माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांचे कथन आहे,
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘काय तुम्हाला माहीत आहे की सर्वांपेक्षा जास्त दानशूर कोण आहे?’’
साथीदारांनी (सहाबा) सांगितले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर मुहम्मद (स.) हेच अधिक जाणणारे आहेत.’’
पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांपेक्षा जास्त दानशूर अल्लाह आहे. मग आदमच्या संततीत सर्वांपेक्षा जास्त दानशूर मी स्वत: आहे आणि माझ्यानंतर मानवआंत सर्वांत जास्त दानशूर तो आहे जो ज्ञान प्राप्त करून त्यास प्रसारित करतो. असा मनुष्य कयामतच्या दिवशी एका श्रीमंत मनुष्याच्यारूपात येईल किंवा अशा प्रकारे येईल की त्याला स्वत:मध्ये एक समुदायाची पात्रता प्राप्त होईल.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण
दानशीलता खरे तर जीवनाचे प्रतीक आहे. जिथे कुठे जितके जीवन आढळते तिथे तितकीच दानशीलतासुद्धा सापडेल. अल्लाह तर सर्वस्वी जीवन आणि जीवनस्रोत आहे. कारण याव्यतिरिक्त कोणत्याच दानशीलतेची मनुष्य कल्पना करू शकत नाही. हे आकाश व पृथ्वी अल्लाहची दानशीलता आणि त्याचे अनुग्रह व अनुकंपेचे बोलके प्रमाण आहे. अल्लाहनंतर दानशीलतेचे गुण सर्वांपेक्षा जास्त ईशपैगंबराला प्राप्त होते, कारण ईशगुणांची प्रतिछाया पैगंबरजीवनात सर्वांपेक्षा जास्त परिलक्षित होते.
दानशीलतेचा संबंध फक्त धनसंपत्तीशीच नसतो. सर्वांपेक्षा जास्त दानशीलता आणि उपकाराची गोष्ट म्हणजे जगाला ज्ञानप्रकाशाने प्रकाशित केले जावे.
याचमुळे या हदीसमध्ये आदमच्या संततीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशील त्या व्यक्तीला घोषित केले आहे जो ज्ञान व अंतर्दृष्टीने सुसज्जित होऊन जगातज्ञानप्रकाशाला पैâलावित असतो, जेणेकरून लोक पथभ्रष्टतेच्या अंधकारापासून मुक्त व्हावेत. त्या लोकांसाठी खरे सुख प्राप्त व्हावे आणि त्यांना या जगात तसेच पारलौकिक जीवनात सफलता व कल्याण प्राप्त व्हावे.
0 Comments