढे दोनच पर्याय तू शिल्लक ठेवले आहेस.
खरेच प्रभू! आमचे चुकले. कोरोनाच्या निमित्ताने तू आमचे डोके भानावर आणू पाहतोयस. पण आजही आमचे अनेक बांधव अनभिज्ञ आहेत. आजही अशा कठीण प्रसंगी आमचे अनेक  गरीब मजूर, परप्रांतीय घर, अन्न, पाणी यापासून वंचित आहेत. त्यांना तू आसरा देण्यासाठी परिस्थिती निर्माण कर. हा कठीण समय आज ना उद्या जाईल, हे मला ठाऊक आहे.  शेवटी एक प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की मला मृत्युची अजिबात भीती नाही. कारण माझ्या रक्तामध्ये माझ्या पिढीतील पूर्वाजांनी कॉलरा, देवी अशा महामारीवर यशस्वीपणे मात  केली होती, त्यामुळे कोरोना किंवा स्वाइनफ्लू भयभीत करूच शकत नाही. एकच म्हणावेसे वाटते की औद्योगिक क्षेत्रातील प्रणालीनुसार ‘लेसन लन्र्ट’ (अर्थात धडा- कोरोना) मी माझ्या  दिनचर्येमध्ये मानवतावाद दृष्टिकोन बाळगत आज संकटावर मात करण्यासाठी जी पावले उचलली आहेत ती माझ्या अंतिम श्वासापर्यंत जपेन एवढीच येथे ग्वाही देतो. तू आम्हा सर्वांना  माफ करशील, याची पूर्ण खात्री आहेच. लवकरच सर्व काही पूर्वपदावर येईल अर्थात वरील बाबी स्मरणात ठेवून आणि निसर्गाला कुठलीही बाध न आणता! पुन्हा एकच विनंती, तू आम्हाला माफ कर.

– असलम जमादार
मो.: ९२२५६५६७६६

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *